Armaan Kohli | अभिनेता अरमान कोहलीला मोठा धक्का, ड्रग्ज प्रकरणात जामीन देण्यास न्यायालयाचा नकार!

अभिनेता अरमान कोहलीच्या (Armaan Kohli) अडचणी काही कमी होताना दिसत नाहीयत. एनडीपीएस प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने अरमानला जामीन नाकारला आहे. अरमान ऑगस्ट 2021 पासून न्यायालयीन कोठडीत आहे. अरमानला जेव्हा अटक करण्यात आली तेव्हा एनसीबीने सांगितले की, अरमानवर ड्रग्ज सेवनाचे अनेक मोठे आरोप आहेत.

Armaan Kohli | अभिनेता अरमान कोहलीला मोठा धक्का, ड्रग्ज प्रकरणात जामीन देण्यास न्यायालयाचा नकार!
Armaan Kohli
Follow us
| Updated on: Dec 20, 2021 | 2:58 PM

मुंबई : अभिनेता अरमान कोहलीच्या (Armaan Kohli) अडचणी काही कमी होताना दिसत नाहीयत. एनडीपीएस प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने अरमानला जामीन नाकारला आहे. अरमान ऑगस्ट 2021 पासून न्यायालयीन कोठडीत आहे. अरमानला जेव्हा अटक करण्यात आली तेव्हा एनसीबीने सांगितले की, अरमानवर ड्रग्ज सेवनाचे अनेक मोठे आरोप आहेत. एनसीबीने अरमानला अटक करण्यापूर्वी त्याच्या घरावर छापा टाकला होता आणि त्यादरम्यान त्याच्या घरी काही प्रमाणात ड्रग्ज सापडले होते.

चौकशीदरम्यान अभिनेत्याला याबाबत विचारले असता, त्याने कोणतेही स्पष्ट उत्तर दिले नाही. चौकशीनंतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्याला त्यांच्या कार्यालयात नेले आणि त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

ड्रग्ज प्रकरणात अनेक मोठी नावं

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग्ज प्रकरण समोर आल्यापासून NCB बॉलिवूडवर लक्ष ठेवून आहे. ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत अनेक सेलेब्सची नावे समोर आली आहेत. त्याचबरोबर या प्रकरणी अनेक सेलिब्रिटींना अटक करण्यात आली आहे. ड्रग्ज प्रकरणी रिया चक्रवर्ती, भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांना अटक करण्यात आली आहे. मात्र, काही दिवस तुरुंगात राहिल्यानंतर त्यांना जामीन मिळाला.

याशिवाय दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंह यांचीही नावे ड्रग्ज प्रकरणात आली होती. मात्र, त्यांच्याबाबत कोणताही पुरावा मिळू शकला नाही. मात्र, अरमान या प्रकरणात अडकला असून, त्याला सध्या जामीन मिळण्याची शक्यता नाही.

अरमानचे व्यावसायिक जीवन

अरमान हा दिग्दर्शक राज कुमार कोहली आणि अभिनेत्री निशी यांचा मुलगा आहे. मात्र, तो इंडस्ट्रीत आपले मोठे नाव कमावू शकला नाही. 1992 मध्ये ‘विरोधी’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात करणाऱ्या अरमानने अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका केल्या आहेत. मात्र, सलमान खानच्या ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटात अरमानने खलनायकाची भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली.

अरमान ‘बिग बॉस’मध्येही दिसला होता. तो हा शो जिंकू शकला नाही, पण या शोमधून त्याला लोकप्रियता मिळाली. अरमानचा पुढील वर्षी ‘नो मीन्स नो’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा एक इंडो पोलिश रोमँटिक थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात अरमानशिवाय गुलशन ग्रोवर आणि शरद कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

हेही वाचा :

Little Little Song : ‘लिटील लिटील’ गाण्यात अक्षय-धनुषचा ‘अतरंगी’ अंदाजात धमाल डान्स, नवं गाणं पाहिलंत का?

Alia Bhatt | ‘सोने दी कुडी…’, आलिया भट्टच्या सोनेरी लेहेंग्यावर खिळली नजर, जाणून घ्या या लूकची खासियत!

Rakhi Sawant Husband | ‘आमचं आधीच लग्न झालंय, मग तो राखीचा नवरा कसा?’, रितेशची पहिली पत्नी स्निग्धा माध्यमांसमोर!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.