Actor Arman Kohli : किंग खानच्या यशामागचा तारा, आज अरमान कोहलीचा वाढदिवस, वाचा अरमानविषयी…
आज अभिनेता अरमान कोहली याचा वाढदिवस. किंग खानला सुपरस्टार बनवण्यामागे हात असणारा अभिनेता, नव्वदच्या दशकात 'विरोधी' या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये आगमन आणि तब्बल दशकभराचा गॅप घेऊन पुन्हा 'जानी दुश्मन:एक अनोखी कहानी'मधून पुनरागम अरमानने केलं. जाणून घेऊया अरमानच्या वाढदिवसानिमित्त त्याच्याविषयी...
मुंबई : नाव अरमान कोहली (Actor Arman Kohli). किंग खानला सुपरस्टार बनवण्यामागे हात असणारा अभिनेता, नव्वदच्या दशकात ‘विरोधी’ या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये आगमन आणि तब्बल दशकभराचा गॅप घेऊन पुन्हा ‘जानी दुश्मन:एक अनोखी कहानी’मधून पुनरागम अरमानने केलं. त्यानंतर कुठेही न दिसणारा अरमान बिग बॉसच्या सातव्या भागातून समोर आला. अरमान कोहली विषयी सांगायची एक विशेष गोष्ट म्हणजे किंग खानने (Actor Shah rukh Khan) एका मुलाखतीत अरमानचा उल्लेख करताना म्हटलं होतं की, मला सुपरस्टार बनवन्यामागे अरमान कोहली आहे. अरमानने दिवाना हा चित्रपट नव्वदच्या दशकात सोडला होता आणि तोच दिवाना माझ्यासाठी बॉलिवूडचे (Bollywood) दरवाजे उघडून देणारा पहिला चित्रपट ठरला. शाहरुख खानने त्याच्या बॉलिवूडमध्ये सर्वात महत्वाच्या क्षणाचं श्रेय अरमानला दिल्याचं त्यावेळी सांगितलं होतं.
अरमान कोहलीविषयी…
अरमान कोहली हा ज्येष्ठ दिग्दर्शक राजकुमार कोहली आणि ज्येष्ठ अभिनेत्री निशी यांचा मुलगा आहे. अरमान कोहली याची बॉलिवूड कारकीर्द हिट ठरली नाही. ‘बदले की आग’ आणि ‘राज तिलक’ या सिनेमातून बालकलाकार म्हणून अरमानने सिनेसृष्टीत प्रवेश केला होता. हे दोन्ही सिनेमे त्याच्या वडिलांनी म्हणजे राजकुमार कोहली यांनी दिग्दर्शित केले होते. विरोधी, दुश्मन जमाना, औलाद के दुश्मन, वीर, कहर, जानी दुश्मन यांसारख्या सिनेमात अरमानने काम केलेले आहे. त्यानंतर मध्ये 12 वर्षांचा ब्रेक घेतल्यानंतर सलमानच्या ‘प्रेम रतन धन पायो’ सिनेमातही तो दिसला होता. 2013 सालच्या बिग बॉसच्या सीझनमध्येही अरमान सहभागी झाला होता.
अरमानमुळे बनलो सुपरस्टार
बॉलिवूडमध्ये अधिराज्य गाजवणाऱ्या किंग खानने सुपरस्टार बनण्याचे श्रेय अरमान कोहलीला दिलं आहे. 2016मध्ये आलेली ‘यारों की बारात’ या कार्यक्रमात शाहरुख खानने आपल्या यशामागे अभिनेता अरमान कोहली असल्याचं म्हटलं होतं. त्यावेळी किंग खान म्हणाला म्हणाला होता की, ‘मी सुपरस्टार होण्यामागे अरमान कोहली आहे. तो त्यावेळी दिवंगत अभिनेत्री दिव्या भारतीसोबत ‘दिवाना’ चित्रपटाच्या पोस्टरवर दिसून आला होते. त्यानंतर त्याने हा चित्रपट सोडला आणि मला बलिवूडमध्ये येण्याची सुवर्णसंधी मिळाली. आजही माझ्याकडे दिवंगत अभिनेत्री दिव्या भारती आणि अरमान कोहली हे दोघे ‘दिवाना’च्या पोस्टरवर असलेलं एक पोस्टर आहे. मला सुपरस्टार बनवण्यासाठी धन्यवाद अरमान.
नात्यामुळेही अरमान चर्चेत
मुनमुन दत्ता एका व्हिडिओमुळे वादात अडकली होती. अभिनेता अरमान कोहलीसोबतच्या नात्यामुळेही ती चर्चेत होती. मुनमुन दत्ता अरमान कोहलीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं बोललं जातं होतं. पण, त्यांच्यासाठी या नात्यात राहणे इतके सोपे नव्हते. 2008 मध्ये व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी दोघांमध्ये इतका गोंधळ झाला की, दोघांच्या नात्याचे सत्य प्रत्येकापर्यंत पोहोचले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा अरमान कोहलीने व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी मुनमुन दत्तावर हात उगारला तेव्हा चर्चेला उधाण आलं होतं.
इतर बातम्या