Sandeep Nahar Suicide Case | मुंबई पोलिसांनी संदीप नहारच्या हत्येची शक्यता फेटाळली

अभिनेत्याच्या मृत्यूनंतर आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अभिनेत्याने आत्महत्या केली ही त्याची हत्या केली, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

Sandeep Nahar Suicide Case | मुंबई पोलिसांनी संदीप नहारच्या हत्येची शक्यता फेटाळली
संदीप नहार आत्महत्या
Follow us
| Updated on: Feb 17, 2021 | 7:50 AM

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा (Sushant Singh Rajput) को-स्टार संदीप नहार (Sandeep Nahar Suicide) याने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत आयुष्य संपवलं (Police Refuse Murder Theory). आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक फेसबुक पोस्टही (Sandeep Nahar Facebook Post) केली. संदीपने त्याच्या पत्नीवर (Kanchna Nahar) रोज भांडण करणे आणि त्याचा छळ करण्याचा आरोप केला. आता पोलिसांनी या घटनेवर त्यांचं स्टेटमेंट सादर केलं आहे (Police Refuse Murder Theory).

टाईम्सच्या बातमीनुसार, संदीपने त्याच्या घरी फाशी घेत आत्महत्या केली. अभिनेत्याची पत्नी कंचन आणि मित्र संदीपला गोरेगावच्या एका रुग्णालयात घेऊन गेले, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. अभिनेत्याच्या मृत्यूनंतर आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अभिनेत्याने आत्महत्या केली ही त्याची हत्या केली, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

संदीप नहार आत्महत्या

संदीप नहार आत्महत्या

पोलिसांचं स्टेटमेंट

संदीपच्या मृत्यूबाबत पोलिसांचं म्हणणं आहे की, अभिनेत्याने आपल्या बेडरुमला आतून बंद केलं, जेव्हा त्याच्या पत्नीने वारंवार दार ठोठावलं. पण, आतून काहीही उत्तर आलं नाही. तेव्हा कंचनने चावी बनवणाऱ्याला बोलावलं आणि घर मालकालाही बोलावलं. त्यानंतर जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा संदीप हा फाशावर लटकलेल्या अवस्थेत आढळला.

मंगळवारी संदीप नाहरचा भाऊ आणि वडील त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्याच्या मृतदेहावर दावा करण्यासाठी गोरेगाव पोलीस स्टेशनला पोहोचले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत कुठल्याही पक्षाने तक्रार दाखल केलेली नाही (Police Refuse Murder Theory).

प्राथमिक सूचनेच्या आधारे गोरेगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून आणि शिवविच्छेदनाचा अहवालाची वाट पोलीस बघत आहेत. अधिकाऱ्यानुसार पोलिसांनी संदीप नाहर यांच्या पत्नीचं स्टेटमेंट घेतलं आहे.

संदीपला मृत घोषित केल्यानंतर संदीपच्या पत्नीने संदीपचा मृतदेह घरी आणला. तेव्हा गोरेगाव पोलिसांनी संदीपच्या मृतदेहाचा तपास केला आणि मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी संदीपच्या गळ्यावर संशयास्पद चिन्ह दिसले. पोलीस शवविच्छेदन अहवाल येण्याची वाट पाहात आहेत. सध्या मुंबई पोलिसांचं सायबर सेल संदीप नाहरच्या सोशल मीडिया अकाऊंटचा तपास करत आहेत.

Sandeep Nahar Suicide Case Police Refuse Murder Theory

संबंधित बातम्या :

अक्षय कुमारसोबत ‘केसरी’मध्ये काम केलेल्या अभिनेत्याची आत्महत्या, मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.