सुनील शेट्टी ओटीटीमध्ये धमाका करण्यास तयार, ‘या’ अभिनेत्रीसोबत करणार डेब्यू
अभिनेता सुनील शेट्टीचा चाहता वर्ग अत्यंत मोठा आहे. सुनील शेट्टी ओटीटीमध्ये पदार्पण करणार असल्याच्या बातम्यांनंतर चाहत्यांमध्ये एक उत्साह बघायला मिळत होता.
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती की, अभिनेता सुनील शेट्टी (Suniel Shetty) ओटीटीमध्ये पदार्पण करणार आहे. नेमक्या कोणत्या वेब सीरिजमध्ये सुनील शेट्टी दिसणार हे जाणून घेण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक होते. अखेर सुनील शेट्टी ओटीटीमध्ये कोणत्या वेब सीरिजमधून (Web series) पदार्पण करतोय, हे समोर आलंय. ही एक अॅक्शन थ्रिलर वेब सीरिज आहे. विशेष म्हणजे तमिळचे प्रसिध्द दिग्दर्शक (Director) राजेश एम सेल्वा हे या वेब सीरिजला दिग्दर्शन करणार आहेत. यामुळे हे स्पष्टच आहे की, ही वेब सीरिज खास असणार.
अभिनेता सुनील शेट्टीचा चाहता वर्ग अत्यंत मोठा आहे. सुनील शेट्टी ओटीटीमध्ये पदार्पण करणार असल्याच्या बातम्यांनंतर चाहत्यांमध्ये एक उत्साह बघायला मिळत होता. ‘Invisible Woman’ हे सुनील शेट्टीच्या वेब सीरिजचे नाव आहे. ही एक अॅक्शन थ्रिलर वेब सीरिज आहे. विशेष म्हणजे या वेब सीरिजमध्ये सुनील शेट्टीसोबत अभिनेत्री ईशा गुप्ता देखील दिसणार आहे.
काही दिवसांपूर्वीच सुनील शेट्टीने बाॅलिवूड चित्रपटांच्याविरोधात सुरू असलेल्या बॉयकॉट मोहिमेवर अत्यंत मोठे विधान केले. सुनील शेट्टी म्हणाले की, काही लोक फेक आयडी तयार करून मोठ्या प्रमाणात बॉयकॉट मोहिम राबवतात. मात्र, यावेळी त्यांनी बाॅलिवूड चित्रपटांबद्दल देखील मोठे वक्तव्य करत म्हटले की, काही गोष्टी बॉलिवूडमध्ये देखील चुकीच्या होत आहेत.
बॉलिवूडचा प्रेक्षकांशी योग्य संपर्क होत नाही. यावर बॉलिवूडने विचार करण्याची देखील गरज आहे. बॉलिवूडला व्यवसायाच्या दृष्टिकोनातून प्रेक्षकांना समजून घेता येत नाही. बॉलिवूडने आता प्रेक्षकांशी जुळून घ्यायला हवे, असे मला वाटते असेही सुनील शेट्टी यावेळी म्हणाले. आता सुनील शेट्टीच्या चाहत्यांना त्यांच्या आगामी वेब सीरिजचा आतुरता लागली आहे.