सन्नी देओलचा दुसरा लेकही करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण, ‘हा’ दिग्गज निर्माता देणार सुवर्ण संधी!

अभिनेता सनी देओलचा (Sunny Deol) मोठा मुलगा करण देओलनंतर, आता त्याचा धाकटा मुलगा राजवीर देओलदेखील (Rajveer Deol) आपल्या मनोरंजन विश्वातील पदार्पणासाठी सज्ज असल्याचे, समोर येत आहे.

सन्नी देओलचा दुसरा लेकही करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण, ‘हा’ दिग्गज निर्माता देणार सुवर्ण संधी!
सन्नी देओल
Follow us
| Updated on: Mar 23, 2021 | 11:16 AM

मुंबई : बॉलिवूडमध्ये एकापाठोपाठ एक नवीन कलाकारांचे पदार्पण होत आहे. बॉलिवूडमध्ये सध्या नवीन स्टार किड्सचा भरणा देखील होत आहे. अभिनेता सनी देओलचा (Sunny Deol) मोठा मुलगा करण देओलनंतर, आता त्याचा धाकटा मुलगा राजवीर देओलदेखील (Rajveer Deol) आपल्या मनोरंजन विश्वातील पदार्पणासाठी सज्ज असल्याचे, समोर येत आहे. करण देओलला स्वतः सनीनेच बॉलिवूडमध्ये एंट्री करून दिली होती. करणने त्याच्या करिअरची सुरूवात ‘पलपल दिल के पास’ मधून केली होती, आता त्याचा धाकटा भाऊही अभिनय क्षेत्रात काम करणार आहे (Actor Sunny Deol younger son rajveer Bollywood debut).

करण देओल सध्या फक्त एकाच चित्रपटात दिसला आहे, पण त्याच्या दुसऱ्या प्रोजेक्टचीही चाहत्यांना प्रतीक्षा आहे. अशा परिस्थितीत आता राजवीरच्या बॉलिवूडमध्ये पदार्पणाच्या बातमीमुळे सर्वांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या आहेत.

‘हा’ दिग्गज निर्माता देणार संधी

बातमीनुसार, राजवीर ज्या चित्रपटापासून डेब्यू करणार आहे, त्या चित्रपटाचे दिग्दर्शन सूरज बड़जात्याचा मुलगा अवनीश बडजात्या करणार आहे. अवनीश याचीसुद्धा ही डेब्यू फिल्म असणार आहे, जी गेल्या दोन वर्षांपासून अडकलेली होती.

एका प्रसिद्ध वेबसाईटच्या माहितीनुसार, हा चित्रपट ये जवानी है दिवानीवर आधारित असून या चित्रपटामध्ये राजवीर आणि त्याची नायिका कथेचे मुख्य घटक असणार आहेत. यासोबतच चित्रपटात अनेक तरुण व्यक्तिरेखा दिसणार आहेत, हा चित्रपट वेडिंग रोमकॉम असणार आहे. मात्र, या चित्रपटाविषयी आणि राजवीरच्या पदार्पणाविषयी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

‘अपने 2’मध्ये झळकणार कारण देओल

आता करण त्याच्या दुसरा चित्रपट अर्थात ‘अपने 2’मध्ये दिसणार आहे. यात तो वडील सनी देओल, काका बॉबी देओल आणि आजोबा धर्मेंद्र यांच्यासह स्क्रीन शेअर करणार आहे. अनिल शर्मा ‘अपने 2’चे दिग्दर्शन करणार आहेत. काही काळापूर्वी अभिनेता सनी देओलने सोशल मीडियावर या चित्रपटाची घोषणा केली होती. त्याच्या ‘अपने’ या चित्रपटाचा पहिला भाग 2007 मध्ये प्रदर्शित झाला होता (Actor Sunny Deol younger son rajveer Bollywood debut).

गदर येणार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला!

‘गदर’ चित्रपटाचे नाव उच्चारले की, तो हँडपंप उखडण्याचा सीन प्रत्येकाच्या डोळ्यासमोर येतो. हा सीन पाहून प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जोरदार टाळ्यांचा कडकडाट केला होता. असेच काहीतरी पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी आता याचा खुलासा केला आहे. त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, ‘गदर’ चे निर्माते यावेळी तयार होणारा सिक्वेल लक्षात घेऊन प्लॉट आणि स्क्रिप्टवर काम करत आहेत.

मुख्य जोडी म्हणून सनी-अमीषाच आघाडीवर!

जेव्हा चित्रपटाचा सिक्वेल बनतो, तेव्हाबऱ्याचदा लीडची जोडी बदलते. पण ‘गदर’च्या पार्ट 2मध्ये सनी देओल आणि अमीषा पटेलच लीड रोलमध्ये दिसतील. अद्याप या चित्रपटाची अधिकृत घोषणा झालेली नाही, परंतु निर्मात्यांनी आत्ताच त्याबद्दलची योजना आखली आहे. याशिवाय चित्रपटाशी संबंधित अन्य कलाकारांशीही संपर्क साधला जात आहे.

उत्कर्ष देखील साकारणार महत्त्वाची भूमिका

मीडिया रिपोर्टनुसार दिग्दर्शक अनिल शर्मा यांचा मुलगा उत्कर्षही यात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. असं म्हणतात की, चित्रपटाच्या पहिल्या भागात उत्कर्षने सनी आणि अमीषाचा मुलगा जीता याची भूमिका साकारली होती. अभिनेता म्हणून त्याने वर्ष 2018मध्ये ‘जीनियस’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

(Actor Sunny Deol younger son rajveer Bollywood debut)

हेही वाचा :

करण जोहर पुन्हा एकदा वादात! ट्रोलर्स म्हणाले ‘गॉड ऑफ नेपोटिझम’, वाचा काय आहे नेमके प्रकरण…

National Film Awards | वाढदिवसाआधीच मोठी भेट! कंगनाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर!

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.