विवेक मेहराच्या आधीही एका व्यक्तीशी लग्न, केवळ वर्षभर टिकला संसार, नीना गुप्तांचा मोठा खुलासा!

बॉलिवूडच्या जेष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) सध्या आपल्या आत्मचरित्रासाठी बर्‍याच चर्चेत आल्या आहेत. या आत्मचरित्रात नीना गुप्ता यांनी आपल्या आयुष्यातील अनेक मोठी रहस्ये उघड केली आहेत, जी चाहत्यांसाठी खूप धक्कादायक आहेत.

विवेक मेहराच्या आधीही एका व्यक्तीशी लग्न, केवळ वर्षभर टिकला संसार, नीना गुप्तांचा मोठा खुलासा!
नीना गुप्ता
Follow us
| Updated on: Jun 16, 2021 | 11:00 AM

मुंबई : बॉलिवूडच्या जेष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) सध्या आपल्या आत्मचरित्रासाठी बर्‍याच चर्चेत आल्या आहेत. या आत्मचरित्रात नीना गुप्ता यांनी आपल्या आयुष्यातील अनेक मोठी रहस्ये उघड केली आहेत, जी चाहत्यांसाठी खूप धक्कादायक आहेत. नीना यांच्या आत्मचरित्राचे नाव ‘सच कहूं तो’ आणि आता यातून जे समोर आले आहे, ते म्हणजे नीना यांनी विवेक मेहराशी लग्न करण्यापूर्वी एका व्यक्तीशी लग्न केले होते, पण ते लग्न एक वर्षदेखील टिकू शकले नाही. लग्नाच्या एक वर्षानंतर दोघेही वेगळे झाले (Actress Neena Gupta reveals that she married once before tying the knot with Vivek Mehra).

तिने अमलन कुसुम नावाच्या व्यक्तीशी लग्न केले असल्याचे नीना यांनी सांगितले. त्यावेळी तो आयआयटीचा विद्यार्थी होता आणि संस्कृतमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत होता. झूमच्या मते, त्यांच्या नात्याबद्दल खुलासा करताना नीना म्हणाल्या होत्या की, अमलन आणि मी कॉलेज कॅम्पसमध्ये भेटलो. त्याचे आईवडील दुसर्‍या शहरात राहत असत, पण आजोबा आमच्या गल्लीत राहत होते. सण आणि सुट्टीच्या काळात तो तिथेच राहायला यायचा. अभिनेत्रीच्या मित्राने तिच्या पालकांसमोर जेव्हा हा खुलासा केला, तेव्हा या दोघांचेही संबंध घरी कळले. परंतु, याचा परिणाम या दोघांच्या नात्यावर झाला नाही.

यानंतर नीनाला अमलनसमवेत श्रीनगरला जाण्याची परवानगी मिळाली आणि दोघांनीही लग्न केले. पण नंतर दोघांनाही समजले की, दोघेही एकमेकांसाठी बनलेले नाहीत. नीना म्हणाली, अमलन आणि माझे विचार खूप भिन्न होते. मी फक्त कुटुंबावर लक्ष केंद्रित करावं, असं त्याला वाटायचं. पण मला खूप काम करायचं होतं आणि मला फक्त गृहिणी व्हायचं नव्हतं. मला आयुष्यात अधिक काही तरी हवं होतं आणि मी जास्तीत जास्त थिएटर करण्यास सुरूवात केली, तेव्हा माझा मार्ग स्पष्ट झाला.’

एक वर्षानंतर विभक्त

नीना म्हणाली, ‘अमलन आणि माझे लग्न खूप कमी काळासाठी टिकले होते. त्यावेळी आम्ही दोघेही खूप लहान होतो. आम्ही तरुण वयातच लग्न केले. परंतु, मी त्याच्याविषयी काहीही चुकीचे म्हणणार नाही.’ लग्नाच्या केवळ एक वर्षानंतर नीना आणि अमलन विभक्त झाले.

सतीश गर्भवती नीनाशी लग्न करायला होते तयार!

फिल्म कंपेनियनच्या म्हणण्यानुसार, जेव्हा नीना गर्भवती होत्या, तेव्हा सतीश कौशिक त्यांच्याकडे गेले होते. सतीश नीनाचे खूप चांगले मित्र आहेत. ते नीनाला म्हणाले होते की, ‘तू काळजी करू नकोस, जर मुल डार्क त्वचेचे असेल, तर तू सांग की ते माझे आहे आणि आपण लग्न करु. कोणालाही काही कळणार नाही.’

अभिनेत्री नीना गुप्ता यांचे क्रिकेटर विव्हियन रिचर्ड्सबरोबर संबंध होते आणि त्यावेळी नीना गर्भवती राहिल्या होत्या. विव्हियनने नीनाशी लग्न केले नसले, तरी नीनाने लग्न न करता बाळाला या जगात आणण्याचे ठरवले होते. त्यानंतर नीनाने 2008मध्ये विवेक मेहराशी लग्न केले आणि दोघेही 13 वर्षांपासून एकत्र सुखी संसार करत आहेत.

(Actress Neena Gupta reveals that she married once before tying the knot with Vivek Mehra)

हेही वाचा :

PHOTO | देव आनंदशी नातं तुटल्यानंतर आयुष्यभर अविवाहित राहिल्या, वाचा सुरैयांच्या जीवनाशी संबंधित खास गोष्टी

Video | …जेव्हा विराटचे गाणे ऐकून अनुष्का शर्माच्या डोळ्यांत अश्रू तरळतात, पाहा व्हिडीओ

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.