स्मिता पाटील यांचे अनुप सोनीशी कौटुंबिक कनेक्शन माहित आहे का?

दोन मुलांचा बाप असलेल्या राज बब्बर यांनी घटस्फोट न घेताच स्मिता पाटील यांच्याशी विवाह केला. राज बब्बर यांच्या निर्णयाने संपूर्ण मनोरंजन विश्वात खळबळ उडाली होती (Smita Patil Raj Babbar Anup Soni)

स्मिता पाटील यांचे अनुप सोनीशी कौटुंबिक कनेक्शन माहित आहे का?
Smita Patil Raj Babbar Anup Soni
Follow us
| Updated on: May 21, 2021 | 7:58 AM

मुंबई : ‘भारतीय चित्रपटसृष्टीला पडलेले सुंदर स्वप्न’ अशा शब्दात अभिनेत्री स्मिता पाटील (Smita Patil) यांचे वर्णन केले जाते. फक्त मराठीच नाही, तर हिंदी, बंगाली, गुजराती, मल्ल्याळम अशा अनेक भाषांमधील चित्रपटात त्यांनी सहजसुंदर अभिनय केला. सामना, उंबरठा, जैत रे जैत यासारखे मराठी चित्रपट असोत, किंवा मंथन, भूमिका, बाजार, नमक हलाल यासारखे हिंदी चित्रपट त्यांनी गाजवले आहेत. दिग्गज अभिनेते राज बब्बर (Raj Babbar) यांच्यासोबतचे त्यांचे नातेही तितकेच चर्चेचा विषय ठरले. मुलगा प्रतीक बब्बरच्या (Prateik Babbar) जन्मावेळी प्रसुतीनंतरच्या गुंतागुंतीमुळे स्मिता पाटील यांचे निधन झाले. 13 डिसेंबर 1986 रोजी वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हिंदी मालिकांसह चित्रपटसृष्टी गाजवणारा अभिनेता अनुप सोनी (Anup Soni) हा स्मिता पाटील यांच्या सावत्र कन्येचा पती, अर्थात जावई. स्मिता पाटील यांचे वैयक्तिक आयुष्य, बब्बर कुटुंबाशी त्यांच्या कनेक्शनविषयी जाणून घेऊया. (Actress Smita Patil Actor Politician Raj Babbar Marriage Love Affair Story Relation with Actor Anup Soni)

माजी मंत्र्याची कन्या

स्मिता पाटील यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1955 रोजी पुण्यात झाला. माजी मंत्री शिवाजीराव गिरीधर पाटील आणि सामाजिक कार्यकर्त्या विद्याताई पाटील यांच्या त्या कन्या. लहानपणापासूनच स्मिता पाटील यांना नाटकात काम करण्याची गोडी लागली. उण्यापुऱ्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी विविध भाषांतील जवळपास 80 चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, फिल्मफेअर सारख्या मानाच्या पुरस्कारांवर त्यांनी नाव कोरलं. 1985 मध्ये भारतातील चौथ्या क्रमांकाच्या सर्वोच्च नागरी ‘पद्मश्री’ पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते.

स्मिता पाटील यांचे गाजलेले चित्रपट

1975 मध्ये श्याम बेनेगल दिग्दर्शित ‘चरणदास चोर’ चित्रपटातून त्यांची कारकीर्द सुरु झाली. भारतीय सिनेसृष्टीतील नवीन चळवळ अर्थात समांतर चित्रपटातील त्या आघाडीच्या अभिनेत्री ठरल्या. त्यांच्या वाखाणलेल्या भूमिकांमध्ये मंथन (1977), भूमिका (1977), जैत रे जैत (1978), आक्रोश (1980), चक्र (1981), नमक हलाल (1982), बाजार (1982), उंबरठा (1982), शक्ती (1982), अर्थ (1982), अर्ध सत्य (1983), मंडी (1983), आज की आवाज (1984), चिदंबरम (1985), मिर्च मसाला (1985), अमृत (1986) वारिस (1988) यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे. ‘सावळं सौंदर्य’ किंवा ‘डस्की ब्यूटी’ अशी त्यांना ओळख मिळाली. स्मिता पाटील यांच्या निधनानंतर त्यांचे जवळपास दहा चित्रपट रिलीज झाले.

राज बब्बर यांच्याशी अफेअर

राज बब्बर हे सत्तर आणि ऐशीच्या दशकातील प्रथितयश अभिनेते. रोमँटिक आणि अॅक्शनपटांऐवजी सामाजिक चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या आहेत. 1977 मध्ये ‘किस्सा कुर्सी का’ या सिनेमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. 1975 मध्ये त्यांनी रंगभूमी कलाकार आणि दिग्दर्शक नादिरा यांच्याशी विवाह केला.

स्मिता पाटील आणि राज बब्बर यांची ओळख सर्वप्रथम 1982 मध्ये भिगी पलके चित्रपटाच्या सेटवर झाली. स्मिता आणि राज यांच्यातील प्रेमसंबंधाच्या चर्चा सुरु झाल्या. त्यानंतर त्यांचे चाहते आणि मीडियाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. स्मिता पाटील या स्त्रीवादी कार्यकर्त्या म्हणूनही काम करत असत. महिला हक्कांसाठी लढणाऱ्या स्मिता विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडल्याने त्यांना टीकेला सामोरं जावं लागलं होतं.

राज बब्बर स्मिता पाटील

ऑनस्क्रीन जोडी फ्लॉप

राज आणि स्मिता यांनी अकरा सिनेमांमध्ये एकत्र काम केलं. मात्र एकाही चित्रपटाला म्हणावं तसं यश मिळालं नाही. मात्र त्यांचं प्रेम फुलत गेलं आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. त्यामुळे स्मिता पाटील यांना महिला संघटनांनी जोरदार विरोध केला होता. त्यांची इमेज अचानक होमब्रेकर अशी झाली, मात्र स्मिता यांनी त्याची पर्वा केली नाही.

पहिली पत्नी नादिरा बब्बर यांना सोडून राज बब्बर स्मिता पाटलांकडे आले. दोन मुलांचा बाप असलेल्या राज यांनी घटस्फोट न घेताच स्मिता पाटील यांच्याशी विवाह केला. राज बब्बर यांच्या निर्णयाने संपूर्ण मनोरंजन विश्वात खळबळ उडाली होती. त्यांच्या लग्नाची तारीख अद्यापही निश्चितपणे समोर आलेली नाही.

प्रसुतीनंतर प्रकृती बिघडली

28 नोव्हेंबर 1986 रोजी प्रतीकचा जन्म झाला. प्रसुतीनंतरच्या गुंतागुंतीमुळे स्मिता पाटील यांची प्रकृती खालावली. मुलगा प्रतीकच्या जन्मानंतर अवघ्या दोन आठवड्यातच 13 डिसेंबर 1986 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. प्रख्यात दिग्दर्शिका मृणाल सेन यांनी स्मिता पाटलांच्या निधनाच्या दोन दशकांनंतर त्यांचा मृत्यू हा वैद्यकीय हलगर्जीचा बळी असल्याची जाहीर वाच्यता केली होती.

स्मिता पाटील यांच्या निधनानंतर राज बब्बर पहिली पत्नी नादिरा आणि मुलांकडे परतले. कुटुंबाने त्यांना स्वीकारले. तर प्रतीकचा सांभाळ त्याचे आजी आजोबा शिवाजीराव पाटील आणि विद्याताई पाटील यांनी केला.

‘राजकीय’ राज बब्बर

राज बब्बर यांनी 1989 मध्ये राजकारणात प्रवेश केला. व्ही पी सिंग यांच्या नेतृत्वात त्यांनी जनता दलाचा झेंडा हाती धरला. 1994 ते 1999 या काळात ते राज्यसभा खासदार झाले. त्यानंतर त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला. 1999 ते 2009 ही दहा वर्ष ते आग्य्रातून लोकसभा खासदार होते. मात्र 2006 मध्येच सपातून त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. 2008 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

2009 च्या पोटनिवडणुकीत ते फिरोजाबादमधून लोकसभा खासदारपदी निवडून आले. अखिलेश यादव यांच्या पत्नी डिम्पल यादव यांना पराभूत करुन राज बब्बर यांनी विजय मिळवला होता. 2014 मध्ये भाजप उमेदवार जनरल व्ही के सिंग यांच्याकडून त्यांना पराभवाचा धक्का बसला. त्यांच्याकडे उत्तर प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची धुरा देण्यात आली, मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना स्वतःची सीटही राखता आली नाही. भाजप उमेदवार राजकुमार चहर यांच्याकडून 4,95,065 च्या मताधिक्याने ते पराभूत झाले.

राज बब्बर यांचे कुटुंब – पत्नी नादिरा, कन्या जुही, जावई अनुप सोनी आणि नातू

राज यांची पहिली पत्नी – नादिरा

नादिरा जहीर या उर्दू कवी सज्जाद जहीर यांच्या कन्या. अभिनेत्री, दिग्दर्शिका म्हणून त्यांनी नाव कमावले आहे. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या त्या गोल्ड मेडलिस्ट आहेत. रंगभूमीसाठी त्यांचं योगदान मोठं आहे. गुरिंदर चढ्ढा दिग्दर्शित ब्राईड अँड प्रेज्युडाईसमधील ऐश्वर्या रायच्या आईची भूमिका नादिरा यांनी साकारली होती. याशिवाय मीनाक्षी, जय हो, घायल वन्स अगेन यासारख्या सिनेमांमध्ये त्या अलिकडच्या काळात झळकल्या. अ मॅरिड वूमन या वेब सीरीजमध्येही त्या झळकत आहेत. (Smita Patil Raj Babbar Anup Soni)

मुलगा आर्य बब्बर

आर्य हा नादिरा आणि राज बब्बर यांचा मुलगा. 39 वर्षीय आर्य बब्बरने 2002 मध्ये ‘अब के बरस’ सिनेमातून बॉलिवूडची दारं ठोठावली. मणीरत्नम, मधुर भांडारकर, विक्रम भट यांच्यासारख्या दिग्गज दिग्दर्शकांसोबत त्याने काम केलं आहे. थोडा तुम बदलो थोडा हम, जेल, गुरु, तीस मार खान, रेड्डी, डेंजरस इश्क अशा हिंदी सिनेमांसह पंजाबी चित्रपटातही त्याने भूमिका केल्या. 2014 मध्ये बिग बॉसच्या 8 व्या सिझनमध्ये तो सहभागी झाला होता. मात्र मनोरंजन विश्वात त्याला म्हणावं तसं यश मिळालं नाही.

मुलगी जुही बब्बर

जुही नादिरा आणि राज बब्बर यांची कन्या. जुहीनेही आर्यपाठोपाठ 2003 मध्ये ‘काश आप हमारे होते’ या सिनेमातून प्रसिद्ध पार्श्वगायक सोनू निगमसोबत हिंदी सिनेविश्वात पाऊल ठेवलं. तिने जेमतेम चार हिंदी सिनेमा आणि एका पंजाबी चित्रपटात काम केलं. त्यापैकी अय्यारी वगळता एकाही सिनेमाचं नाव लक्षात राहिलेलं नाही. तर ‘घर की बात’ (2009) या NDTV इमॅजिनवरील मालिकेतून तिने छोट्या पडद्यावरही नशीब आजमावलं. मात्र तिथेही तिच्या वाट्याला प्रसिद्धी आली नाही.

जुहीचा दुसरा विवाह

पटकथा लेखक बिजॉय नांबियारसोबत जुहीने 27 जून 2007 रोजी विवाह केला. मात्र अवघ्या दीड वर्षात ते विभक्त झाले. जानेवारी 2009 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. आई नादिरा बब्बर यांच्या एका नाटकाच्या निमित्ताने जुहीची ओळख अभिनेता अनुप सोनीसोबत झाली. त्यावेळी अनुपचं रितुशी लग्न झालं होतं. त्यांना झोया आणि मायरा या दोन मुलीही आहेत. मात्र अनुप आणि जुही एकमेकांच्या प्रेमात पडले. दहा वर्षांच्या संसारानंतर अनुपने रितूपासून घटस्फोट घेतला. त्यानंतर 14 मार्च 2011 रोजी जुही-अनुपचा विवाह झाला. 2012 मध्ये त्यांचा मुलगा इमानचा जन्म झाला.

क्राईम पेट्रोलचा हिरो अनुप सोनी

अनुप सोनी हा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा पासआऊट आहे. त्याने शांती, सी हॉक्स, साया यासारख्या मालिकांमधून अभिनयाला सुरुवात केली. मात्र क्राईम पेट्रोल या गुन्हेविषयक सिरीअलच्या सूत्रसंचालनासाठी तो नावाजला गेला. जवळपास आठ वर्ष त्याने या शोचं अँकरिंग केलं. त्याच्याशिवाय या कार्यक्रमाची कल्पनाही चाहत्यांना करवत नाही. अनुप सोनी पर एपिसोड नाही, तर पर किलोमीटरनुसार मानधन घेतो, असे विनोदही अनुपच्या ‘वॉकिंग स्टाईल अँकरिंग’मुळे केले गेले.

बालिका वधू मालिकेत त्याने जग्याच्या वडिलांची केलेली भूमिकाही गाजली. तर सीआयडी – स्पेशल ब्यूरोमध्ये एसीपी अजातशत्रूची व्यक्तिरेखा त्याने साकारली. याशिवाय गॉडमदर, फिजा, राज, गंगाजल, अपहरण यासारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. नुकताच तो सैफ अली खानसोबत तांडव या वेब सीरीजमध्ये दिसला.

स्मिता-राज यांच्या प्रेमाचे ‘प्रतीक’ 

प्रतीक बब्बर हा स्मिता पाटील आणि राज बब्बर यांचा मुलगा. त्याने 2008 मध्ये जाने तू या जाने ना या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण केलं. त्यानंतर दम मारो दम, आरक्षण, धोबी घाट, बागी 2, छिछोरे अशा सिनेमामध्ये तो झळकला. 2011 मध्ये तो एक दिवाना था सिनेमातील सहअभिनेत्री एमी जॅक्सनच्या प्रेमात पडला. मात्र वर्षभरात त्यांचं ब्रेकअप झालं. 2019 मध्ये तो गर्लफ्रेण्ड सान्या सागरसोबत विवाहबंधनात अडकला. प्रतीक आणि राज बब्बर यांच्या कुटुंबाचे स्नेहपूर्ण संबंध असल्याचं पाहायला मिळतं.

प्रतीक आणि जुही बब्बर यांचे फोटो

View this post on Instagram

A post shared by prateik babbar (@_prat)

संबंधित बातम्या :

Prateik Babbar | आईला दिली हृदयात जागा! प्रतीक बब्बरने छातीवर कोरला स्मिता पाटीलच्या नावाचा टॅटू

(Actress Smita Patil Actor Politician Raj Babbar Marriage Love Affair Story Relation with Actor Anup Soni)

डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.