‘सलमान खानने मला फसवलं’, एक्स-गर्लफ्रेंड असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने सोडले ब्रेकअपवर मौन!

बॉलिवूडचा ‘दबंग’ सलमान खानची (Salman Khan) एक्स-गर्लफ्रेंड सोमी अलीने (Somy Ali) वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी मनोरंजन विश्वात आपले नाव गाजवले होते. काही चित्रपटात काम केल्यानंतर आणि सलमानबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर सोमी भारत सोडून निघून गेली.

‘सलमान खानने मला फसवलं’, एक्स-गर्लफ्रेंड असलेल्या ‘या’ अभिनेत्रीने सोडले ब्रेकअपवर मौन!
सलमान खान-सोमी अली
Follow us
| Updated on: Mar 31, 2021 | 1:02 PM

मुंबई : बॉलिवूडचा ‘दबंग’ सलमान खानची (Salman Khan) एक्स-गर्लफ्रेंड सोमी अलीने (Somy Ali) वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी मनोरंजन विश्वात आपले नाव गाजवले होते. काही चित्रपटात काम केल्यानंतर आणि सलमानबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर सोमी भारत सोडून निघून गेली. भारत सोडल्यानंतर ती मायमीमध्ये जाऊन स्थायिक झाली. आता सलमान खानबरोबरच्या ब्रेकअपला अनेक वर्ष झाल्यानंतर या प्रकरणावर मौन सोडत, सलमान खानने आपली फसवणूक केल्याचा आरोप तिने केला आहे (Actress Somy Ali blames Salman Khan for breakup).

चित्रपट कारकीर्दीपासून ब्रेकअपपर्यंतचा प्रवास

90च्या दशकात बॉलिवूडमध्ये अभिनेत्री सोमी अलीने काही मोजक्या चित्रपटांद्वारे आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यावेळी सलमान खानबरोबरच्या तिच्या नात्यामुळे ती अजूनही चर्चेत असते. आता एका प्रसिद्ध वेबसाईटला मुलाखत देताना सोमी अलीने सलमानशी ब्रेकअपपासून, तिच्या आयुष्याविषयी आणि करिअरविषयी अनेक मोठे खुलासे केले आहेत.

त्याने मला फसवलं : सोमी

या मुलाखतीत सोमी म्हणाली, ‘माझा त्याच्याबरोबर ब्रेकअप झाल्याला आता 20 वर्षे झाली आहेत. त्याने माझी फसवणूक केली आणि म्हणूनच मी त्याच्यापासून दूर गेले. त्यानंतर मी इथून निघून गेले.’ पुढे ती असेही म्हणाली की, गेल्या 5 वर्षांपासून ती सलमानशी बोलली देखील नाहीय. आपला मुद्दा पुढे करत सोमी म्हणाली, ‘मी बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी भारतात आले नव्हते. जर, माझा माझ्या एक्सबरोबर ब्रेकअप झाला असेल तर, मी येथेच राहण्याचे कोणतेही कारण माझ्याकडे नव्हते.’

इंडस्ट्रीमध्ये कमबॅक करणार?

View this post on Instagram

A post shared by Somy Ali (@realsomyali)

जेव्हा सोमी अली यांना विचारले गेले की, ती बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्याचा विचार करते आहे का? किंवा पुन्हा चित्रपट करू शकते का?  तेव्हा उत्तरादाखल ती म्हणाली, ‘नाही, मला चित्रपटात काही रस नाही. मी या इंडस्ट्रीत फिट बसत नाही.'(Actress Somy Ali blames Salman Khan for breakup)

16व्या वर्षी भारतात आली सोमी!

सोमी अलीच्या म्हणण्यानुसार, वयाच्या 16व्या वर्षी म्हणजेच 1991मध्ये ती भारतात आली होती. कारण तिला सलमान खानशी लग्न करून, संसार थाटायचा होता. हे नाते फार काळ टिकू शकले नाही, ज्यानंतर दोघांनी 1999मध्ये ब्रेकअप केले. त्यानंतर सोमी पुन्हा अमेरिकेत अभ्यास करण्यासाठी निघून गेली.

‘या’ चित्रपटांमध्ये केले काम!

पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या सोमीने अंत (1994), कृष्णा अवतार (1993), यार गद्दार (1994), तीसरा कौन? (1994) या बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले होते.

सध्या काय करते सोमी अली?

सोमी अली सध्या ‘नो मोअर टीआर’ नावाचा एक एनजीओ चालवते. या स्वयंसेवी संस्थेअंतर्गत ती भारत, पाकिस्तान आणि अमेरिकेतील लैंगिक, मानसिक आणि शारीरिक शोषणाच्या बळी ठरलेल्या महिलांचे पुनर्वसन करून, त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत करते.

(Actress Somy Ali blames Salman Khan for breakup)

हेही वाचा :

Sonu Sood | शाकाहारी अन्न खाऊन सोनूने बनवली पिळदार शरीरयष्टी, नवा फोटो पाहून चाहतेही झाले मुग्ध!

Aai Majhi Kalubai | वीणाची एक्झिट, ‘या’ अभिनेत्रीची ‘आर्या’ म्हणून एंट्री! सोशल मीडियावर शेअर केला खास लूक

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.