Video| कंगना रनौत-तापसी पन्नूची दिलजमाई? पुरस्कार सोहळ्यात तापसीकडून कंगनाची स्तुती!

अलीकडेच, तापसीला ‘थप्पड’ या चित्रपटाबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार घेताना, तापसीने तिच्या भाषणात बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींचे आभार मानले.

Video| कंगना रनौत-तापसी पन्नूची दिलजमाई? पुरस्कार सोहळ्यात तापसीकडून कंगनाची स्तुती!
Follow us
| Updated on: Apr 10, 2021 | 11:05 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) सध्या खूप चर्चेत आहे. तिचा प्रत्येक चित्रपट हा प्रेक्षकांवर वेगळा ठसा उमटवतो. मग तो बदला असो की थप्पड. अलीकडेच, तापसीला ‘थप्पड’ या चित्रपटाबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार घेताना, तापसीने तिच्या भाषणात बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींचे आभार मानले. ज्यामध्ये तिने कंगना रनौत (Kangana Ranaut) हिचे नाव देखील घेतले आहे. कंगना आणि तापसीच्या ट्विटर युद्धाबद्दल सर्वांनाच माहिती आहे. परंतु, यावेळी कंगनाची प्रशंसा ऐकून चाहते हैराण झाले आहेत. प्रत्येकाला असे वाटते आहे की, या दोघी एकमेकींच्या मैत्रिणी झाल्या आहेत (Actress Taapsee Pannu and Kangana Ranaut praised each other).

अभिनेत्री तापसी पन्नूने आपल्या भाषणात अभिनेत्री दीपिका पदुकोण, विद्या बालन, जान्हवी कपूर आणि कंगना रनौत यांचे आभार मानले आहेत. ती म्हणाली, ‘कंगना सीमारेषा आणखी पुढे आणल्याबद्दल धन्यवाद. आपल्या उत्कृष्ट अभिनयासह आपण दरवर्षी नवीन बेंचमार्क सेट करत आहात.’

पाहा व्हिडीओ :

View this post on Instagram

A post shared by Filmfare (@filmfare)

कंगनाचे उत्तर

(Actress Taapsee Pannu and Kangana Ranaut praised each other)

तापसीने कौतुक केल्यानंतर कंगना स्वत:चा प्रतिउत्तर देण्यापासून थांबवू शकली नाही. तिनेदेखील ट्विट करुन तापसीचे आभार मानले. कंगनाने लिहिले, ‘थँक्स यू तापसी, तू विमल फिल्मफेअर अवॉर्डसाठी पात्र आहेस. यावर तुझ्या इतका दुसऱ्या कोणाचा हक्क नाही.’

ट्विटरवर युद्ध सुरूच!

तापसी पन्नू आणि कंगना रनौत यांचे ट्विटर वॉर अजूनही सुरूच आहे. दोघीही थेट किंवा नावे न घेता एकमेकींवर टीका करत असतात. कंगना बर्‍याचदा तापसीला ‘सस्ती कॉपी’ म्हणते. एवढेच नव्हे तर तिने तापसीला अनेक वेळा बी ग्रेड अभिनेत्री देखील म्हटले आहे. नुकताच तापसीच्या घरावर इन्कमटॅक्सची धाड पडली होती. तीन दिवस चाललेल्या या छाप्यानंतर, तापसी यांनी ट्विट केले होते की, ‘गेल्या तीन दिवसांत प्रामुख्याने तीन गोष्टींचा तपास लागला आहे.1. पॅरिसमध्ये असलेल्या कॅथिक बंगल्याची किल्ली, कारण मी तिथे उन्हाळ्याच्या सुट्टी साजरी करते. 2. पाच कोटी पावती जे भविष्यासाठी आहे. 3. अर्थमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार 2013 मधील माझ्या इथे पडलेल्या छापाच्या आठवणी. आता मी स्वस्त नाही.’(Actress Taapsee Pannu and Kangana Ranaut praised each other)

कंगना रनौत यांनी तापसीच्या या ट्विटला उत्तर दिले होते की, ‘तु नेहमीच ‘सस्ती कॉपी’ राहशील. कारण, तुम्ही सर्व बलात्कारी लोकांचे स्त्रीवादी आहात. तुमचा रिंग मास्टर अनुराग कश्यप याने कर चोरी केली होती. सरकारी अधिकारी असे म्हणतात की, आपण निर्दोष असाल तर न्यायालयात जा आणि पुरावा द्या.’

वर्कफ्रंटबद्दल बोलताना कंगना रनौत लवकरच ‘थलायवी’ चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 23 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणामुळे तो पुढे ढकलण्यात आला आहे. त्याचवेळी, तापसी तिच्या आगामी चित्रपटाच्या ‘शाब्बास मिट्टू’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. हा चित्रपट भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजचा बायोपिक आहे.

(Actress Taapsee Pannu and Kangana Ranaut praised each other)

हेही वाचा :

Happy Birthday Ayesha Takia | लग्नानंतर चित्रपटसृष्टीला गुडबाय, लीप सर्जरीनंतर पुन्हा एकदा चर्चेत आली अभिनेत्री आयेशा टाकिया!

बंगालच्या निवडणुकीत राजकारण पेटलेलं असताना खासदार नुसरत जहांचा हॉट फोटो व्हायरल, चर्चांना उधाण

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.