यशराज फिल्म्सच्या ‘गोल्डन ज्युबिली’ सोहळ्याचे पैसे ‘या’ कामासाठी वापरणार, आदित्य चोप्रांचे कौतुकास्पद पाऊल!  

‘यशराज फिल्म्स’ने (Yash Raj Films) हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या स्थापनेला 50 वर्षे पूर्ण केली आहेत. अशा परिस्थितीत यशराज फिल्म्सद्वारे जगभरात सेलिब्रेशनसाठी तयारी (YRF50) सुरू होती.

यशराज फिल्म्सच्या ‘गोल्डन ज्युबिली’ सोहळ्याचे पैसे ‘या’ कामासाठी वापरणार, आदित्य चोप्रांचे कौतुकास्पद पाऊल!  
यश राज फिल्म्स
Follow us
| Updated on: May 14, 2021 | 11:18 AM

मुंबई : ‘यशराज फिल्म्स’ने (Yash Raj Films) हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या स्थापनेला 50 वर्षे पूर्ण केली आहेत. अशा परिस्थितीत यशराज फिल्म्सद्वारे जगभरात सेलिब्रेशनसाठी तयारी (YRF50) सुरू होती. परंतु, आता या सोहळ्याला खर्च होणारे सर्व पैसे कोरोनाग्रस्त लोकांच्या मदतीसाठी आणि त्यांच्या उपचारासाठी खर्च करण्याचा निर्णय आदित्य चोप्रा यांनी घेतला आहे. आदित्य चोप्रा (Aditya Chopra) यांनी असा निर्णय घेतला आहे की, ते या सोहळ्याचा सर्व पैसा कोरोना बाधित लोकांसाठी खर्च करतील. आदित्य यांच्या या धाडसी पावलाचे खूप कौतुक केले जात आहे (Aditya Chopra donate YRF50 celebration money to corona patients).

यशराज फिल्म्सने आत्तापर्यंत एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट प्रेक्षकांसमोर सादर केले आहेत. अशा परिस्थितीत आता यशराज फिल्म्स लोकांच्या मदतीसाठी पुढे सरसावली आहे. यशराज फिल्म्सने आपल्या या सोहळ्याच्या कोट्यवधींच्या बजेटमधून लोकांना अन्न पुरवण्यास सुरुवात केली आहे. मुंबईच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये असलेल्यांना या खर्चातून जेवण पुरवले जात आहे.

आदित्य चोप्रा यांचे कौतुकास्पद पाऊल

गेल्या वर्षीच यशराज फिल्म्सच्या स्थापनेची 50 भव्य वर्षे पूर्ण केली आहेत. या 50 वर्षात यश राज यांनी चाहत्यांसाठी अनेक प्रकारचे सुपर हिट चित्रपट सादर केले आहेत. अशा परिस्थितीत कंपनीची 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या आनंदात या संस्थेचे सर्वेसर्वा आदित्य चोप्रा यांनी हा सोहळा मोठ्या जोशात साजरा करण्याचा विचार केला होता आणि त्यासाठी मोठे बजेटही निश्चित करण्यात आला होता.

आता मिळालेल्या माहितीनुसार, आता कोरोनाचा कहर लक्षात घेता हा उत्सव यापुढे साजरा केला जाणार नाही. तसेच, चित्रपट उद्योग पुन्हा बंद झाल्यामुळे दैनंदिन कामगारांना दिलासा मिळावा म्हणून ‘वायआरएफ 50’ साजरा करण्यासाठी असलेले संपूर्ण बजेट या कामगारांसाठी खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जेव्हा ही बातमी समोर आली, तेव्हापासून आदित्यचे खूप कौतुक होत आहे (Aditya Chopra donate YRF50 celebration money to corona patients).

कामगारांना आर्थिक मदतही देणार

यशराज स्टुडिओमध्ये काम करणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांसाठी जेवण बनवणाऱ्या टीमने शूटिंग थांबले असले तरी, पुन्हा एकदा काम सुरू केले आहे. बातमीनुसार, वायआरएफ स्टुडिओने यशराज फाऊंडेशनच्या वतीने गोरेगावमधील हजारो कामगारांना भोजन दिले आहे आणि हे काम वेगवेगळ्या ठिकाणी सुरू आहे.

यश राज फिल्म्सने गेल्या आठवड्यात ‘यश चोपड़ा साथी इनिशिएटिव्ह’ देखील सुरू केला, ज्याचे उद्दीष्ट मनोरंजन विश्वातील हजारो कामगारांना आर्थिक मदत देण्याचे आहे. या उपक्रमांतर्गत मनोरंजन विश्वातील महिला व ज्येष्ठ नागरिकांना 5000 रुपये देण्यात येणार आहेत. यासोबतच रेशनही लोकांना वाटप केले जाणार आहे.

(Aditya Chopra donate YRF50 celebration money to corona patients)

हेही वाचा :

Happy Birthday : ‘मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लरचा वाढदिवस, बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजाचे आहेत लाखो चाहते

Video | कोरोना लसीकरणादरम्यान हजार नखरे, ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री सोशल मीडियावर जोरदार ट्रोल!

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.