Sooryavanshi : ‘सूर्यवंशी’चे ‘मेरे यारा’ गाणे चाहत्यांच्या भेटीला, अक्षय कुमार-कतरिना कैफ दिसले रोमँटिक अंदाजात!

दोन वर्षांनंतरही अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या ‘सूर्यवंशी’ (Sooryavanshi) या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता कायम आहे. प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाविषयीची उत्कंठा कायम राहावी, याची पूर्ण काळजी चित्रपटाचे निर्माते घेत आहेत.

Sooryavanshi : ‘सूर्यवंशी’चे ‘मेरे यारा’ गाणे चाहत्यांच्या भेटीला, अक्षय कुमार-कतरिना कैफ दिसले रोमँटिक अंदाजात!
Akshay-Katrina
Follow us
| Updated on: Oct 27, 2021 | 12:36 PM

मुंबई : दोन वर्षांनंतरही अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या ‘सूर्यवंशी’ (Sooryavanshi) या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता कायम आहे. प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाविषयीची उत्कंठा कायम राहावी, याची पूर्ण काळजी चित्रपटाचे निर्माते घेत आहेत. दरम्यान, अक्षय कुमार आणि कतरिना कैफ यांच्यात चित्रित केलेले ‘मेरे यारा’ हे रोमँटिक गाणे नुकतेच रिलीज झाले आहे.

अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री कतरिना कैफच्या या रोमँटिक गाण्याला अरिजित सिंग आणि नीती मोहन यांनी आवाज दिला आहे. या गाण्यात अक्षय आणि कतरिनाची रोमँटिक स्टाईल पाहायला मिळत आहे. या गाण्यादरम्यान कतरिना साडीत दिसली आहे. या गाण्याची लोकेशन्स खूपच सुंदर दिसत आहेत. अ‍ॅक्शनने भरलेल्या या चित्रपटात हे गाणे चाहत्यांना नक्की आवडेल. या गाण्याचे बोल रश्मी विराग यांनी लिहिले असून संगीतकार कौशिक-गुड्डू-आकाश आहेत. गेल्या काही दिवसांपासून अक्षयने या चित्रपटाशी संबंधित अनेक पोस्टर्स आणि व्हिडिओ शेअर करून प्रमोशन सुरू केले आहे.

पाहा गाणे :

आतापर्यंत दोन गाणी प्रेक्षकांच्या भेटीला

नुकतेच, निर्मात्यांनी या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे, ज्यामध्ये त्यांनी प्रेक्षकांना चित्रपटगृहात येऊन चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टी या चित्रपटाच्या प्रमोशनशी संबंधित सर्व गोष्टींवर विशेष लक्ष ठेवून आहे. या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर तयार होऊनही रिलीज झालेला नाही. ट्रेलर रिलीज झाल्यावर चित्रपटाची संपूर्ण कथा समोर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला जात आहे. त्यामुळेच या चित्रपटातील गाण्यांमधून तो प्रेक्षकांचा उत्साह कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचे पहिले गाणे ‘आयला रे आला’ हा डान्स नंबर रिलीज होताच, व्हायरल झाला होता. हे गाणे खूप पसंत केले जात आहे. दरम्यान, हा रोमँटिक ट्रॅकही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाचे आणखी एक गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, जे या चित्रपटातील सर्वोत्कृष्ट गाणे असणार आहे.

रोहित शेट्टी दिग्दर्शित सूर्यवंशी 5 नोव्हेंबर 2021 रोजी दिवाळीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत आहेत. यासोबतच अजय देवगण आणि रणवीर सिंग कॅमिओ करताना दिसणार आहेत. सध्या, अक्षय कुमार ऊटीमध्ये राम सेतू चित्रपटाचे शूटिंग करत आहे, म्हणून कतरिना कैफ आणि रोहित शेट्टी यांनी चित्रपटाच्या प्रमोशनची जबाबदारी घेतली आहे.

हेही वाचा :

अर्सलान गोनीसोबतच्या नात्यावर शिक्कामोर्तब? बर्थडे पोस्टवर सुझान खानच्या प्रतिक्रियेने रंगल्या चर्चा!

‘अजिंक्य आला रे!!’, प्रार्थना बेहेरे आणि भूषण प्रधानचा ‘अजिंक्य’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला…

Vicky Kaushal and Katrina Kaif : लग्नाच्या बातम्यांदरम्यान एकत्र स्पॉट झाले विकी कौशल आणि कतरिना कैफ, पाहा फोटो

चार धाम यात्रेवरून परतल्यानंतर समंथा रमली नव्या छंदात, सोशल मीडियावर शेअर केले सुंदर फोटो…

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.