AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Akshay Kumar | अक्षय कुमारने सुरु केले ‘राम सेतु’चे चित्रीकरण, लूकविषयी सांगताना म्हणाला…

या नव्या लूकमध्ये अक्षय कुमार लांब केसांमध्ये दिसत आहे, डोळ्यांवर चष्मा आणि गळ्यात स्कार्फ परिधान केला आहे. अक्षयने या लूकचा फोटो शेअर करताच चाहत्यांनी त्यांचे खूप कौतुक केले आहे.

Akshay Kumar | अक्षय कुमारने सुरु केले ‘राम सेतु’चे चित्रीकरण, लूकविषयी सांगताना म्हणाला...
अक्षय कुमार
| Updated on: Mar 30, 2021 | 1:03 PM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) नेहमीच आपल्या चित्रपटांसाठी चर्चेत असतो. खिलाडी कुमार सध्या त्याच्या आगामी ‘राम सेतु’ (Ram Setu) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अक्षयने नुकतीच अयोध्येला भेट दिली होती. या दरम्यान चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पार पडला. अक्षयसमवेत ‘राम सेतु’ या चित्रपटात अभिनेत्री नुसरत भरुचा आणि जॅकलिन फर्नांडिसही दिसणार आहेत. ‘राम सेतु’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला आजपासून (30 मार्च) सुरूवात झाली आहे (Akshay Kumar start shooting for upcoming film ram setu share his first look).

नुकताच अक्षय कुमारने चित्रपटामधील आपल्या लूकचा एक फोटो चाहत्यांसाठी शेअर केला आहे. अक्षयने इंस्टाग्रामवर एका पोस्टद्वारे चाहत्यांना सांगितले की, त्याच्या राम सेतु चित्रपटाचे चित्रीकरण आजपासून सुरू झाले आहे.

पाहा अक्षयची पोस्ट

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

अक्षय कुमारे स्वतः पुष्टी केली की, राम सेतु चित्रपटाचे शूटिंग आजपासून म्हणजेच 30 मार्चपासून सुरू झाले आहे आणि हा चित्रपट त्यांच्यासाठी खूप खास आहे. या चित्रपटाशी निगडित आपला एक लूक शेअर करत अक्षयने लिहिले आहे की, ‘माझ्यासाठी सर्वात खास चित्रपट बनवण्याचा प्रवास आजपासून सुरू होत आहे. राम सेतुचे शुटिंग सुरू! मी चित्रपटात पुरातत्वशास्त्रज्ञाची भूमिका साकारत आहे. माझ्या या लूकवर आपले विचार ऐकायला मला आवडतील…हे माझ्यासाठी नेहमीच महत्त्वाचे आहे.’

या नव्या लूकमध्ये अक्षय कुमार लांब केसांमध्ये दिसत आहे, डोळ्यांवर चष्मा आणि गळ्यात स्कार्फ परिधान केला आहे. अक्षयने या लूकचा फोटो शेअर करताच चाहत्यांनी त्यांचे खूप कौतुक केले आहे. अक्षयची ही खास शैली त्याच्या चाहत्यांना खूप आवडली आहे (Akshay Kumar start shooting for upcoming film ram setu share his first look).

अक्षयने शेअर केला ‘मुहूर्ता’चा खास फोटो!

अलीकडेच अक्षय कुमारने आपल्या इंस्टाग्रामवर एक खास फोटो शेअर केला होता, ज्यात संपूर्ण राम दरबार दिसत आहे. हा फोटो राम सेतु चित्रपटाच्या मुहूर्ताचा होता. या फोटोमुळे मुहूर्त पूजा पार पडली असल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणजेच हा फोटो अक्षयच्या नव्या चित्रपटाची सुरूवात आहे. यासह अक्षयने एक खास कॅप्शनही लिहिले आहे.

फोटो शेअर करत अक्षय कुमार याने लिहिले आहे की, ‘आज श्री अयोध्या जी में फ़िल्म “रामसेतु” के शुभारंभ पर भगवान श्री राम का आशीर्वाद प्राप्त हुआ। जय श्री राम!’ अक्षयची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे. या पोस्टद्वारे चाहते ‘राम सेतु’साठी खिलाडी कुमारला शुभेच्छा देत आहेत.

अयोध्येत होणार चित्रीकरण

चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक शर्मा यांनी सांगितले की, येत्या काही महिन्यांत चित्रपटाचे 80 टक्के शेड्युल अयोध्येत शूट केले जाईल. त्यानंतरच्या शेड्युलचे शूटिंग मुंबईत होणार आहे. या चित्रपटात अक्षय पूर्णपणे वेगळ्या अवतारात दिसणार असल्याचेही दिग्दर्शकाने सांगितले आहे. अक्षयच्या चाहत्यांना ‘राम सेतु’मधील त्याचा नवा लूक आणि नवे पात्र लवकरच पाहायला मिळणार आहे.

अक्षयच्या चित्रपटांची रांग!

अक्षय कुमारने नुकतेच आपल्या आगामी ‘बच्चन पांडे’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. त्याचा ‘सूर्यवंशी’ही रिलीजसाठी सज्ज झाला आहे. सूर्यवंशीची रिलीज डेट समोर आली आहे. हा चित्रपट 30 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षयसोबत कॅटरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ज्याचे प्रमोशन अक्षय त्याच्या खास स्टाईलमध्ये करतो आहे. याशिवाय अक्षय ‘बेलबॉटम’, ‘अतरंगी रे’, ‘रक्षाबंधन’, ‘पृथ्वीराज’ आणि ‘हाऊसफुल 5’ सारख्या चित्रपटांतून आपले मनोरंजन करणार आहे.

(Akshay Kumar start shooting for upcoming film ram setu share his first look)

हेही वाचा :

TMKOC | ‘आमच्यात वाद? भांडण? छे…!’, ‘जेठालाल’शी ऑफस्क्रीन वादावर ‘तारक मेहता’ म्हणतात…  

Rashmika Mandanna | बिग बींसोबत स्क्रीन शेअर करणार ‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदना, लवकरच चित्रीकरणाला होणार सुरुवात!

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.