Akshay Kumar | अक्षय कुमार पुढचे दोन महिने गुजरातमध्ये, सुरु करणार ‘राम सेतु’चं नवं शेड्युल!

बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमारकडे (Akshay Kumar) सध्या अनेक मनोरंजक प्रकल्प आहेत. 'राम सेतु' हा त्याच्या अनेक चित्रपटांपैकी एक आहे, ज्याची अक्षय कुमारचे चाहते वाट पाहत आहेत. आजकाल अक्षय लंडनमध्ये रकुल प्रीत सिंहसोबत त्याच्या अद्याप नाव न ठरलेल्या चित्रपटाचे शूटिंग करत आहे.

Akshay Kumar | अक्षय कुमार पुढचे दोन महिने गुजरातमध्ये, सुरु करणार ‘राम सेतु’चं नवं शेड्युल!
राम सेतु
Follow us
| Updated on: Sep 06, 2021 | 11:33 AM

मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमारकडे (Akshay Kumar) सध्या अनेक मनोरंजक प्रकल्प आहेत. ‘राम सेतु’ हा त्याच्या अनेक चित्रपटांपैकी एक आहे, ज्याची अक्षय कुमारचे चाहते वाट पाहत आहेत. आजकाल अक्षय लंडनमध्ये रकुल प्रीत सिंहसोबत त्याच्या अद्याप नाव न ठरलेल्या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. तो लवकरच भारतात परतणार आहे आणि त्याच्या आगामी ‘राम सेतू’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अक्षय ऑक्टोबरमध्ये ‘राम सेतु’ चित्रपटाचे शूटिंग सुरू करेल आणि या वर्षी डिसेंबरपर्यंत चित्रपट पूर्ण करेल. अक्षयने मार्चमध्ये अयोध्येत या चित्रपटाचा मुहूर्त केला होता. यानंतर, त्याला मुंबईत चित्रपटाचे एक लांब शेड्यूल शूट करायचे होते, परंतु लॉकडाऊनमुळे ते शूटिंग पुढे ढकलण्यात आले. अहवालांनुसार, चित्रपटाचा काही भाग श्रीलंकेत शूट केला जाणार होता, परंतु चित्रपट निर्मात्यांनी आता आपली योजना बदलली आहे.

केरळमधील चित्रीकरण रद्द

त्याच वेळी, केरळमध्ये ‘राम सेतु’ चित्रपटाचे चित्रीकरण करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला होता, परंतु हे राज्य कोरोनाचे हॉटस्पॉट बनल्याने, चित्रपटाच्या निर्मात्यांनी आता चित्रपटाचा एक मोठा भाग गुजरातमध्ये शूट करण्याचा निर्णय घेतला आहे. अक्षय कुमार व्यतिरिक्त नुसरत भरूचा आणि जॅकलिन फर्नांडिस देखील या चित्रपटात दिसणार आहेत.

अभिषेक शर्मा ‘राम सेतु’ दिग्दर्शित करत आहेत. तसे, ‘राम सेतु’ व्यतिरिक्त, अक्षय कुमारच्या हातात अनेक चित्रपट आहेत. त्याने यापूर्वी ‘पृथ्वीराज’, ‘रक्षाबंधन’ आणि ‘अतरंगी रे’साठी चित्रीकरण केले आहे. याशिवाय त्याच्याकडे ‘बच्चन पांडे’ आणि ‘सूर्यवंशी’ सारखे अनेक चित्रपट आहेत.

नवा लूक चाहत्यांच्या पसंतीस

‘राम सेतु’ हा चित्रपट अक्षय कुमारसाठी खूप खास आहे. या चित्रपटाशी निगडित आपला एक लूक शेअर करत अक्षयने लिहिले होते की, ‘माझ्यासाठी सर्वात खास चित्रपट बनवण्याचा प्रवास लवकरच सुरू होत आहे. राम सेतुचे शुटिंग सुरू! मी चित्रपटात पुरातत्वशास्त्रज्ञाची भूमिका साकारत आहे. माझ्या या लूकवर आपले विचार ऐकायला मला आवडतील…हे माझ्यासाठी नेहमीच महत्त्वाचे आहे.’

या नव्या लूकमध्ये अक्षय कुमार लांब केसांमध्ये दिसला होता, त्याने डोळ्यांवर चष्मा आणि गळ्यात स्कार्फ परिधान केला होता. अक्षयने या लूकचा फोटो शेअर करताच चाहत्यांनी त्यांचे खूप कौतुक केले. अक्षयची ही नवी खास शैली त्याच्या चाहत्यांना खूप आवडली आहे.

अक्षयच्या चित्रपटांची रांग!

अक्षय कुमारने नुकतेच आपल्या आगामी ‘बच्चन पांडे’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. त्याचा ‘सूर्यवंशी’ही रिलीजसाठी सज्ज झाला आहे. सूर्यवंशीची रिलीज डेट समोर आली आहे. हा चित्रपट 30 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षयसोबत कॅटरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ज्याचे प्रमोशन अक्षय त्याच्या खास स्टाईलमध्ये करतो आहे. याशिवाय अक्षय ‘बेलबॉटम’, ‘अतरंगी रे’, ‘रक्षाबंधन’, ‘पृथ्वीराज’ आणि ‘हाऊसफुल 5’ सारख्या चित्रपटांतून आपले मनोरंजन करणार आहे.

हेही वाचा :

Happy Birthday Rakesh Roshan | चित्रपट सुपरहिट व्हावा या नवसामुळे राकेश रोशनने कापले होते केस, मग घेतली ‘ही’ शपथ!

Birthday Special : ‘12/24 करोल बाग’ शोच्या सेटवर पहिली भेट; रिअ‍ॅलिटी शोदरम्यान प्रपोज, वाचा सर्गुन मेहता आणि रवी दुबेची ‘प्यारवाली लव्हस्टोरी’

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.