VIDEO: लग्नानंतरच्या पार्टीमध्ये रणबीर-आलियाने ‘छैय्या-छैय्या’ गाण्यावर धरला ठेका

गेल्या महिन्याभरापासून कलाविश्वात अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या लग्नाची चर्चा रंगत होती. अखेर गुरुवारी (14 एप्रिल) संध्याकाळी ते दोघं लग्नबंधनात अडकले.

VIDEO: लग्नानंतरच्या पार्टीमध्ये रणबीर-आलियाने 'छैय्या-छैय्या' गाण्यावर धरला ठेका
Alia Bhatt, Ranbir Kapoor Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 15, 2022 | 10:02 AM

गेल्या महिन्याभरापासून कलाविश्वात अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या लग्नाची चर्चा रंगत होती. अखेर गुरुवारी (14 एप्रिल) संध्याकाळी ते दोघं लग्नबंधनात अडकले. रणबीर कपूरच्या मुंबईतील ‘वास्तू’ या बंगल्यात हा लग्नसोहळा पार पडला. यावेळी कपूर आणि भट्ट कुटुंबातील मोजके पाहुणे आणि बॉलिवूडमधील काही तारे-तारका उपस्थित होते. बुधवारी 13 एप्रिल रोजी रणबीर-आलियाचा मेहंदीचा कार्यक्रम पार पडला. आता सोशल मीडियावर लग्नसोहळ्यातील काही व्हिडीओ समोर आले आहेत. लग्नानंतरच्या पार्टीमध्ये रणबीर आणि आलिया शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘छैय्या छैय्या’ या गाण्यावर एकत्र नाचले. या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

यावेळी आलिया-रणबीरने लाल रंगाचा पोशाख केला होता. आलियाने लाल रंगाचा अनारकली सूट तर रणबीरने पांढऱ्या कुर्त्यावर लाल रंगाचा जॅकेट परिधान केला होता. या दोघांनी ‘छैय्या छैय्या’ या गाण्यावर ठेका धरला होता. आलिया आणि रणबीरच्या लग्नाच्या चर्चेला सोमवारपासूनच सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये उधाण आलं होतं. आलिया आणि रणबीर यांच्यासोबतच त्यांच्या कुटुंबियांनी या लग्नाविषयी मौन बाळगलं होतं. अखेर बुधवारी रात्री उशिरा मेहंदी आणि संगीत समारंभातून बाहेर पडताना नीतू कपूर आणि रणबीरची बहीण रिधिमा यांनी हे लग्न गुरुवारी, 14 एप्रिल रोजी पार पडणार असल्याचं जाहीर केलं.

पहा रणबीर-आलियाचा डान्स व्हिडीओ-

कपूर आणि भट्ट कुटुंबीय गुरुवारी सकाळीच रणबीरच्या बंगल्यात हजर झाले. करीना कपूर, सैफ अली खान, करिश्मा कपूर, आलिया भट्टची आई सोनी राजदान, मावशी, वडील महेश भट्ट, आलियाच्या बहिणी शाहिन भट्ट आणि पूजा भट्ट, आकाश आणि श्लोका अंबानी, निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, अयान मुखर्जी, अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली अशी अनेक मंडळी या लग्नसोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित होती.

हेही वाचा:

Chirag Patil: सेटवरच्या जेवणाविषयी चिरागने लढवली शक्कल; पाच दिवसांत बदलल्या क्रू मेंबर्सच्या सवयी

Ranbir Alia Wedding: हे असं लग्न लावणं चेष्टा नाय, मंडळी! धाडस लागतं.. धाडस

महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.