Alia Bhatt: ‘बॉयकॉट ब्रह्मास्त्र’च्या ट्रेंडवर आलियाचं भन्नाट उत्तर
ब्रह्मास्त्र हा चित्रपट हिंदीसोबतच तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित हा चित्रपट तब्बल 410 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. यामध्ये शाहरुख खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार आहे.
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचा ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) हा चित्रपट उद्या म्हणजेच 9 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणबीर-आलियासोबतच अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून ‘बॉयकॉट’ची (Boycott) मागणी होत आहे. रणबीरने जुन्या मुलाखतीत गोमांसबद्दल केलेल्या वक्तव्यावरून चित्रपटावर बहिष्काराची जोरदार मागणी होतेय. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान आलियाला याविषयीच प्रश्न विचारला गेला. “सध्याच्या वातावरणाविषयी तुझं काय मत आहे”, असं तिला विचारलं गेलं.
या प्रश्नाचं उत्तर देताना आलिया म्हणाली, “कोणतं वातावरण? उन्हाळा की हिवाळा? अशी कोणतीच गोष्ट नाही. चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी हे सुंदर वातावरण आहे. सध्या आपल्याला सुरक्षित आणि निरोगी राहण्याची गरज आहे. आपल्याला जे आयुष्य मिळालंय, त्याबद्दल आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे. तुम्ही असं काही बोलू नका, अशा चर्चा पसरवू नका. सध्या नकारात्मक वातावरण नाही, उलट सर्व सकारात्मक आहे.”
View this post on Instagram
“थिएटरमध्ये आम्ही पुन्हा चित्रपट प्रदर्शित करू शकतोय याचा खूप आनंद आहे. आम्ही आमचं काम मोकळेपणे करू शकतोय यासाठी कृतज्ञ आहोत. सध्याचं वातावरण हेच आहे की आताच सप्टेंबर महिना सुरू झाला आहे आणि त्यानंतर ऑक्टोबर महिना सुरू होईल”, असंही ती पुढे म्हणाली.
ब्रह्मास्त्र हा चित्रपट हिंदीसोबतच तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित हा चित्रपट तब्बल 410 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. यामध्ये शाहरुख खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार आहे.