Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | आधी मुक्के मग प्रेम, बॉक्सिंग करताना आमीरच्या लेकीने बॉयफ्रेंडला मारली मिठी!

आयराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, चाहते त्यावर भरभरून कमेंट करत आहेत.

Video | आधी मुक्के मग प्रेम, बॉक्सिंग करताना आमीरच्या लेकीने बॉयफ्रेंडला मारली मिठी!
आयरा खान
Follow us
| Updated on: Apr 13, 2021 | 6:47 PM

मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानची (Amir Khan) लेक आयरा खान (Ira Khan) नेहमीच चर्चेत असते. आयराने काही दिवसांपूर्वी लैंगिक अत्याचार झाल्याचा खळबळजनक खुलासा केला होता. त्यानंतर आयरा खान चर्चेत आली ती तिच्या नव्या नात्यामुळे! आयरा बोयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत नेहमीच फोटो शेअर करत असते. नुकताच आयराने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे (Amir Khan Daughter Ira Khan hugs Boyfriend Nupur Shikhare while boxing session).

या व्हिडीओ ती नुपूर शिखरेसोबत बॉक्सिंग करताना दिसत आहे आणि अचानकच तिने बॉक्सिंग सोडून नुपूर शिखरेला चक्क मिठी मारत आहे. आयराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, चाहते त्यावर भरभरून कमेंट करत आहेत. अनेकजण आयराला विचारताना दिसत आहेत की, अचानक तुला असे काय झाले की, तु नुपूरला मिठी मारलीस…

पाहा व्हिडीओ :

View this post on Instagram

A post shared by Ira Khan (@khan.ira)

रिलेशनशिपची कबुली!

आयराने सोशल मीडियावर नुपूरशी असलेल्या तिच्या नात्याची पुष्टी केली होती. तिने नुपूरबरोबरचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले की, मी तुमच्याबरोबर आहे असे, मी अभिमानाने सांगू शकते. तथापि, नुकतेच आयरा ज्या प्रकारे नुपूरबरोबरचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करते, त्यावरून असे दिसते की आता ती आपले वैयक्तिक जीवन प्रत्येकासह शेअर करण्यास उत्सुक आहे.

काही दिवसांपूर्वी इराच्या चुलत भावाचे लग्न होते. त्यावेळी इराने लग्नाच्या फंक्शनचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. ज्यात नुपूर शिखरे देखील तिच्यासोबत दिसत होता. नुपूर आणि इरा यांची नावे बर्‍याच काळापासून चर्चेत राहिली होती. काही दिवसांपूर्वी नुपूर आणि इरा आमिरच्या फार्म हाऊसवर सुट्ट्यांचा आनंद लुटत होते. या ट्रीपचे फोटोसुद्धा त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते (Amir Khan Daughter Ira Khan hugs Boyfriend Nupur Shikhare while boxing session).

आईशी करून दिली ओळख

आयराने आपली आई रीना दत्ता हिच्याशी नुपूरची ओळख करुन दिली आहे. रीनाला नुपूर खूप आवडला आहे. तिला त्यांच्या नात्यापासून कोणतीही अडचण नाही. काही दिवसांपूर्वी आयरा नुपूरला तिच्या चुलतभावाच्या लग्नालाही घेऊन गेली होती. ती आपल्या संपूर्ण कुटुंबाला नुपूरजवळ आणत आहे.

या व्यक्तीला करत होती डेट

आमीरची लेक आयरा नुपूर शिखरेच्या अगोदर मिशालला डेट करत होती. इराने मिशालबरोबर सोशल मीडियावर बरेच फोटो आणि व्हिडीओ शेअर केले. पण नंतर काही काळानंतर दोघांचा ब्रेकअप झाला.

माझं नाव इरा नाही!

नुकताच आयरा खानने स्वत:चा एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि सांगितले की इरा हे तिचे खरे नाव नाही. तिने सांगितले की, सर्व चाहते आणि तिचे मित्र तिला इरा खान या नावाने हाक मारतात, पण तिचे खरे नाव इरा नसून त्याचा उच्चार आयरा असा आहे.

आयरा खान चित्रपट जगापासून बरीच दूर आहे. ती अद्याप बॉलिवूडमध्ये दाखल झालेली नाही. त्याच वेळी, सन 2019मध्ये ‘युरीपेडस मेडिया’ या नाटकाद्वारे दिग्दर्शकीय पदार्पण केले होते. सध्या ती चित्रपटांपासून दूर असली तरी, सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची यादी खूप मोठी आहे. चाहते तिच्या बॉलिवूड डेब्यूची वाट पाहत आहेत.

(Amir Khan Daughter Ira Khan hugs Boyfriend Nupur Shikhare while boxing session)

हेही वाचा :

Sara Ali Khan | ‘काश्मीर की कली’ बनत साराची धमाल, आई अमृता सिंहसोबत लुटतेय सुट्ट्यांचा आनंद!

स्टेजवर गाता गाताच बोदडेंना पॅरेलिसिसचा अ‍ॅटॅक आला, ग्रामस्थांकडून पै पै जमा; वाचा, पुढे काय घडलं?

खोक्याला वनविभागाच्या कोठडीत जबर मारहाण, अंगावर वळ अन्... फोटो व्हायरल
खोक्याला वनविभागाच्या कोठडीत जबर मारहाण, अंगावर वळ अन्... फोटो व्हायरल.
मुंबईकरांनो काळजी घ्या, कारण उद्यापासून... हवामान खात्यानं काय म्हटलं?
मुंबईकरांनो काळजी घ्या, कारण उद्यापासून... हवामान खात्यानं काय म्हटलं?.
ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं निधन, देशभरात शोककळा
ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं निधन, देशभरात शोककळा.
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात..
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात...
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'.
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल.
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?.
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम.
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?.
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?.