अमिताभ-अजयने ‘Mayday’ चित्रपटाच्या शूटिंगला केली सुरूवात, पाहा सेटवरचे काही खास फोटो!

दरवर्षी बॉलिवूडमध्ये असंख्य चित्रपट बनतात, परंतु जेव्हा त्यांच्या आवडत्या स्टार्सच्या चित्रपटाची घोषणा चाहत्यांसाठी केली जाते, तेव्हा त्यांच्यात एक वेगळीच उत्सुकता असते.

अमिताभ-अजयने 'Mayday' चित्रपटाच्या शूटिंगला केली सुरूवात, पाहा सेटवरचे काही खास फोटो!
Follow us
| Updated on: Feb 07, 2021 | 3:53 PM

मुंबई : दरवर्षी बॉलिवूडमध्ये असंख्य चित्रपट बनतात, परंतु जेव्हा त्यांच्या आवडत्या स्टार्सच्या चित्रपटाची घोषणा केली जाते, तेव्हा चाहत्यांमध्ये एक वेगळीच उत्सुकता असते. बर्‍याच मोठ्या सेलेब्स सध्या त्यांच्या मेगा बजेटच्या चित्रपटाचे शूटिंग करत आहेत. या यादीमध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)  आणि अजय देवगन (Ajay Devgn) यांचा देखील समावेश आहे. पुन्हा एकदा अमिताभ बच्चन आणि अजय देवगनसोबत काम करणार आहेत. तेव्हापासून चाहते चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. आता या दोघांनीही त्यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. (Amitabh Bachchan and Ajay Devgn have started shooting for the movie ‘Mayday’)

ajay devgan 1

खास गोष्ट म्हणजे अजय देवगन पहिल्यांदाच अमिताभ यांना दिग्दर्शकाच्या खुर्चीवर बसवून दिग्दर्शन करणार आहे. अजय आणि अमिताभ यांच्या या चित्रपटाचे नाव Mayday आहे. इतकेच नाही तर अजय देवगन चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत, त्याशिवाय तो या चित्रपटात पायलटची भूमिका साकारतानाही दिसणार आहे. बर्‍याच दिवसानंतर पुन्हा एकदा अमिताभ आणि अजय एकत्र काम करणार आहेत. आता या चित्रपटाचे अंतिम शूटिंग सुरू झाले आहे.

ajay devgan 2

नुकताच चित्रपटाच्या सेटचे फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये अजय आणि अमिताभ  दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये अजय स्वतः एअरफोर्सच्या लूकमध्ये दिसला आहे, तर अमिताभ हे ब्लॅक सूटमध्ये दिसत आहेत. क्रूचे बाकीचे सदस्यही या दोघांच्या आसपास दिसतात. अजय आणि अमिताभ बच्चन यांनी यापूर्वी मेजर साहब, हिंदुस्तान की कसम, खाकी, आग, सत्याग्रह अशा चित्रपटांमध्ये काम केले आहे.

संबंधित बातम्या : 

कन्यारत्न झाल्यानंतरचा अनुष्का शर्माचा ग्लॅमरस लूक बघितला का?

Video | कोच रिकामा, मग मराठी अभिनेत्रीचं छय्यां छय्यां, पहा व्हिडीओ !

Mirzapur | ‘मिर्झापूर’ वेब सीरिजच्या निर्मात्यांच्या अडचणीत वाढ!

(Amitabh Bachchan and Ajay Devgn have started shooting for the movie ‘Mayday’)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.