याला बोलतात मजबूत आहेर! अनंत अंबानीला लग्नात मिळाली 3 कोटींची कार, प्राइवेट जेट, हेलिकॉप्टर अन्… झुकरबर्गचं गिफ्ट एकदम स्पेशल

विशेष म्हणजे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांनाही लग्नात आहेर म्हणून अत्यंत महागड्या कोट्यवधी किंमत असलेला भेटवस्तू मिळाल्या आहेत. चक्क अनंत अंबानी याला त्याच्या लग्नात लग्झरी गाडी SUVअल्टा गिफ्ट म्हणून देण्यात आलीये. या गाडीची किंमत तब्बल 13 कोटी आहे. फक्त हेच नाहीतर यांना लग्नात गिफ्टमध्ये प्राइवेट जेट देखील मिळाले आहे.

याला बोलतात मजबूत आहेर! अनंत अंबानीला लग्नात मिळाली 3 कोटींची कार, प्राइवेट जेट, हेलिकॉप्टर अन्... झुकरबर्गचं गिफ्ट एकदम स्पेशल
Follow us
| Updated on: Jul 22, 2024 | 10:54 PM

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची चर्चा फक्त भारतातच नाहीतर जगभरात बघायला मिळतंय. कित्येक महिन्यांपासून या लग्नाचे प्री वेडिंग फंक्शन विविध ठिकाणी सुरू होते. 12 जुलै 2024 रोजी मुंबईमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांनी सातफेरे घेतले. या लग्नाची तयारी गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू होती. देश विदेशातून पाहुणे या लग्नासाठी दाखल झाले. विशेष म्हणजे बॉलिवूड कलाकार तर या लग्नात चांगलीच धमाल करताना दिसले. या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लग्नात दाखल झालेल्या पाहुण्यांना तब्बल 2 कोटींचे घड्याळ देखील देण्यात आले. या घड्याळाचेही फोटो व्हायरल झाले.

रिपोर्टनुसार अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांना Amazon चे माजी अध्यक्ष जेफ बेजोसने 11.50 कोटींची बुगाटी कार गिफ्टमध्ये दिलीये. अमेरिकेचा प्रोफेशनल रेसलर जॉन सीना याने 3 कोटींची लेम्बोर्गिनी कार गिफ्ट म्हणून दिलीये. हेच नाहीतर फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्गने 300 कोटी किंमत असलेले प्राइवेट जेट गिफ्ट म्हणून दिले आहे. सुंदर पिचाईनेही 100 कोटींचे हेलिकॉप्टर गिफ्ट दिले आहे.

विशेष म्हणजे या यादीमध्ये बॉलिवूड कलाकारही मागे नाहीत. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी अनंत आणि राधिकाला 9 कोटींची मर्सिडीज कार गिफ्ट दिल्याचे सांगितले जाते. सलमान खान याने 15 कोटींची स्पोर्टस कार अनंत अंबानीला लग्नात दिली. अक्षय कुमार याने अनंत अंबानीला 60 लाखांचा सोन्याचा पेन गिफ्ट म्हणून दिला. कतरिना कैफ आणि विकी काैशल यांनीही 19 लाखांचे सोने गिफ्ट दिले.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न तब्बल तीन दिवस सुरू होते. यामध्ये विविध सेरेमनी पार पडल्या. पाहुण्यांसाठी लग्नात राहण्यासाठाी खास व्यवस्था अंबानी कुटुंबियांकडून करण्यात आली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या शुभ आर्शिवाद सेरेमनीमध्ये उपस्थित होते. यावेळी नरेंद्र मोदी हे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांना आर्शिवाद देण्यासाठी पोहोचले होते.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.