कपड्यांवरून Ananya Pandayला ट्रोल करणाऱ्यांना चंकी पांडेचं सडेतोड उत्तर; “समाजात कसं वावरावं याचं भान..”

सोशल मीडिया आणि ट्रोलिंग (Trolling) हे जणू समीकरणच झालं आहे. या ट्रोलिंगचा फटका सेलिब्रिटींना सर्वाधिक बसतो. त्यांच्या कपड्यांवरून, एखाद्या वक्तव्यावरून किंवा व्हायरल व्हिडीओवरून नेटकरी सर्रास ट्रोलिंग करताना दिसतात. या ट्रोलिंगकडे बहुतांश कलाकार हे दुर्लक्ष करणंच पसंत करतात. मात्र काहीजण त्याला सडेतोड उत्तर देतात.

कपड्यांवरून Ananya Pandayला ट्रोल करणाऱ्यांना चंकी पांडेचं सडेतोड उत्तर; समाजात कसं वावरावं याचं भान..
Ananya PandayImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 21, 2022 | 8:44 AM

सोशल मीडिया आणि ट्रोलिंग (Trolling) हे जणू समीकरणच झालं आहे. या ट्रोलिंगचा फटका सेलिब्रिटींना सर्वाधिक बसतो. त्यांच्या कपड्यांवरून, एखाद्या वक्तव्यावरून किंवा व्हायरल व्हिडीओवरून नेटकरी सर्रास ट्रोलिंग करताना दिसतात. या ट्रोलिंगकडे बहुतांश कलाकार हे दुर्लक्ष करणंच पसंत करतात. मात्र काहीजण त्याला सडेतोड उत्तर देतात. अभिनेत्री अनन्या पांडेला (Ananya Panday) नुकतंच अशा ट्रोलिंगचा सामना करावा लागला. ‘गेहराईयाँ’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अनन्याने परिधान केलेल्या ड्रेसवरून नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाणा साधला. त्यानंतर आता निर्माते अपूर्व मेहता यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पार्टीमधील तिच्या ड्रेसिंग सेन्सने सर्वांचं लक्ष वेधलं. अनन्याने यावेळी काळ्या रंगाचा हाय स्लीट शीअर ड्रेस परिधान केला होता. तिचा लूक पाहून नेटकऱ्यांनी तिची तुलना सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेदशी केली. उर्फी नेहमीच तिच्या कपड्यांमुळे चर्चेत असते. याच ट्रोलिंगवर आता अनन्याचे वडील आणि अभिनेते चंकी पांडे (Chunky Panday) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “पालक म्हणून आम्ही कधीच आमच्या मुलांना कोणते कपडे परिधान करावेत आणि कोणते नाहीत याचा सल्ला दिला नाही. आम्ही आमच्या दोन्ही मुलींना खूप चांगल्याप्रकारे वाढवलं आहे आणि समाजात कसं वावरावं याचं भान त्यांना आहे. अनन्या सध्या इंडस्ट्रीत असल्याने तिला ग्लॅमरस राहावं लागतं. माझ्या मते त्या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. माझ्या मुलींबद्दल एक गोष्ट मला माहित आहे, ती म्हणजे त्या दोघींमध्ये एका विशिष्ट प्रकारची निरागसता आहे. त्यांनी कोणतेही कपडे परिधान केले तरी ते कधीच असभ्य वाटणार नाहीत, याची मला खात्री आहे.”

View this post on Instagram

A post shared by Ananya ?? (@ananyapanday)

यावेळी चंकी पांडे यांनी स्वत:चाही अनुभव सांगितला. फॅशन सेन्सवरून अनेकदा कुटुंबीयांनी त्यांचीही खिल्ली उडवली होती, असं ते म्हणाले. “तुमच्या कपड्यांवरून एखाद्याने खिल्ली उडवणं हे आता सामान्य आहे. उलट अशा गोष्टींकडे आपण सकारात्मकतेने पहायला हवं. जर तिच्या वडिलांना कोणतीच समस्या नसेल तर मला वाटत नाही की इतर कोणाला काही समस्या असायला हवी. मी अनन्याला हेच सांगतो की किमान लोक तुझ्याबद्दल बोलत तरी आहेत, मग ते चांगलं असो किंवा वाईट. अशा ट्रोलिंगचा परिणाम स्वत:वर कधीच करून घ्यायचा नाही. यातून तीसुद्धा बरंच काही शिकली आहे. त्यामुळे ट्रोलिंग आणि नकारात्मक कमेंट्स ती मनाला लावून घेत नाही”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

अनन्या नुकतीच ‘गेहराईयाँ’ या चित्रपटात झळकली. यामध्ये तिने सिद्धांत चतुर्वेदी, दीपिका पदुकोण यांच्यासोबत भूमिका साकारली. या चित्रपटाला प्रेक्षक-समीक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.

हेही वाचा:

राणी-अभिषेकच्या नात्यात नेमकं काय बिनसलं होतं? लग्नापर्यंत पोहोचल्यानंतर झालं ब्रेकअप

The Kashmir Files: एवढाच पुळका आहे तर कमाईचे दीडशे कोटी काश्मिरी पंडितांना देणार का? विवेक अग्निहोत्रींना नवं आव्हान

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.