अनिरुद्धाचार्यांचे सुपरस्टार्सवर गंभीर आरोप; म्हणाले, ‘पैशांसाठी चुकीच्या गोष्टींचा…’

Aniruddhacharya ji maharaj: कोट्यवधी रुपयांच्या कमाईसाठी सेलिब्रिटी करतात चुकीचं काम..., बड्या सुपरस्टार्सवर अनिरुद्धाचार्यांनी साधला निशाणा; म्हणाले, 'पैशासाठी चुकीच्या गोष्टींचा...', सध्या सर्वत्र त्यांच्या वक्तव्याची चर्चा...

अनिरुद्धाचार्यांचे सुपरस्टार्सवर गंभीर आरोप; म्हणाले, 'पैशांसाठी चुकीच्या गोष्टींचा...'
Follow us
| Updated on: Aug 23, 2024 | 12:23 PM

धार्मिक आणि अध्यात्मिक गुरु अनिरुद्धाचार्य जी महाराज यांचे असंख्य अनुयायी आहेत. त्यांच्या प्रवचनांचे आणि अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो टीव्ही रिॲलिटी शो ‘लाफ्टर शेफ फन अनलिमिटेड’मध्ये दिसले. मिळालेल्या माहितीनुसार, अनिरुद्धाचार्य यांना ‘बिग बॉस 18’ साठी देखील विचारण्यात आलं. पण त्यांनी शोमध्ये जाण्यास नकार दिला. आता नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अनिरुद्धाचार्य यांनी तरुण पिढीतील नकारात्मक गोष्टी, वाईट गोष्टी आणि सोशल मीडियाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

नुकताच झालेल्या मुलाखतीत अनिरुद्धाचार्य यांनी ‘लाफ्टर शेफ फन अनलिमिटेड’ शोचं कौतुक केलं. ‘ लाफ्टर शोमध्ये लोकं आणि कलर्स टीव्हीचे सर्व कर्मचारी चांगले आहेत. उत्तम काम करत आहेत. आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजासोबत धर्माला देखील जोडण्याचा प्रयत्न करत आहे. शोच्या माध्यमातून आपण हसण्यासोबत धर्माशी जोडू शकतो. त्यामुळे सर्वांनी हा कार्यक्रम जरूर पाहावा.’

पुढे अनिरुद्धाचार्य म्हणाले, ‘सुरुवातील मला थोडी भीती वाटली, त्यानंतर सर्व काही ठिक वाटलं. आता मी विचार करतो, मला असं वाटतं मी लोकांना हसवू देखील शकतो. पण टीव्हीवर माझा पहिला अनुभव होता. त्यामुळे मला काय करायला हवं आणि काय करायला नको… यावर देखील मी विचार केला. कारण कोणाच्या भावनांना ठेच पोहोचू नये… असा माझा हेतू होता..’

बॉलिवूडबद्दल देखील अनिरुद्धाचार्य यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ‘बॉलिवूड आता वेगळ्या दिशेने प्रवास करत आहे. ज्यामुळे बॉलिवूडमध्ये काही बदल नक्कीच झाले पाहीजे. बॉलिवूड गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक गोष्टीचा प्रचार करत आहे. प्रचार करण्यापूर्वी ती गोष्ट वाईट आहे… याची खात्री देखील करुन घेत नाहीत..’

‘गुटखा, सिगारेट, दारू… इत्यादी वाईट गोष्टींचा प्रचार सेलिब्रिटी करत आहे. ज्याचा प्रभाव तरुण पिढीवर पडत आहे. तरूणाई सेलिब्रिटींकडून प्रेरणा घेत असते. त्यामुळे फक्त पैशांसाठी सेलिब्रिटींनी चुकीच्या गोष्टींचा प्रचार करु नये…’ असं आवाहन अनिरुद्धाचार्य यांनी केलं.

‘देशाची तरुण पिढी वाईट दिशेने जात आहे. त्यामुळे काही गोष्टींवर आपण स्वतः आळा घालायला हवा. सेलिब्रिटी समाजासाठी प्रेरणा आहेत आणि लोकं त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालतात त्यामुळे सेलिब्रिटींनी देखील विचार करायला हवा… ही त्यांची जबाबदारी आहे. बदल होण्याची नितांत गरज आहे…’ असं देखील अनिरुद्धाचार्य महाराज म्हणाले.

भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.