AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anu Kapoor: आमिरच्या ‘लाल सिंग चड्ढा’बद्दल प्रश्न विचारताच अनु कपूर म्हणाले ‘तो कोण आहे?’, व्हिडीओ पाहून नेटकरी अवाक्!

एकीकडे गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी नेटकऱ्यांकडून होत आहे. तर दुसरीकडे बॉलिवूडचे अनुभवी अभिनेते अनु कपूर (Anu Kapoor) यांनी आमिरविषयी थक्क करणारं वक्तव्य केलं आहे.

Anu Kapoor: आमिरच्या 'लाल सिंग चड्ढा'बद्दल प्रश्न विचारताच अनु कपूर म्हणाले 'तो कोण आहे?', व्हिडीओ पाहून नेटकरी अवाक्!
Anu Kapoor: आमिरच्या 'लाल सिंग चड्ढा'बद्दल प्रश्न विचारताच अनु कपूर म्हणाले 'तो कोण आहे?'Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 07, 2022 | 5:32 PM

आमिर खान (Aamir Khan) सध्या त्याच्या आगामी ‘लाल सिंग चड्ढा’ (Laal Singh Chaddha) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. एकीकडे गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी नेटकऱ्यांकडून होत आहे. तर दुसरीकडे बॉलिवूडचे अनुभवी अभिनेते अनु कपूर (Anu Kapoor) यांनी आमिरविषयी थक्क करणारं वक्तव्य केलं आहे. एका कार्यक्रमात त्यांना आमिरच्या ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटाबद्दल विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले, “तो कोण आहे?” त्यांच्या या प्रतिक्रियेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. यामुळे अनु कपूर हे आमिर खानवर नाराज आहेत का किंवा या दोन कलाकारांमध्ये कोणता वाद झाला का असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.

काय म्हणाले अनु कपूर?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एका पत्रकाराने त्यांना विचारलं की, “सर आमिर खानचा लाल सिंह चड्ढा हा चित्रपट रिलीज होणार आहे.” हे ऐकताच अनु कपूर म्हणू लागतात “ते काय आहे? मी चित्रपट पाहत नाही. मला माहीत नाही.” दरम्यान त्यांचा मॅनेजर म्हणतो की नो कॉमेंट्स. अनु कपूर त्याला अडवतात आणि म्हणतात की “नो कॉमेंट्स नाही. मी चित्रपट पाहतच नाही, माझे असो किंवा इतर कोणाचे असो. मला हे देखील माहित नाही की हा खरोखर कोण आहे? मग मी त्यावर काय सांगू शकणार? तो कोण आहे. मला काही कल्पना नाही.” त्यांच्या या वक्तव्यावर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत.

हे सुद्धा वाचा

तुम्ही चित्रपटसृष्टीत काम का करता, असा उपरोधिक सवाल एका युजरने केला. तर तुमची स्मरणशक्ती कमकुवत झाली का, असं दुसऱ्याने विचारलं. तर आमिरच्या चाहत्यांनी कमेंट्समध्ये अनु कपूर यांच्यावरच पलटवार करत विचारलं की हे कोण आहेत? काही दिवसांपूर्वीच अनु कपूर यांचा ‘क्रॅश कोर्स’ हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाला. आमिरचा लाल सिंग चड्ढा हा सिनेमा येत्या 11 ऑगस्टला रिलीज होणार आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादात अडकला आहे. सोशल मीडियावर आमिरच्या जुन्या विधानांमुळे त्याच्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी होत आहे.

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.