मन सुन्न करणारा The Kashmir Filesचा क्लायमॅक्स सीन असा झाला शूट; अभिनेत्रीला कोसळलं रडू
1990 मध्ये काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून काश्मिरी पंडितांवर (Kashmiri Pandit) जो अत्याचार झाला, त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली, याविषयी सत्यकथा 'द काश्मीर फाईल्स'मध्ये (The Kashmir Files) दाखवल्याचा दावा दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी केला आहे. 11 मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा होऊ लागली.
1990 मध्ये काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून काश्मिरी पंडितांवर (Kashmiri Pandit) जो अत्याचार झाला, त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली, याविषयी सत्यकथा ‘द काश्मीर फाईल्स’मध्ये (The Kashmir Files) दाखवल्याचा दावा दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी केला आहे. 11 मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा होऊ लागली. हा चित्रपट पाहताना अनेकांचे डोळे पाणावले. क्लायमॅक्स सीननंतर थिएटरमध्ये प्रेक्षक रडतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. मन सुन्न करणारा हा क्लायमॅक्स सीन कसा शूट झाला आणि त्यावेळी सेटवरील कलाकारांच्या मनात कोणती भावना होती, याविषयीचा अनुभव अभिनेत्री वृंदा खेरने (Vrinda Kher) नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितला. वृंदा ही अभिनेते अनुपम खेर यांची भाची आहे. द काश्मीर फाईल्स या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलंय. चित्रपटाचा क्लायमॅक्स शूट करणं हा तिच्यासाठी आणि इतर कलाकारांसाठीही सर्वांत अवघड होतं, असं तिने सांगितलं. (climax scene of The Kashmir Files)
इस्लामचा स्वीकार करा, काश्मीर सोडा किंवा मृत्यूला सामोरं जा.. हा नारा देत दहशतवाद्यांनी 1990 मध्ये काश्मीरमधील हिंदूवर हल्ला चढवला होता. काश्मिरी पंडितांना बेघर करून त्यांची निर्दयपणे हत्या करण्यात आली होती. यामध्ये वृंदाने भवानी कौल या काश्मिरी पंडित महिलेची भूमिका साकारली आहे. भवानी या विस्थापितांपैकी एक आहेत. काश्मिरमधील हक्काचं घर सोडून छावण्यांमध्ये राहणाऱ्या काश्मिरी पंडितांची कशाप्रकारे हत्या करण्यात आली, हे क्लायमॅक्स सीनमध्ये दाखवण्यात आलं.
View this post on Instagram
वृंदा या चित्रपटाच्या निर्मिती आणि दिग्दर्शन टीमचाही एक भाग होती. “क्लायमॅक्स शूट करणं टीमसाठी सर्वांत कठीण होतं, कारण त्यांना वास्तविक जीवनातील घटना लक्षात ठेवून त्या भावना पडद्यावर साकारायच्या होत्या. क्लायमॅक्समध्ये शारदा पंडितची भूमिका साकारणारी अभिनेत्री भाषा सुंबळीचा एक सीन आहे. दहशतवादी बिट्टासोबतचा हा तिचा सीन शूट करणं सर्वाधिक कठीण होतं. हा सीन शूट करताना तिला रडू कोसळलं. ते दृश्य तिच्यासाठी अत्यंत आव्हानात्मक होतं. त्यामुळे पडद्यावर कलाकारांच्या ज्या भावना उमटल्या आहेत, त्या खऱ्या आहेत. कोणीतरी प्रत्यक्षात या परिस्थितीतून गेला आहे याची कल्पना करणंच अशक्य आहे”, अशा शब्दांत वृंदा व्यक्त झाली.
#TheKashmirFiles is SENSATIONAL… *Week 2* trending is THE HIGHEST in *post pandemic era*, OVERTAKES #Sooryavanshi, #83TheFilm and #Hollywood giant #SpiderMan BY A RECORD MARGIN… [Week 2] Fri 19.15 cr, Sat 24.80 cr, Sun 26.20 cr, Mon 12.40 cr. Total: ₹ 179.85 cr. #India biz. pic.twitter.com/acRcpbP7XA
— taran adarsh (@taran_adarsh) March 22, 2022
11 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 179.85 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यामध्ये अनुपम खेर, वृंदा खेर, भाषा सुंबळी, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, दर्शन कुमार, पुनीत इस्सार, मृणाल कुलकर्णी यांच्या भूमिका आहेत.
हेही वाचा:
The Kashmir Filesची कथा काल्पनिक असल्याचा आरोप करणाऱ्यांवर पल्लवी जोशी भडकल्या; म्हणाल्या..