AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anurag Kashyap: “तिच्यापेक्षा माझेच..”; तापसीबद्दल अनुराग कश्यपचं वक्तव्य ऐकून सर्वांनाच बसला धक्का!

या मुलाखतीत अनुरागने अभिनेता रणवीर सिंगच्या (Ranveer Singh) वादग्रस्त न्यूड फोटोशूटवर प्रतिक्रिया दिली. मात्र ही प्रतिक्रिया देताना त्याने तापसीबद्दल असं काही वक्तव्य केलं, जे ऐकून तिलासुद्धा धक्का बसला.

Anurag Kashyap: तिच्यापेक्षा माझेच..; तापसीबद्दल अनुराग कश्यपचं वक्तव्य ऐकून सर्वांनाच बसला धक्का!
Anurag Kashyap and Taapsee PannuImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Aug 16, 2022 | 4:51 PM

निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) आणि अभिनेत्री तापसी पन्नूची (Taapsee Pannu) एक मुलाखत सध्या चर्चेत आहे. या मुलाखतीत अनुरागने अभिनेता रणवीर सिंगच्या (Ranveer Singh) वादग्रस्त न्यूड फोटोशूटवर प्रतिक्रिया दिली. मात्र ही प्रतिक्रिया देताना त्याने तापसीबद्दल असं काही वक्तव्य केलं, जे ऐकून तिलासुद्धा धक्का बसला. रणवीरने ‘पेपर’ या मासिकासाठी न्यूड फोटोशूट केलं होतं. त्याच्या या फोटोशूटवर अनेकांनी आक्षेप घेतला होता. इतकंच नव्हे तर याप्रकरणी त्याच्याविरुद्ध तक्रारसुद्धा दाखल करण्यात आली. मात्र रणवीरच्या अशा फोटोशूटमध्ये इतर सर्व पुरुषांवरील तणाव वाढल्याची तक्रार अनुराग कश्यपने या मुलाखतीत केली.

आर. जे. सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत अनुरागला रणवीरच्या फोटोशूटबद्दल प्रश्न विचारण्यात आला. रणवीरसारखं फोटोशूट करण्याची हिंमत करणार का, असा प्रश्न त्याला विचारला गेला असता तापसीने भुवया उंचावल्या. या प्रश्नानंतर तापसीच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून अनुराग म्हणाला, “ही तर तशीही घाबरते. तिला माझा न्यूनगंड आहे कारण माझे स्तन तिच्यापेक्षा मोठे आहेत.” हे ऐकून तापसीने जोरात हसत विषय तिथेच थांबवण्याचा इशारा दिला.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

याआधी दिलेल्या मुलाखतीत जेव्हा अनुरागला रणवीरच्या फोटोशूटबद्दल प्रश्न विचारला गेला, तेव्हा तो म्हणाला, “त्याच्यामुळे वादंग नक्कीच निर्माण झाला आहे. त्याच्यामुळे माझा आत्मविश्वाससुद्धा डगमगायला लागला आहे. तो आत्मविश्वास आम्ही परत कसा मिळवायचा? हिंदुस्तानमध्ये प्रत्येक पुरुष याच गोष्टीने वैतागला असून तो रणवीरवर टीका करत आहे.”

अनुराग आणि तापसीचा ‘दोबारा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लंडन फिल्म फेस्टिव्हल आणि फँटाशिया फिल्म फेस्टिव्हलमध्ये हा चित्रपट दाखवण्यात आला आहे. प्रेक्षकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असून नुकत्याच पार पडलेल्या इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्येही हा चित्रपट दाखवण्यात आला.

दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर.
भारत - पाकमधला तणाव वाढला; सीमेवर नागरिकांकडून बंकरची साफसफाई सुरू
भारत - पाकमधला तणाव वाढला; सीमेवर नागरिकांकडून बंकरची साफसफाई सुरू.
'मी पाकिस्तानची...', भारत सोडण्यावर सीमा हैदरची मोठी प्रतिक्रिया
'मी पाकिस्तानची...', भारत सोडण्यावर सीमा हैदरची मोठी प्रतिक्रिया.
पाकिस्तान्यांना आज भारत सोडावाच लागणार;अटारी सीमेवर काय आहे परिस्थिती?
पाकिस्तान्यांना आज भारत सोडावाच लागणार;अटारी सीमेवर काय आहे परिस्थिती?.