‘अनुराग कश्यप’ने शाहरुख खान यांच्यासोबत असलेल्या नात्यावर केले मोठे वक्तव्य, फोन आल्यावर थेट…
पठाण चित्रपटाचे काैतुक अनुराग कश्यप यांनी केले आहे. पठाण चित्रपटाच्या ओपनिंग डेलाच चित्रपटाचा फर्स्ट शो पाहण्यासाठी अनुराग कश्यप पोहचले होते.
मुंबई : अनुराग कश्यप हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्यार विथ डीजे मोहब्बत या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अनुराग कश्यप (Anurag Kashyap) चर्चेत राहणारे नाव आहे. प्यार विथ डीजे मोहब्बत या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी अनुराग कश्यप यांनी अनेक मुलाखती दिल्या होत्या. यादरम्यान त्यांनी काही धक्कादायक खुलासे देखील केले. अनुराग कश्यप आणि विवेक अग्निहोत्री यांच्यामध्ये कायमच हटके उडताना दिसतात. दोघेही एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी अजिबात सोडत नाहीत. या दोघांच्या वादामध्ये अनेकदा चाहत्यांमध्येही वाद होतात. विवेक अग्निहोत्री यांच्या द कश्मीर फाइल्स या चित्रपटाला देखील काही दिवसांपूर्वी अनुराग कश्यप यांनी नावे ठेवली होती. हा चित्रपट (Movie) कोणत्याही सत्य घटनांवर आधारित नसल्याचे अनुराग कश्यप यांनी म्हटले होते. त्यानंतर विवेक अग्निहोत्री यांचा पार चांगलाच चढला आणि त्यांनी मग अनुराग कश्यप यांचा चांगलाच समाचार घेतला. पठाण चित्रपटाचे काैतुक अनुराग कश्यप यांनी केले आहे. पठाण चित्रपटाच्या ओपनिंग डेलाच चित्रपटाचा फर्स्ट शो पाहण्यासाठी अनुराग कश्यप पोहचले होते.
शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर धमाकेदार कामगिरी केलीये. या चित्रपटाने अवघ्या ११ दिवसांमध्ये बाॅक्स आॅफिसवर जगभरातून तब्बल ८५० कोटींचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन केले. शाहरुख खान याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातून जोरदार असे पुनरागमन नक्कीच केले आहे.
नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अनुराग कश्यप यांनी शाहरुख खान याच्यासोबत असलेले आपले रिलेशन सांगितले आहे. इतकेच नाही तर शाहरुख खान याचा फोन जरी झाला तरीही सन्मानाने अनुराग कश्यप जागेवरून उठून बोलतात, असे त्यांनी सांगितले.
इतक्या वर्षांमध्ये शाहरुख खान याच्यासोबत काम का नाही केले याचेही थेट कारण अनुराग कश्यप यांनी सांगून टाकले आहे. अनुराग कश्यप म्हणाले की, माझे आणि शाहरुख खानचे रिलेशन फार जुने असून काॅलेजमध्ये शाहरुख खान माझे सिनिअर होते.
आम्ही तेंव्हापासून एकमेकांना ओळखतो. मात्र, प्रोफेशनली लाईफमध्ये निवड थोडी वेगळी असल्याचे अनुराग कश्यप म्हणाले आहेत. पुढे अनुराग कश्यप म्हणाले, त्यांनी माझ्यासमोर हात वर केले. त्यांना वाटते की मला समजणार नाही…परंतू असे अजिबात नाहीये.
अनुराग कश्यप हे कायमच त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत येतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी धक्कादायक वक्तव्य करत म्हटले होते की, माझ्या पत्नीने मला लाथ मारून घराबाहेर हाकलून दिले होते. त्यावेळी माझी मुलगी आलिया ही फक्त चार वर्षांचीच होती.
मी स्वत: ला एका रूममध्ये बंद करून ठेवले होते आणि मी दिवस रात्र फक्त आणि फक्त दारू प्यायचो. आता अनुराग कश्यप शाहरुख खानबद्दल केलेल्या विधानामुळे चर्चेत आले आहेत. कारण त्यांनी या मुलाखतीमध्ये म्हटले की, शाहरुख खान याचा फोन आला की, मी जागेवर उभे राहून बोलतो.