Aryan Khan Drug case : ‘हे सगळं दुखःद आहे…’, पुन्हा एकदा आर्यन खानच्या समर्थनार्थ पुढे आला हृतिक रोशन
सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला ड्रग्ज प्रकरणात अटक झालीये तेव्हापासून हे प्रकरण रोज नवनवीन रूप धारण करत आहे. सध्या त्याच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
मुंबई : सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला ड्रग्ज प्रकरणात अटक झालीये तेव्हापासून हे प्रकरण रोज नवनवीन रूप धारण करत आहे. सध्या त्याच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी काल उशिरापर्यंत सुरू होती आणि आज दुपारी 2.30 वाजेपासून पुन्हा सुनावणी सुरू होणार आहे. आर्यन खान तुरुंगात असल्यापासून बॉलिवूड स्टार्स त्याच्या समर्थनार्थ पुढे येत आहेत. आर्यनच्या बाजूने बोलणाऱ्या कलाकारांपैकी हृतिक रोशन (Hrithik Roshan) देखील एक आहे. या प्रकरणात पुन्हा एकदा हृतिकने आर्यनला पाठिंबा देण्यासाठी सोशल मीडियाची मदत घेतली आहे.
आर्यनला जामीन न मिळाल्याने हृतिक रोशनने व्यक्त केले दु:ख
हृतिक रोशनने त्याच्या इंस्टाग्रामवर प्रसिद्ध पत्रकार फाये डिसूझा यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. याप्रकरणी सुप्रीम कोर्टाचे वकील दुष्यंत दवे यांनी मुलाखतीदरम्यान आपली प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्याने लिहिले आहे की, जर हे तथ्य असेल तर हे सर्व अत्यंत दुःखद आहे.
या व्हिडीओमध्ये दुष्यंत दवे यांनी न्यायमूर्ती नितीम सांबरे (आर्यन खानच्या खटल्याची सुनावणी करत आहेत) यांच्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, यापूर्वी 2018 मध्ये नितीम सांबरे याने ड्रग्ज प्रकरणात एका आरोपीला जामीन मंजूर केला होता. या आरोपीकडून 430 ग्रॅम किमतीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले, तरीही त्याला जामीन मिळाला होता.
त्याचवेळी आर्यन खानकडून कोणतेही ड्रग्ज सापडले नसूनही त्याला अद्याप जामीन मिळालेला नाही. दुष्यंत दवे यांनी नितीम सांबरे यांच्या निकालावर आश्चर्य व्यक्त केले आहे. याआधीही हृतिक रोशनने आर्यन खानसाठी लांब आणि रुंद पोस्ट लिहून त्याचे समर्थन केले होते.
आर्यन खानच्या जामिनावर आज सुनावणी होणार
आर्यन खानच्या जामिनावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सत्र न्यायालयात दोनदा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आर्यन खानच्या वकिलाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आर्यनचा खटला माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी हाताळत आहेत. आर्यन खानच्या जामीन अर्जाच्या सुनावणीचा आज (28 ऑक्टोबर) तिसरा दिवस आहे. मात्र, काल आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमीचा यांच्या वकिलांनी न्यायालयात त्यांची बाजू मांडली असून, आज एनसीबी आपली बाजू मांडणार आहे. येत्या दोन दिवसांत कोर्टाने जामीन याचिकेवर निर्णय न दिल्यास आर्यन खानच्या अडचणी वाढू शकतात.
अनिल सिंह मांडणार एनसीबीची बाजू
एनसीबीचे प्रतिनिधित्व करणारे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह गुरुवारी या प्रकरणी युक्तिवाद करणार आहेत. मुंबई किनार्याजवळील एका क्रूझवर एनसीबीच्या छाप्यात अंमली पदार्थ सापडल्याप्रकरणी 3 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आलेले आर्यन खान, मर्चंट आणि धमेचा हे 3 ऑक्टोबरपासून तुरुंगात आहेत. बुधवारी सुमारे दोन तास सुनावणी घेतल्यानंतर न्यायमूर्ती सांबरे यांनी उद्या ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, असे सांगितले.
हेही वाचा :
परेश रावल म्हणतायत ‘बाबूराव गणपतराव आपटे’ आता नको रे बाबा! ‘हेराफेरी 2’बाबत केले मोठे वक्तव्य…