Ashish Vidyarthi: आशिष विद्यार्थी यांनी चित्रपटात 182 वेळा केला मृत्यूचा सीन; खरोखर मृत्यूशी सामना झाला तेव्हा..

त्यांनी केवळ हिंदीतच नाही तर तमिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड आणि बंगालीसह अनेक भाषांमध्ये 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. या चित्रपटांमध्ये ते अनेकदा खलनायक बनून प्रेक्षकांसमोर आले आहेत.

Ashish Vidyarthi: आशिष विद्यार्थी यांनी चित्रपटात 182 वेळा केला मृत्यूचा सीन; खरोखर मृत्यूशी सामना झाला तेव्हा..
आशिष विद्यार्थी यांनी चित्रपटात 182 वेळा केला मृत्यूचा सीनImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 23, 2022 | 2:25 PM

सिनेविश्वात प्रत्येक वेळी हिरोची चर्चा होते, पण या इंडस्ट्रीत असे काही कलाकार आहेत ज्यांनी खलनायक (Villain) बनून चाहत्यांवर आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडली आहे. अभिनेता आशिष विद्यार्थी (Ashish Vidyarthi) यांच्या नावाचा त्यात समावेश होतो. 19 जून 1962 रोजी केरळमध्ये (Keral) जन्मलेले आशिष हे या इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी केवळ हिंदीतच नाही तर तमिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड आणि बंगालीसह अनेक भाषांमध्ये 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. या चित्रपटांमध्ये ते अनेकदा खलनायक बनून प्रेक्षकांसमोर आले आहेत. पण तुम्हाला माहित आहे का, की आशिष हे असे कलाकार बनले आहेत ज्यांचा सिनेमांमध्ये सर्वाधिक मृत्यू दाखवला गेला.

लहानपणापासून सिनेमाशी नातं

आशिष विद्यार्थी यांचा जन्म केरळमध्ये झाला, मात्र त्यांचं बालपण दिल्लीत गेलं. तरुण वयात ते दिल्लीत आले आणि इथेच राहून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. आशिषचे वडील गोविंद विद्यार्थी हे मल्याळी थिएटर कलाकार होते आणि आई रिबा विद्यार्थी कथ्थक नृत्यांगना होत्या. त्यामुळे रंगभूमीशी त्यांचं खूप जवळचं नातं तयार झालं. आशिष यांनी आपल्या करिअरची सुरुवात कन्नड चित्रपटातून केली होती. सुरुवातीच्या काळात ‘बाजी’ आणि ‘नाजायज’सारख्या चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका साकरून त्यांनी लोकांची मनं जिंकली. याच कारणामुळे त्यांना हिंदी चित्रपटांमध्ये फक्त नकारात्मक भूमिका मिळू लागल्या.

हे सुद्धा वाचा

चित्रपटांमध्ये 182 वेळा दाखवला मृत्यू

आशिष यांनी चित्रपटांमध्ये अनेकदा खलनायकाच साकारल्याने त्यांना चित्रपटात नायकाकडून अनेकदा मारहाण झाली. इतकंच नव्हे तर त्यांना अनेकदा मृत्यूचा सीन शूट करावा लागला. आतापर्यंत तब्बल 182 वेळा त्यांचा चित्रपटांमध्ये मृत्यू दाखवण्यात आला आहे.

पहा फोटो-

खरोखर झाला मृत्यूशी सामना

एकदा चित्रपटात मृत्यूचा सीन शूट करताना आशिष यांच्यासोबत धक्कादायक घटना घडली. शूटिंगदरम्यान आशिष यांना पाण्यात उतरावं लागलं होतं. मात्र त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. तिथे उपस्थित असलेल्या लोकांना ते बुडण्याची अॅक्टिंग करत आहे असं वाटलं. त्यामुळे त्यांच्या मदतीला कोणी गेलं नाही. अखेर त्यांनी जोरात किंचाळताच तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांना संशय आला आणि त्यांनी आशिष यांचे प्राण वाचवले.

आशिष यांचे चित्रपट

आशिष विद्यार्थी यांना ‘द्रोहकाळ’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याच्या श्रेणीत राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. बाजी, नाजायज, जीत, भाई, हसीना मान जाएगी, अर्जुन पंडित, जानवर,दौड़, जिद्दी, मेजर साब, सोल्जर, वास्तव, बादल, रिफ्यूजी, एक और एक ग्यारह, एलओसी कारगिल, कहो ना प्यार है, बिच्छू, जोरू का गुलाम, जाल, किस्मत, शिकार, जिम्मी, रक्तचरित्र, बर्फी, राजकुमार, हैदर, अलीगढ़ और बेगम जान यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलंय.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.