Rait Zara Si Song | अक्षय कुमार-सारा अली खानची लग्नानंतरची लव्हस्टोरी, ‘अतरंगी रे’चे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!

नुकतेच काही दिवसांपूर्वी ‘अतरंगी रे’चे पहिले धमाल गाणे ‘चका चक’ रिलीज झाले असून, ते खूप पसंत केले जात आहे. या गाण्यात सारा अली खान जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. आता चित्रपटाचे 'रीत जरा सी' हे दुसरे गाणे रिलीज झाले आहे. अरिजित सिंहच्या आवाजातील हे गाणे प्रत्येकाच्या हृदयाला भिडणारे आहे.

Rait Zara Si Song | अक्षय कुमार-सारा अली खानची लग्नानंतरची लव्हस्टोरी, ‘अतरंगी रे’चे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!
Sara Ali Khan
Follow us
| Updated on: Dec 06, 2021 | 2:14 PM

मुंबई : बॉलिवूड स्टार सारा अली खान (Sara Ali Khan), अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि धनुष (Dhanush) या ख्रिसमसला अतरंगी लव्हस्टोरी घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यांचा ‘अतरंगी रे’ (Atrangi Re) हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून चाहते त्याच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. आज (6 डिसेंबर) या चित्रपटाचे दुसरे गाणे रिलीज झाले आहे.

नुकतेच काही दिवसांपूर्वी ‘अतरंगी रे’चे पहिले धमाल गाणे ‘चका चक’ रिलीज झाले असून, ते खूप पसंत केले जात आहे. या गाण्यात सारा अली खान जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. आता चित्रपटाचे ‘रीत जरा सी’ हे दुसरे गाणे रिलीज झाले आहे. अरिजित सिंहच्या आवाजातील हे गाणे प्रत्येकाच्या हृदयाला भिडणारे आहे.

सारा अली खानने शेअर केले गाणे

‘रीत जरा सी’ या गाण्यात सारा अली खान धनुषसोबत लग्नानंतरची तिची आणि अक्षय कुमारची प्रेमकहाणी सांगताना दिसत आहे. त्याचवेळी त्याची आठवण करून ती रडतानाही दिसत आहे. धनुष आणि अक्षय यापैकी कोणाची निवड करायची, हे तिला ठरवता येत नाही. त्यामुळे तिघेही या नात्यातील गुंतागुंतीला सामोरे जात आहेत.

पाहा पोस्ट :

हे गाणे शेअर करताना सारा अली खानने लिहिले की, ‘माझे हृदय आता धडधडते आहे, जे प्रेमाने बांधलेले होते. एक वेगळीच तहान आहे, कारण ‘रीत जरा सी’ भेटीला आले आहे. ‘अतरंगी रे’ 24 डिसेंबरला प्रदर्शित होत आहे.’ या गाण्याबद्दल बोलायचे झाले, तर ते अरिजित सिंग आणि साशा तिरुपती यांनी गायले आहे, गीत इर्शाद कामिल यांनी लिहिले आहे आणि एआर रहमान यांनी याला संगीत दिले आहे.

नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला

‘अतरंगी रे’ हा धनुषचा आनंद एल रायसोबतचा दुसरा चित्रपट आहे. याआधी दोघांनी ‘रांझना’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे. त्याचबरोबर सारा अली खान आणि धनुषसोबत अक्षय कुमारचा हा पहिलाच चित्रपट आहे. हे तिघेही पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. या चित्रपटात प्रेक्षकांना एक नवीन जोडी पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कलर येलो प्रॉडक्शन आणि केप ऑफ गुड फिल्म्स यांनी संयुक्तपणे केली आहे.

‘अतरंगी रे’चे शूटिंग 2020 मध्येच सुरू झाले आहे. मात्र, कोरोना महामारीमुळे ते थांबवण्यात आले होते. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अक्षय कुमार आणि दिग्दर्शक आनंद एल रॉय यांना कोरोना विषाणूची लागण झाली होती, त्यामुळेच या चित्रपटाला उशीर झाला होता.

हेही वाचा :

Janhvi Kapoor | परी म्हणू की सुंदरा… जान्हवी कपूरच्या दिलखेचक अदा पाहून चाहतेही घायाळ!

Priya Bapat | ‘मैं भी गुलाबी तू है गुलाबी, दिन भी गुलाबी है गुलाबी ये कहर…’, प्रिया बापटच्या स्मायलिंग अंदाजावर खिळल्या नजरा!

RRR Movie | प्रदर्शनापूर्वीच RRR चित्रपटाचा नवा विक्रम! अमेरिकेतील बहुसंख्य मल्टिप्लेक्समध्ये प्रदर्शित होणारा पहिला भारतीय चित्रपट!

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.