Alia Bhatt | आलिया भट्ट हिच्यावर चोरीचा आरोप, थेट दीपिका पादुकोण हिचेच
आलिया भट्ट ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आलिया भट्ट हिने मोठा खुलासा केला आहे. करण जोहर याच्या आगामी चित्रपटामध्ये आलिया भट्ट ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याचे शूटिंग काही दिवसांपूर्वीच कश्मीर येथे झाले.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) ही प्रचंड चर्चेत आहे. आलिया हिने खुलासा केला की, इतरांपेक्षा तिच्यासाठी बाॅलिवूडमध्ये डेब्यू करणे नक्कीच सोपे काम होते. 14 एप्रिल 2022 रोजी सर्वांना मोठा धक्का देत आलिया भट्ट हिने रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याच्यासोबत लग्न केले. 6 नोव्हेंबरला आलिया हिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. लग्न करण्याच्या अगोदर बरीच वर्ष आलिया आणि रणबीर कपूर हे दोघे एकमेकांना डेट करत होते. विशेष म्हणजे बाळाला जन्म दिल्यानंतर आलिया भट्ट हिने आपल्या फिटनेसकडे देखील खास लक्ष दिल्याचे दिसत आहे. आलिया भट्ट हिने काही दिवसांपूर्वीच योगा करतानाचा एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) शेअर केला होता.
आलिया भट्ट ही सध्या थोड्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. ड्रेसेस कॉपी केल्यामुळे आलिया भट्ट ही सोशल मीडियावर जोरदार ट्रोल होताना दिसत आहे. दीपिका पादुकोण हिच्या एका चाहत्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत दीपिका हिचे आलिया ड्रेसेस कॉपी करत असल्याचे म्हटले आणि तेंव्हापासून आलिया ही लोकांच्या निशाण्यावर आलीये.
alia bhatt is never beating the ‘she’s trying to be deepika padukone’ allegations i fear and we’re here for it pic.twitter.com/vHFPva9Zcf
— pathaani ?️ (@dpobsessed) May 10, 2023
दीपिका पादुकोण हिचा ग्रीन ड्रेस आलियाने काॅपी केल्याचे म्हटले जात आहेत. यासोबत काही फोटो देखील शेअर केले जात आहेत. आलिया भट्ट हिने ग्रीन ड्रेसमध्ये जे फोटोशूट केले आहे ते फोटो एका मॅगझीनसाठीचा आहे. 72 व्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये दीपिका याच ड्रेसमध्ये दिसल्याचा दावा चाहत्यांनी केला आहे.
alia bhatt is never beating the ‘she’s trying to be deepika padukone’ allegations i fear and we’re here for it pic.twitter.com/vHFPva9Zcf
— pathaani ?️ (@dpobsessed) May 10, 2023
आलिया भट्ट ही दीपिकाची काॅपी करत असल्याचा मोठा आरोप अनेकांनी केला आहे. आलिया भट्ट हिचे चाहते देखील आता तिच्या समर्थनासाठी मैदानात आल्याचे दिसत आहेत. एका युजर्सने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले की, मला भिती आहे, आलिया ही दीपिका पादुकोण बनण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, आलिया हे कशासाठी करत आहे हे कळत नाहीये.
How hard she tries she can never beat DP . https://t.co/Pk3rOHjBm1
— Sun M ☀️ (@sunm3722) May 11, 2023
दुसऱ्या युजर्सने लिहिले की, कलर पण चोरी केले गेले आहे. तिसऱ्या चाहत्यांने कमेंट करत थेट आलिया भट्ट हिच्यावर चोरीचा आरोप केला आहे. आलिया भट्ट हिच्या चाहत्यांनी दावा केला की, आलिया भट्ट हिने 2018 मध्ये हा ड्रेस घातल्याचा. आलिया भट्ट हिला मात्र दीपिका पादुकोण हिला काॅपी केल्याचे सांगत मोठ्या प्रमाणात सतत ट्रोल केले जात आहे. आलिया भट्ट ही काही दिवसांपूर्वी आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी कश्मीर येथे पोहचली होती.