चक्क सलमान खान याचा फोटोग्राफर बनला आमिर खान, विश्वास बसत नाहीये ना? पाहा फोटो
प्रत्यक्षात चित्रपट रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली. लाल सिंह चड्ढा हा चित्रपट बिग बजेटचा होता.
मुंबई : लाल सिंह चड्ढा हा चित्रपट फ्लाॅप झाल्यानंतर आमिर खान (Aamir Khan) हा बाॅलिवूड चित्रपटांपासून दूर गेलाय. इतकेच नाही तर आमिर खान हा सध्या कोणत्याच पार्टीला हजेरी लावत नाही. सोशल मीडियावरही आमिर खान हा फार जास्त सक्रिय नसतो. काही दिवसांपूर्वी आमिर खान याचे काही फोटो (Photo) सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाले होते. या फोटोंमध्ये आमिर खान याची पांढरी दाढी, पांढरे केस आणि थकलेला चेहरा पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. आमिर खान याला त्याच्या लाल सिंह चड्ढा (Laal Singh Chaddha) या चित्रपटाकडून प्रचंड अपेक्षा होत्या. या चित्रपटासाठी आमिर खान याने प्रचंड मेहनत घेतली होती. मात्र, लाल सिंह चड्ढा हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेला. आमिर खान याच्या जवळच्या एका व्यक्तीने काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, लाल सिंह चड्ढा हा चित्रपट फ्लाॅप गेल्याने आमिर खान हा तुटला आहे. सर्वकाही व्यवस्थित होण्यासाठी त्याला थोडासा वेळ लागले.
आमिर खान याने सांगितले होते की, मी आता थोडा काळ ब्रेक घेणार आहे. सतत कामामध्ये असल्यामुळे कुटुंबाला अजिबात वेळ देऊ शकलो नाहीये. त्यामुळे आता मला माझ्या कुटुंबाला वेळ द्यायचा आहे.
परत मी एका नव्या जोमाने कामाला लागेल, असेही आमिर खान याने सांगितले होते. मात्र, आमिर खान हा कधी पुनरागमन करणार हे त्याने सांगणे टाळले होते. आमिर खान याच्या लाल सिंह चड्ढा या चित्रपटाच्या विरोधात सोशल मीडियावर वातावरण बघायला मिळत होते.
प्रत्यक्षात चित्रपट रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली. लाल सिंह चड्ढा हा चित्रपट बिग बजेटचा होता. मात्र, बाॅक्स आॅफिसवरून चित्रपटाला बजेट काढणे देखील शक्य झाले नाही.
नुकताच सोशल मीडियावर आमिर खान याचा फोटो तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोमधील खास गोष्ट म्हणजे आमिर खान हा सलमान खान याचा फोटो काढत आहे.
आमिर खान याची आई झीनत हुसैन आणि बहीण निखत यांच्यासोबत सलमान खान हा फोटोसाठी पोज देत आहे. या फोटोमध्ये इतरही काही नातेवाईक दिसत असून फोटो चक्क आमिर खान क्लिक करत आहे.
View this post on Instagram
आता हा फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. फोटो शेअर करत आमिर खान याच्या बहिणाने लिहिले की, हे त्यांच्यासाठी जे आमिरला मिस करत होते…
२४ जानेवारीला उशीरा सलमान खान हा आमिर खान याच्या घरी गेला होता. यावेळी मुकेश भट्ट देखील उपस्थित होते. यामुळे एक चर्चा रंग आहे की, सलमान खान आणि आमिर खान एका चित्रपटामध्येसोबत काम करू शकतात.
आमिर खान आणि सलमान खान यांना सोबत पाहून आमिर खान याच्या चाहत्यांना मोठा आनंद झाल्याचे दिसत आहे. या पोस्टवर कमेंट करत एका चाहत्याने लिहिले की, आमिर सर कॅमेरामॅन…LOVE YOU सर….