The Big Bull Teaser | शेअर मार्केटची झलक दाखवणारा ‘द बिग बुल’चा जबरदस्त टीझर, पाहा अभिषेक बच्चनचा नवा लूक…

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) सध्या त्याच्या नवनवीन भूमिकांसाठी खूप चर्चेत आहे. अभिषेक बच्चन याच्या आगामी ‘द बिग बुल’ (The Big Bull)  या चित्रपटाची चाहते प्रतीक्षा करत आहेत.

The Big Bull Teaser | शेअर मार्केटची झलक दाखवणारा ‘द बिग बुल’चा जबरदस्त टीझर, पाहा अभिषेक बच्चनचा नवा लूक...
द बिग बुल
Follow us
| Updated on: Mar 16, 2021 | 1:19 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) सध्या त्याच्या नवनवीन भूमिकांसाठी खूप चर्चेत आहे. अभिषेक बच्चन याच्या आगामी ‘द बिग बुल’ (The Big Bull)  या चित्रपटाची चाहते प्रतीक्षा करत आहेत. या चित्रपटाचे पोस्टर देखील प्रदर्शित झाले होते. चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अभिषेक बच्चन या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आता, या चित्रपटाचा टीझर आणि रिलीज डेट अखेर चाहत्यांसमोर आली आहे (Bollywood Actor Abhishek Bachchan Starrer The Big Bull Teaser release).

अभिषेक बच्चनचा ‘द बिग बुल’ हा चित्रपट 1992 मधील भारतीय शेअर बाजाराच्या सर्वात मोठ्या घोटाळ्यातील आरोपी हर्षद मेहतावर आधारित आधारित आहे. हर्षद मेहता हे शेअर बाजारातील एक मोठे नाव होते. हर्षदने अनेक आर्थिक गुन्हे केले होते, त्यामुळे त्याला अटक करण्यात आली होती.

कधी प्रदर्शित होणार चित्रपट आणि कसा आहे टीझर?

चित्रपटाचा टीझर 1987च्या काळापासून सुरू होतो, त्यानंतर एक व्यक्ती चष्मा घातलेली दिसते. मग, बॅकग्राउंडला अजय देवगणच्या आवाजात ऐकू येते की, ‘छोटे घरों में पैदा होने वालों को अक्सर बड़े सपनों को देखने से दुनिया मना कर देते हैं. इसलिए ही उसने अपनी दुनिया खड़े कर दी, द बिग बुल….’

या चित्रपटाचा ट्रेलर 19 मार्च रोजी चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. ‘द बिग बुल’ हा चित्रपट 8 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट डिस्ने हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. म्हणजेच आता हा चित्रपट लवकरच चाहत्यांची भेटीस येणार आहे.  8 एप्रिल रोजी हा चित्रपट सगळ्यांना पाहण्यासाठी उपलब्ध होईल (Bollywood Actor Abhishek Bachchan Starrer The Big Bull Teaser release)

पाहा ‘द बिग बुल’चा टीझर :

 (Bollywood Actor Abhishek Bachchan Starrer The Big Bull Teaser release)

मोठ्या पडद्यावर दिसणार ‘हर्षद मेहता’ घोटाळा

अभिषेक बच्चन स्टारर फिल्म ‘द बिग बुल’चा टीझर आज (16 मार्च) प्रदर्शित करण्यात आला आहे. यातील अभिषेकचा लूक पाहून तुम्हाला त्याचा ‘गुरु’ हा चित्रपट नक्कीच आठवेल. गुरु चित्रपटात धीरूभाई अंबानीची भूमिका साकारणारा जुनिअर बच्चन आता प्रेक्षकांना ‘हर्षद मेहता घोटाळ्या’ची पडद्यावर आठवण करुन देणार आहे. 1990 ते 2000च्या दरम्यान शेअर बाजारात झालेला घोटाळा आणि संपूर्ण शेअर मार्केटला हादरवून टाकणारे घोटाळे या चित्रपटात दाखवले जातील. या चित्रपटाचे दिग्दर्शन कोकी गुलाटी यांनी केले असून, यात अभिषेक मुख्य भूमिकेत आहे.

या चित्रपटात अशा एका माणसाची कथा दाखवण्यात आली आहे, ज्याने भारताला स्वप्ने विकली. हा चित्रपट अजय देवगन आणि आनंद पंडित निर्मित करत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन कुकी गुलाटी यांनी केले आहे. अभिषेकशिवाय इलियाना डिक्रूझ, सोहम शाह आणि निकिता दत्तादेखील या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत.

(Bollywood Actor Abhishek Bachchan Starrer The Big Bull Teaser release)

हेही वाचा :

आधी हातावर नावं गोंदवली, आता मात्र एकमेकांसोबत दिसणंही कठीण! शिव-वीणाच्या नात्यात ‘का रे दुरावा’?

SSR Drugs Case | रिया चक्रवर्तीच्या अडचणीत पुन्हा वाढ होणार, NCBकडून जामिनाविरोधात याचिका दाखल!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.