चित्रपट चाहत्यांसाठी एक वाईट बातमी, अक्षय कुमार जखमी, अ‍ॅक्शन सीनच्या चित्रीकरणादरम्यान अपघात

अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी एक खूप वाईट बातमी आहे. एका अ‍ॅक्शन सीनच्या चित्रीकरणादरम्यान अनपेक्षित प्रकार घडला आहे. अक्षय कुमार टायगर श्रॉफ याच्यासोबत चित्रीकरण करत असताना अपघात घडलाय.

चित्रपट चाहत्यांसाठी एक वाईट बातमी, अक्षय कुमार जखमी, अ‍ॅक्शन सीनच्या चित्रीकरणादरम्यान अपघात
Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 24, 2023 | 12:01 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. अक्षय कुमार आगामी चित्रपटाच्या अ‍ॅक्शन सीनच्या चित्रीकरणादरम्यान जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अक्षय कुमार त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो. तो त्याच्या फिटनेसची खूप काळजी घेतो. त्यामुळे तो त्याने ठरवल्यानुसार पोषक आहार खातो. रात्री लवकर झोपतो आणि पहाटे लवकर उठून व्यायाम करतो. त्याच्या या जीवनशैलीचं नेहमी कौतुक होत असतं. त्याची आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे तो चित्रपटामध्ये अ‍ॅक्शन सीनच्या शूटींग दरम्यान स्वत: स्टंट करतो. यासाठी तो कुणाचीही मदत घेत नाही. पण त्याचा हाच आत्मविश्वास त्याच्यासाठी घातक ठरला आहे. कारण एका चित्रपटाच्या शूटींग दरम्यान अपघाताची घटना घडलीय.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमार यांचा एक चित्रपट आगामी काळात प्रदर्शित होणार आहे. त्याच्या चित्रीकरणादरम्यान दुर्घटना घडली आहे. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफचा ‘बडे मियां छोटे मियां’ असा चित्रपट आगामी काळात प्रदर्शित होणार आहे. याच चित्रपटाच्या शूटींगदरम्यान अ‍ॅक्शन सीन चित्रित करत असताना अपघात घडला. त्यामुळे अभिनेता अक्षय कुमार जखमी झाला आहे.

जखमी झाल्यानंतरही क्लोज-अप सीन्ससाठी चित्रीकरण सुरु

‘बडे मियां छोटे मियां’ या चित्रपटाचं चित्रीकरण स्कॉटलंडला सुरु आहे. तिथे संबंधित अनपेक्षित घटना घडली आहे. या अपघातात अक्षय कुमारला सुदैवाने फार गंभीर दुखापत झालेली नाही, अशी दिलासादायक माहितीदेखील समोर आलीय. विशेष म्हणजे जखमी झाल्यानंतरही अक्षय कुमार आपल्या चित्रपटाच्या टीमसोबत चित्रीकरण करत आहेत.

अक्षय कुमार जखमी असताना क्लोज-अप सीन्ससाठी शूट करत आहेत. कारण चित्रपटाच्या चित्रीकरणाला खूप खर्च होतो. यासाठी चित्रीकरणाचा दौरा ठरलेला असतो. त्या वेळेत चित्रीकरण पूर्ण करायचा प्लॅन असतो. याशिवाय इतर कलाकारांचे इतर प्रोजेक्ट्सही असतात. त्यामुळे स्कॉटलंडला चित्रीकरण करण्यात उशिर होऊ नये, यासाठी चित्राकरण सुरु आहे.

दिग्दर्शक अली अब्बास जफर या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. त्यांना याआधी प्रदर्शित झालेल्या टायगर जिंदा है, सुल्तान, भारत, मेरे ब्रदर की दुल्हन, गुंडे सारख्या अनेक मोठ्या चित्रपटांसाठी केलेल्या कामांसाठी ओळखलं जातं.

'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.