‘राम सेतू’ चित्रपटाच्या सेटवर कोरोनाचा विस्फोट, अक्षय कुमारपाठोपाठ तब्बल 45 सहकलाकारांना कोरोनाची लागण

क्षय कुमारला कोरोनाची लागण होण्यापूर्वी तो या चित्रपटाच्या सेटवर शूटींग करत होता. (Akshay Kumar junior artists Corona Positive)

'राम सेतू' चित्रपटाच्या सेटवर कोरोनाचा विस्फोट, अक्षय कुमारपाठोपाठ तब्बल  45 सहकलाकारांना कोरोनाची लागण
अक्षय कुमार
Follow us
| Updated on: Apr 05, 2021 | 9:22 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारपाठोपाठ त्याच्या तब्बल 45 सहकलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. हे सर्व कलाकार अक्षय कुमारचा आगामी चित्रपट राम सेतू यातील आहेत. त्यामुळे राम सेतू चित्रपटाच्या सेटवर कोरोनाचा विस्फोट पाहायला मिळत आहे. यामुळे या चित्रपटाचे शूटींग थांबवण्यात आले आहे. (Bollywood actor Akshay Kumar Ram Setu Movie 45 junior artists test COVID-19 positive)

मिळालेल्या माहितीनुसार, राम सेतू या चित्रपटाची शूटींग मड आयलँडला होत आहे. या शूटींगसाठी काल (5 एप्रिल) 100 नवीन ज्युनिअर आर्टिस्ट काम सुरु करणार होती. मात्र कोरोना चाचणी बंधनकारक असल्याने त्या सर्वांची चाचणी करण्यात आली. यावेळी त्यातील 45 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. यानंतर त्या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंड‍िया सिनेइम्प्लॉईजने (FWICE) दिलेल्या माहितीनुसार, राम सेतू या चित्रपटाच्या टीमने पूर्ण खबरदारी घेतली होती. मात्र दुर्देवाने 45 ज्युनिअर आर्टिस्टला कोरोनाची लागण झाली आहे. सध्या त्या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

चित्रपटाचे शुटींग 13-14 दिवस पुढे ढकललं

अक्षय कुमारसोबत 45 ज्युनिअर आर्टिस्टला कोरोनाची लागण झाल्याने चित्रपटाचे शूटींग पुढे ढकलण्यात आलं आहे. जवळपास 13 ते 14 दिवसांनंतर या चित्रपटाचे शूटींग पुन्हा सुरु होणार आहे. दरम्यान अक्षय कुमारला कोरोनाची लागण होण्यापूर्वी तो या चित्रपटाच्या सेटवर शूटींग करत होता.

शूटींगदरम्यान कोरोनाची चाचणी बंधनकारक 

विशेष म्हणजे या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान बरीच सावधानता बाळगली गेली होती. या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान कोरोना चाचणी करणे गरजेचे करण्यात आले होते. यातील अनेकांना शूटींगपूर्वी काही दिवस आयसोलेट केलं जाते. मात्र या दरम्यान त्या कलाकारांचे पैसे कापले जात नाही. तसेच जरी सेटवर कोणाची तब्येत बिघडली तरी त्यांंना अलगीकरणात ठेवले जाते. तसेच अनेकांना या ठिकाणी पीपीई किट देण्यात आले आहेत.

रामसेतूच्या शुटींगला सुरुवात

दरम्यान अक्षय कुमारने काही दिवसांपूर्वी अ‍ॅक्शन-अ‍ॅडव्हेंचर असलेल्या राम-सेतू या चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात केली होती. या चित्रपटात अक्षय पुरातत्वशास्त्रज्ञ म्हणून भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचा पहिला लूक त्याने नुकतंच शेअर केला होता. माझ्यासाठी सर्वात खास चित्रपट बनवण्याचा प्रवास आजपासून सुरू होत आहे. राम सेतुचे शुटिंग सुरू! मी चित्रपटात पुरातत्वशास्त्रज्ञाची भूमिका साकारत आहे. माझ्या या लूकवर आपले विचार ऐकायला मला आवडतील…हे माझ्यासाठी नेहमीच महत्त्वाचे आहे.’ अशी पोस्ट त्याने इन्स्टाग्रामवर केली होती.

राम सेतू हा चित्रपट अभिषेक शर्मा दिग्दर्शित करत आहे. या चित्रपटात अक्षयसोबत अभिनेत्री नुसरत भरुचा आणि जॅकलिन फर्नांडिसही दिसणार आहे.

अक्षय कुमारला कोरोना 

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याला कोरोनाची लागण झाली आहे. त्याने स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. “आज सकाळी माझा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर मी सर्व प्रोटोकॉल पाळत स्वत:ला आयसोलेट केलं आहे. मी सध्या घरातच क्वारंटाईन आहे. तसेच डॉक्टरांनी दिलेले सर्व उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्या. तसेच शक्य असल्यास कोरोना चाचणी करुन घ्यावी. Back in Action Very Soon,” असे ट्वीट अक्षय कुमार याने केले आहे. (Bollywood actor Akshay Kumar Ram Setu Movie 45 junior artists test COVID-19 positive)

संबंधित बातम्या : 

Akshay Kumar Corona | Back in Action Very Soon! बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला कोरोनाची लागण

Akshay Kumar | अक्षय कुमारने सुरु केले ‘राम सेतु’चे चित्रीकरण, लूकविषयी सांगताना म्हणाला…

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.