The Kashmir Files Movie : अनुपम खेर यांच्या ‘द कश्मीर फाईल्स’चा ट्रेलर आऊट, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद

'द कश्मीर फाईल्स' हा चित्रपट आता 11 मार्चला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे.

The Kashmir Files Movie : अनुपम खेर यांच्या 'द कश्मीर फाईल्स'चा ट्रेलर आऊट, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
द कश्मीर फाईल्स
Follow us
| Updated on: Feb 21, 2022 | 11:36 AM

आयेशा सय्यद, मुंबई :द कश्मीर फाईल्स (The Kashmir Files Movie) हा चित्रपट आता 11 मार्चला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. याआधी हा चित्रपट मागच्या वर्षी स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्टला प्रदर्शित होणार होता. पण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलण्यात आली. आता हा चित्रपट येत्या 11 मार्चला प्रदर्शित होतोय.विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तसंच अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher), अभिनेते मिथून चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांच्यासारखी स्टारकास्ट या चित्रपटात पहायला मिळणार आहे.हा चित्रपट काश्मिरी पंडितांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळताना दिसतोय.

‘द कश्मीर फाईल्स’चा ट्रेलर प्रदर्शित

‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे.या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट कश्मीरी पंडिताच्या जीवनावर आधारित आहे. 1989 आणि 1990 मध्ये काश्मिरी पंडितांच्या झालेल्या स्थलांतरावर हा सिनेमा भाष्य करतो. हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहे.

प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

‘द कश्मीर फाईल्स’या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सिने रसिकांनी कमेंट करून या ट्रेलरवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. एकाने हा ट्रेलर बघून अक्षरशः माझे डोळे पाणावले, “कश्मिरी पंडितांची ही कहाणी प्रत्येकाने जाणून घेतली पाहिजे”, असं म्हटलंय. तर दुसऱ्याने “हा फक्त चित्रपट नाही तर आमच्या भावना आहेत”, अशी कमेंट केली आहे.

तर आणखी एकाने या ट्रेलरवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.”मागचे कित्येक दिवस या चित्रपटाची मी वाट पाहत होतो. अखेर त्याचा ट्रेलर आला आहे.सगळ्याच कलाकारांनी चांगलं काम केलं आहे. असा चित्रपट करण्यासाठी दिग्दर्शकांचे आभार”, असं म्हटलंय.

चित्रपटातील कलाकार

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट येत्या 11 मार्चला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ब्रह्मा दत्तच्या भूमिकेत मिथुन चक्रवर्ती, पुष्करनाथच्या भूमिकेत अनुपम खेर, कृष्णा पंडितच्या भूमिकेत दर्शन कुमार, राधिका मेननच्या भूमिकेत पल्लवी जोशी, श्रद्धा पंडितच्या भूमिकेत भाषा सुंबली, फारूक मलिक हे कलाकार एकत्र पडद्यावर पहायला मिळणार आहेत.

‘द काश्मीर फाइल्स’ कश्मीरी पंडिताच्या जीवनावर आधारित असलेला हा चित्रपट येत्या 11 मार्चला प्रदर्शित होतोय. त्यामुळे या चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळतो, हे पहावं लागेल.

संबंधित बातम्या

सारा अली खानने शेअर केले ट्रान्सफरंट ड्रेसमधले फोटो, कमेंट्समध्ये नुसता जाळ!

Rashmika Mandanna : ज्या रश्मिकावर अख्ख्या देशाचा क्रश होता, तिचाच साखरपुडा तुटलेला, काय झालेलं नेमकं?

अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या घरी लवकरच सनई-चौघडे वाजणार?…नॅशनल क्रश असलेली रश्मिका ‘या’ घराण्याची सून होणार!

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.