किंग खानची लेक सुहाना खानचं सिनेसृष्टीत पदार्पण, भाऊ आर्यन म्हणाला, “All The Best Baby Sister!” ड्रग्ज प्रकरणानंतर पहिली पोस्ट

ड्रग्ज प्रकरणाच्या वादानंतर आर्यनने सोशल मीडियावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ड्रग वाद प्रकरणानंतर तो पहिल्यांदाच व्यक्त झालाय. त्याने सुहानाला शुभेच्छा दिल्या आहेत.

किंग खानची लेक सुहाना खानचं सिनेसृष्टीत पदार्पण, भाऊ आर्यन म्हणाला, All The Best Baby Sister! ड्रग्ज प्रकरणानंतर पहिली पोस्ट
Follow us
| Updated on: May 15, 2022 | 6:31 PM

मुंबई : शाहरुख खानची लेक सुहाना खान (Suhana Khan) सिनेसृष्टीत पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. झोया अख्तर दिग्दर्शित ‘द आर्चीज’ (The Archies Movie) या सिनेमात ती काम करतेय. या चित्रपटाचा टीझर काल (14 मे) रोजी रिलीज झाला आहे. या चित्रपटातून सुहाना खानसोबत इतर अनेक स्टार किड्सही डेब्यू करत आहेत. या चित्रपटात सुहाना खानसोबत बोनी कपूरची मुलगी खुशी कपूर, अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा पदार्पण करणार आहेत. पुढील वर्षी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या निमित्त सुहानाचा भाऊ आर्यन खानने (Aryan Khan) आपलं मत व्यक्त केलंय त्याने सुहानाला शुभेच्छा दिल्या आहेत.

‘द आर्चीज’ चा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर त्यावर आर्यन खानने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने टीझर शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिलं की, “बेस्ट ऑफ लक बेबी सिस्टर. टीझर छान आहे, सगळंच मस्त झालंय. तुम्ही सगळे छान काम करत आहात.” आर्यन हा शाहरूखखानचा लेक आहे. पण स्टार किड असूनही तो सोशल मीडियावर जास्त अॅक्टिव नसतो. त्याने 2021 मध्ये शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली होती.

आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. आर्यनला महिनाभर न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलं होतं. मात्र, नंतर त्याला जामीन मंजूर झाला. ड्रग्ज प्रकरणाच्या वादानंतर आर्यनने सोशल मीडियावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ड्रग वाद प्रकरणानंतर तो पहिल्यांदाच व्यक्त झालाय. त्याने सुहानाला शुभेच्छा दिल्या आहेत. आर्यनने ही पोस्ट धाकटी बहीण सुहाना खानला समर्पित केली आहे. सुहानाच्या डेब्यू चित्रपट ‘द आर्चीज’चा टीझर आल्यानंतर आर्यनने छोट्या बहिणीला चीअर केलं आहे.

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.