SSR Case : ‘आमचा तपासच जिंकणार’ म्हणत मुंबई पोलिस आयुक्तांचे सीबीआयला रोकडे सवाल!, पाहा काय म्हणाले परमबीर सिंह….

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतला (Sushant Singh Rajput) जग सोडून 6 महिन्यांपेक्षाही अधिक काळ झाला आहे.

SSR Case : 'आमचा तपासच जिंकणार' म्हणत मुंबई पोलिस आयुक्तांचे सीबीआयला रोकडे सवाल!, पाहा काय म्हणाले परमबीर सिंह....
Follow us
| Updated on: Jan 02, 2021 | 10:57 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतला (Sushant Singh Rajput) जग सोडून 6 महिन्यांपेक्षाही अधिक काळ झाला आहे. सीबीआयकडून (Central Bureau of Investigation) त्याच्या केसची चौकशी केली जात आहे. मात्र, सीबीआयने आतापर्यंत कोणताही अहवाल सादर केला नसल्यामुळे आता सीबीआयच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अगोदर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि आता मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Paramvir Singh) यांनी सीबीआयच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले आहेत. (Bollywood actor Sushant Singh Rajput case)

सुशांतसिंग राजपूत प्रकरणाबद्दल बोलताना आयुक्त परमबीर सिंह म्हणाले की, लवकरच सीबीआय सुशांत सिंह राजपूतच्या केसचा अहवाल सादर करेल आणि त्यांचा आणि आमचा अहवाल एक सारखाच असेल अगोदरच सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते की, मुंबई पोलिसांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणात केलेली चौकशी योग्य आहे. मात्र, काही लोकांनी मुंबई पोलिसांचे नाव खराब करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेवटी आमचा तपासच जिंकणार आहे.  काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सीबीआयच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह उभे केले होते.

4 जून रोजी सुशांतसिंग राजपूत त्याच्या मुंबईच्या घरी मृत अवस्थेत आढळला होता. त्यानंतर आतापर्यंत या प्रकरणाचा तपास सुरू आहे. रिया चक्रवर्तीला सुशांतसिंग राजपूत मृत्यू ड्रग्स प्रकरणात एनसीबीने अटक केली होती. रिया जवळपास 1 महिना तुरूंगात होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने रियाला जामीन मंजूर केला आहे.

सुशांतचा प्रवास

स्टार प्लसवर ‘किस देश मे है मेरा दिल’ मालिकेतून 2008 मध्ये टीव्ही क्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्यानंतर झी टीव्हीवर ‘पवित्र रिश्ता’ मालिका प्रचंड गाजली होती.

पवित्र रिश्ता मालिकेतील सहअभिनेत्री अंकिता लोखंडे सोबत सुशांतची जोडी अत्यंत लोकप्रिय ठरली होती. सुशांत आणि अंकिता काही वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. मात्र दोन वर्षांपूर्वी दोघं विभक्त झाले होते.

2013 मध्ये ‘काय पो छे’ चित्रपटातून सुशांतने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. त्यानंतर शुद्ध देसी रोमान्स, डिटेक्टीव्ह ब्योमकेश बक्षी, पीके असे सिनेमे गाजले.

एम एस धोनी चित्रपटात त्याने धोनीची भूमिका केली होती. या भूमिकेने तो यशोशिखरावर पोहोचला. नुकतेच त्याचे केदारनाथ, छिछोरे हे चित्रपट लोकप्रिय ठरले.

संबंधित बातम्या : 

Sushant Singh Rajput | मैत्रिणीसोबत तणावाचे संबंध, सुशांतसिंह राजपूतच्या नोकराचा दावा

Sushant Singh Rajput | चार दिवसापूर्वी मॅनेजरची इमारतीवरुन उडी, आज सुशांतचा गळफास

(Bollywood actor Sushant Singh Rajput case)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.