Ganapath | अरे देवा! टायगरच्या डोळ्याला काय झालं? ‘गणपत’च्या चित्रिकरणादरम्यान टायगर श्रॉफ जखमी!

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) त्याच्या फिटनेस आणि उत्तम नृत्यशैलीमुळे नेहमीच चर्चेत असतो. कलाकार अनेकदा त्यांचे डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. सध्या अभिनेता त्याच्या आगामी 'गणपत : पार्ट 1' (Ganapath Part 1 ) या चित्रपटाच्या शूटिंगसाठी अमेरिकेत आहे.

Ganapath | अरे देवा! टायगरच्या डोळ्याला काय झालं? ‘गणपत’च्या चित्रिकरणादरम्यान टायगर श्रॉफ जखमी!
Tiger Shroff
Follow us
| Updated on: Dec 22, 2021 | 3:07 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) त्याच्या फिटनेस आणि उत्तम नृत्यशैलीमुळे नेहमीच चर्चेत असतो. कलाकार अनेकदा त्यांचे डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. सध्या अभिनेता त्याच्या आगामी ‘गणपत : पार्ट 1’ (Ganapath Part 1 ) या चित्रपटाच्या शूटिंगसाठी अमेरिकेत आहे.

‘गणपत’ हा एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटाच्या घोषणेनंतर चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटात टायगरसोबत क्रिती सेनन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्याने महिनाभरापूर्वीच या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले होते. टायगर या चित्रपटासाठी खूप मेहनत घेत आहे.

शुटिंग करताना टायगर जखमी

‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ स्टार त्याच्या इन्स्टाग्रामवर चित्रपटाशी संबंधित अपडेट्स सतत शेअर करत असतो. या अभिनेत्याने नुकतेच सांगितले आहे की, शूटिंगदरम्यान त्याच्या डोळ्यात दुखापत झाली आहे. अभिनेत्याने त्याच्या इंस्टाग्रामवर एक फोटो देखील शेअर केला आहे आणि त्याला कॅप्शन दिले आहे, ‘हे गणपतच्या अंतिम काउंट डाउनपूर्वीचे आहे.’

टायगर ‘गणपथ’च्या शूटिंगचे फोटो आणि व्हिडिओ सतत शेअर करत असतो. जे पाहून हा चित्रपट अ‍ॅक्शनने भरलेला असेल याचा अंदाज बांधता येतो. या फोटोंमध्ये अभिनेता दमदार अॅक्शन सीन्स करताना दिसत आहे. पुढील वर्षी ख्रिसमसच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी टायगर आणि क्रितीची जोडी ‘हिरोपंती’मध्ये एकत्र दिसली होती. दोघांची जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरली होती.

अमिताभ बच्चनही बनणार चित्रपटाचा भाग!

क्रिती, टायगर व्यतिरिक्त एली अबरामही या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पिंकविलाच्या वृत्तानुसार, चित्रपटाच्या निर्मात्यांना अमिताभ बच्चन यांनी टायगरच्या वडिलांची भूमिका करावी अशी इच्छा आहे. या चित्रपटात टायगर बॉक्सरची भूमिका साकारत आहे, टायगरचे ऑनस्क्रीन वडील देखील त्यांच्या काळातील बॉक्सर असणार आहेत.

स्क्रिप्टनुसार वडील हे मुख्य पात्र असून यासाठी निर्माते अमिताभ बच्चन यांच्याशी सतत चर्चा करत आहेत. तथापि, तारीख आणि इतर कोणत्याही माहितीबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी नाही. मात्र, चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण यूकेमध्ये होणार आहे. टायगर आणि क्रिती लंडनला पोहोचले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शूटिंग आणखी दोन महिने चालणार आहे. दुसरीकडे, वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर टायगर ‘हिरोपंती 2’ मध्ये दिसणार आहे. त्याच्यासोबत अभिनेत्री तारा सुतारिया दिसणार आहे. अहमद खान यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

हेही वाचा :

चाहत्याच्या लग्नात चक्क सेलिब्रिटींची एण्ट्री, ‘ओम आणि स्वीटू’ जोडीने विवाह सोहळ्याचा आनंद दुणावला!

Money Laundering Case : बॉलिवूड सेलिब्रिटींनी तुरुंगात जाऊनही घेतली सुकेश चंद्रशेखरची भेट, अनेक सेलिब्रिटी गोत्यात येणार!

Aishwarya Rai Bachchan | ‘बच्चन’ परिवार अडचणीत, ऐश्वर्या रायला ‘ईडी’चे समन्स! नेमकं प्रकरण काय?

Kajal Aggarwal | ‘सिंघम’ फेम अभिनेत्री काजल अग्रवालकडे ‘गुड न्यूज’? नव्या फोटोंमुळे चर्चेला उधाण!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.