Ranbir Kapoor-Alia Bhatt Wedding : आलिया भटचा जन्म मुंबईचा, पण नागरिकत्व भारताचं नव्हे तर ‘या’ देशाचं
आलियाचा जन्म जरी भारतात झाला असला तरी ती भारताची नागरिक नाही तर तिच्याकडे ब्रिटीश नागरिकत्व आहे. त्यामुळे आलिया भारतात होणाऱ्या निवडणुकांमध्ये मतदानदेखील करू शकत नाही.
मुंबई : अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट (Alia Bhatt) यांच्या लग्नाबाबत सध्या जोरदार चर्चा आहे. त्याच सोबत त्यांच्या आयुष्यातील काही गोष्टीही सोशल मीडियावर चर्चेत आहेत. आलियाने एका मुलाखतीदरम्यान तिच्या नागरिकत्वाचा किस्सा सांगितला होता. त्यावरून आता सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. आलियाचं नागरिकत्व नेमकं कोणत्या देशाचं आहे तिच्याकडे भारताचं नागरिकत्व आहे का अश्या प्रश्नांनी सध्या सोशल मीडिया व्यापलाय. तर आलियाचा जन्म जरी भारतात झाला असला तरी ती भारताची नागरिक नाही तर तिच्याकडे ब्रिटीश नागरिकत्व (British Citizenship) आहे. त्यामुळे आलिया भारतात होणाऱ्या निवडणुकांमध्ये मतदानदेखील करू शकत नाही.
आलिया ब्रिटीश नागरिक
आलियाचा जन्म जरी भारतात झाला असला तरी ती भारताची नागरिक नाही तर तिच्याकडे ब्रिटीश नागरिकत्व आहे. त्यामुळे आलिया भारतात होणाऱ्या निवडणुकांमध्ये मतदानदेखील करू शकत नाही.
आलिया काय म्हणाली?
आलियाने एका मुलाखतीदरम्यान आपल्या नागरिकत्वाबाबत खुलासा केला होता. “माझ्याकडे ब्रिटीश पासपोर्ट आहे. पुढच्या निवडणुकांमध्ये मी मतदान करेल. तोपर्यंत मला भारताचं नागरिकत्व मिळेल”, असं आलिया म्हणाली होती. भारतात एकेरी नागरिकत्व आहे. त्यामुळे ती एकाचवेळी दोन देशांची नागरिक होऊ शकत नाही.
रणबीर कपूर आणि आलिया भट या दोघांच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. लवकरच लग्नबंधनात हे दोघे अडकणार आहे. रणबीर आणि आलियाने लग्नाबाबत अद्याप कोणतीही माहिती दिली नसली तरी 13 ते 17 एप्रिलदरम्यान हे दोघं लग्नगाठ बांधणार असल्याचं म्हटलं जात आहे. मुंबईतील चेंबूर इथल्या आर. के. बंगल्यावर मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थित रणबीर-आलिया लग्न करतील, अशी माहिती आहे. सध्या या बंगल्यातही जोरदार तयारी सुरू आहे.
संबंधित बातम्या