AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anushka Sharma Birthday : किंग खानसोबत पहिला चित्रपट, लव्हलाईफ आणि बरंच काही… हॅप्पी बर्थ डे अनुष्का शर्मा!

अनुष्का शर्माने रब ने ना दी जोडी या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर बॅन्ड बाजा बारात, पटियाला हाऊस, जब तक है जान, पीके, दिल धडकने दो, सुल्तान, ए दिल है मुश्किल, सुई धागा, झीरो या सिनेमांमध्ये तिने काम केलंय.

Anushka Sharma Birthday : किंग खानसोबत पहिला चित्रपट, लव्हलाईफ आणि बरंच काही... हॅप्पी बर्थ डे अनुष्का शर्मा!
अनुष्का शर्मा
| Updated on: May 01, 2022 | 9:57 AM
Share

मुंबई : बॉलिवूडला एकाहून एक हिट चित्रपट देणारी अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हिचा आज 34 वा वाढदिवस आहे. अनुष्काचा जन्म 1 मे 1988 रोजी अयोध्येत झाला. तिचा पहिला सिनेमा बॉलिवूडचा किंग शाहरूख खानसोबत होता. ‘रब ने ना दी जोडी’ (Rab ne bana di jodi) या चित्रपटात त्यांनी एकत्र काम केलं. तो 2008 ला प्रदर्शित झाला होता. यानंतर तिने अनेक हिट सिनेमे दिले. शिवाय तिने अनेक उत्तमोत्तम जाहिरातीही केल्या आहेत. तिच्या करिअर सोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींवरही चर्चा होत असते. आज तिचा वाढदिवस आहे तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

चित्रपटांची ‘मालिका’

अनुष्का शर्माने रब ने ना दी जोडी या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर बॅन्ड बाजा बारात, पटियाला हाऊस, जब तक है जान, पीके, दिल धडकने दो, सुल्तान, ए दिल है मुश्किल, सुई धागा, झीरो या सिनेमांमध्ये तिने काम केलंय. बऱ्याच दिवसांच्या गॅपनंतर आता ती ‘चकडा एक्स्प्रेस’मधून चित्रपटात पुनरागमन करत आहे. यात ती भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार झुलन गोस्वामीच्या भूमिकेत दिसणार आहे.

अनुष्काचं लव्ह लाईफ

अनुष्काच्या करिअरप्रमाणेच तिच्या वैयक्तिक आयुष्यतील घडामोडींमुळे चर्चेत असते. अनुष्काने 2017 मध्ये क्रिकेटपटू विराट कोहलीसोबत लग्न केलं. एका शॅम्पूच्या जाहिराती दरम्यान त्यांची ओळख झाली. मग पुढे त्यांची मैत्री बहरत गेली. दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले अन् लग्नगाठ बांधली. त्यांना वामिका नावाची एक गोड मुलगी आहे.

अनुष्काची संपत्ती

अनुष्का शर्मा एका चित्रपटासाठी 7 ते 10 कोटी रुपये घेत असल्याची माहिती आहे. चित्रपटांव्यतिरिक्त अनुष्का अनेक जाहिराती करते. जाहिरातींसाठी 10-12 लाख रुपये मानधन घेत असल्याची माहिती आहे. याशिवाय तिचा भाऊ कर्णेश शर्मा आणि ती क्लीन स्लेट फिल्म्स नावाचे प्रोडक्शन हाऊस चालवते. अनुष्का शर्माचं मुंबईत अलिशान गाड्या आहेत. रेंज रोव्हर, बेंटले फ्लाय, बीएमडब्ल्यू सारख्या आलिशान गाड्या तिच्याकडे आहेत. अनुष्का शर्मा 2019 मध्ये जवळपास 300 कोटींची मालकीण होती,अशी माहिती आहे. तर विरुष्काची संपत्ती 2019 मध्ये 12 अब्ज रुपये होती. आता यात वाढ झाली असेल.

भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.