Mother’s Day 2022 : आई आणि सासुबाईंचे फोटो शेअर करत मिस्टर ॲण्ड मिसेस कौशिकचा मदर्स डे साजरा…
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशलनेही त्यांचे आईसोबतचे फोटो शेअर केलेत. कतरिनाने तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या आईसोबतचे आणि सासूबाईंसोबतचे फोटो शेअर केले आहेत.
मुंबई : आज मदर्स डे (Mother’s Day 2022) आहे. त्यानिमित्त अनेकांनी आपल्या आईसोबतचे खास फोटो शेअर केलेत. सेलिब्रिटी मंडळींनी देखील खास फोटो शेअर केले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशलनेही (Vicky Kaushal) त्यांचे आईसोबतचे फोटो शेअर केलेत. कतरिनाने तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या आईसोबतचे आणि सासूबाईंसोबतचे फोटो शेअर केले आहेत. तर तिचा पती विकीनेही मदर्स डे निमित्त फोटो शेअर केले आहेत.
कतरिनाची इन्स्टा पोस्ट
कतरिनाने तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या आईसोबतचे आणि सासूबाईंसोबतचे फोटो शेअर केले आहेत. पहिला फोटो तिच्या आईसोबतचा आहे. तर दुसरा फोटो तिच्या सासूबाई म्हणजेच विकीच्या आईसोबतचा आहे. या फोटो या दोघींसोबत विकी दिसतोय. याला तिने Mother’s Day, असं कॅप्शन दिलं आहे.
View this post on Instagram
विकीची इन्स्टा पोस्ट
विकी कौशलनेही मदर्स डे निमित्त आईसोबतचे फोटो शेअर केलेत. यातला पहिला फोटो विकी आणि कतरिनाच्या लग्नातला आहे. ज्यात त्याची आई वरातीत नाचताना दिसतेय. तर दुसरा त्याच्या हळदीचा आहे. तिसरा फोटो त्याच्या सासूबाई म्हणजेच कतरिनाच्या आईसोबतचा आहे.ज्यात दोघे आशिर्वाद घेताना दिसत आहेत.
View this post on Instagram
मदर्स डे विशेष
बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर सोबत लग्नगाठ बांधलेल्या अभिनेत्री आलिया भट्टनेही आपली आई व सासू नीतू कपूर सोबतचा फोटो शेअर करत मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
युट्युबर व प्रसिद्ध अभिनेत्री मिथिला पालकरनेही आपल्या इन्स्ट्राग्राम अकाऊंटवर आपल्या आजी सोबतचा फोटो पोस्ट करून मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मिथिलाचे व तिच्या आजीचे बॉण्डिंग खूप खास आहेत. आमची आशा व ताकद , तुझ्या सारखं दुसरं कोणीच असू शकत नाही असे कॅप्शन तिने आपल्या पोस्टला दिले आहे.
View this post on Instagram