AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिग्दर्शक रोहित शेट्टी सात महिन्यात बनवणार ‘सिंघम 3’ चित्रपट, असे असेल शूटिंगचे शेड्युल

कोरोना महामारीमुळे अजय देवगणकडे आधीच एक बॅकलॉग आहे. त्यामुळे आम्ही पुढच्या वर्षाच्या अखेरपर्यंत चित्रपटाची शूटिंग सुरु करु शकत नाही. सूर्यवंशीच्या एक्साइटमेंटमुळे प्रेक्षकांना सिंघम चित्रपटाची प्रतिक्षा आहे. मात्र तांत्रिकदृष्ट्या आम्ही 2023 पर्यंत चित्रपट रिलिज करु शकत नाही.

दिग्दर्शक रोहित शेट्टी सात महिन्यात बनवणार 'सिंघम 3' चित्रपट, असे असेल शूटिंगचे शेड्युल
दिग्दर्शक रोहित शेट्टी सात महिन्यात बनवणार 'सिंघम 3' चित्रपट
Follow us
| Updated on: Nov 15, 2021 | 4:24 PM

मुंबई : प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी(Rohit Shetty) आता अजय देवगण स्टारर ‘सिंघम 3’ चित्रपटाची बनविणार आहे. मात्र या चित्रपटासाठी प्रेक्षकांना बरीच वाट पहावी लागणार आहे. ‘सिंघम 3’ ची शूटिंग 2022 अखेरपर्यंत सुरु होऊ शकत नाही. रोहितने त्याची लेटेस्ट फिल्म ‘सूर्यवंशी'(Sooryavnashi)च्या शेवटी अजय देवगण स्टारर सिंघम फ्रेंचायझीच्या तिसऱ्या पार्टची हिंट दिली होती. पोलीस अॅक्शन ड्रामा ‘सिंघम 3’ बाबत प्रेक्षकांना असलेली उत्सुकता कळतेय. मात्र 2022 अखेर पर्यंत चित्रपट सुरु होऊ शकत नाही, असे दिग्दर्शक रोहित शेट्टीने स्पष्ट केले.

चित्रपटाच्या क्लायमॅक्सबाबत अनेक तर्क-वितर्क

चित्रपटाच्या क्लायमॅक्सबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवण्याच्या पार्श्वभूमीवर रोहित चित्रपट बनवणार असल्याची चर्चा आहे. वर्ष 2019 मध्ये जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवण्यात आले होते आणि जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देण्यात आला. रोहित शेट्टीला याबाबत विचारले असता, मी ही प्रेक्षकांमध्ये सुरु असलेल्या चर्चेबाबत ऐकले आहे. मात्र मलाच याबाबत माहित नाही. केवळ प्रेक्षक बोलत आहेत. कोणत्याही बिग बजेट चित्रपटाबाबत असे होते. लोक आपली कथा लिहितात, असे त्याने सांगितले.

अद्याप चित्रपटाच्या कथेचा फायनल ड्राफ्ट तयार नाही

चित्रपटाच्या टीमकडे कथेबाबत एक बेसिक आयडिया आहे, मात्र अद्याप फायनल ड्राफ्ट तयार करण्यात आला नाही, असे रोहितने सांगितले. ‘सिंघम 3’ खूप पुढचा प्रोजेक्ट आहे. त्याआधी रणवीर सिंहसोबत अपकमिंग कॉमेडी ‘सर्कस’ चित्रपट आणि अजय देवगणकडेही चित्रपटांची लाईन आहे. आम्ही ‘सर्कस’ चित्रपटाच्या शेवटच्या शूटिंगसाठी 2 डिसेंबर रोजी उटीला रवाना होत आहोत. आधी हा चित्रपट पूर्ण करणार, असेही रोहित म्हणाला.

पुढच्या वर्षअखेरपर्यंत शूटिंग सुरु करणार

कोरोना महामारीमुळे अजय देवगणकडे आधीच एक बॅकलॉग आहे. त्यामुळे आम्ही पुढच्या वर्षाच्या अखेरपर्यंत चित्रपटाची शूटिंग सुरु करु शकत नाही. सूर्यवंशीच्या एक्साइटमेंटमुळे प्रेक्षकांना सिंघम चित्रपटाची प्रतिक्षा आहे. मात्र तांत्रिकदृष्ट्या आम्ही 2023 पर्यंत चित्रपट रिलिज करु शकत नाही.

सिंगमच्या तिसऱ्या पार्टमध्ये जोरदार अॅक्शन असणार आहे. या प्रोजेक्टवर काम करण्यास वेळ लागेल. ही मोठी अॅक्शन फिल्म आहे. जर नोव्हेंबर किंवा डिसेंबर 2022 पर्यंत आम्ही शूटिंग सुरु शकलो तर ती पूर्ण करण्यास सात महिने लागतील. फायनल ड्राफ्ट लिहिण्यासाठी खूप वेळ आहे. (Bollywood director rohit shetty will make singham 3 next year)

इतर बातम्या

Gangubai Kathiawadi : ‘या’ तारखेला रिलिज होणार आलिया भट्टचा नवा चित्रपट

Prithviraj Teaser Out | उलगडणार इतिहासातील सुवर्ण पान, बहुचर्चित ‘पृथ्वीराज’ चित्रपटाचा दमदार टीझर रिलीज

पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक
पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक.
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?.
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर.
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?.
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'.
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?.
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय.
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल.
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान.
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?.