चित्रपटातील ‘तो’ न्यूड सीन पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल, ट्विटरवर ट्रेंड होतंय #BoycottRadhikaApte

बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे (Radhika Apte) हिने आतापर्यंत तिच्या कारकिर्दीत अनेक संस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. राधिकाला अभिनयात क्षेत्रात एक उत्कृष्ट अभिनेत्री मानले जाते. परंतु, आता पुन्हा एकदा #BoycottRadhikaApte हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होतोय.

चित्रपटातील ‘तो’ न्यूड सीन पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल, ट्विटरवर ट्रेंड होतंय #BoycottRadhikaApte
नुकताच राधिकाचा 'ओके कंप्यूटर' हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला होता, त्यात विजय वर्मा तिच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसला होता. याशिवाय ती ‘भूल’, ‘सेक्रेड गेम्स’, ‘लस्ट स्टोरीज’, ‘पार्च्ड’, ‘अंधाधुंद’, ‘पॅडमॅन’ अशा अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये दिसली आहे.
Follow us
| Updated on: Aug 13, 2021 | 11:10 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे (Radhika Apte) हिने आतापर्यंत तिच्या कारकिर्दीत अनेक संस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. राधिकाला अभिनयात क्षेत्रात एक उत्कृष्ट अभिनेत्री मानले जाते. परंतु, आता पुन्हा एकदा #BoycottRadhikaApte हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होतोय. यामुळे हे अभिनेत्री परत एकदा चर्चेत आली आहे. राधिकाच्या एका जुन्या चित्रपटातील न्यूड सीन दरम्यानचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

लीना यादव दिग्दर्शित ‘पार्चेड’ (Parched) चित्रपटातील राधिका अपटे हिचा न्यूड सीनचा फोटो सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहे. या चित्रपटात राधिका आपटेसोबत अभिनेता आदिल हुसैन मुख्य भूमिकेत दिसला होता. या दोघांदरम्यान एक न्यूड सीन चित्रित झाला होता. अभिनेत्री राधिका आपटे हिचा हा चित्रपट 2016मध्ये प्रदर्शित झाला होता.

नेटकरी का संतापले?

या चित्रपटातील राधिका आपटेचा हा सीन आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या न्यूड सीन फोटोवर नेटकरी संतापले आहेत. नेटकऱ्यांनी या सीनवर आक्षेप घेत, राधिकाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. तर, काहींनी जरा तरी संस्कृती जपा म्हणत तिला बोल लगावण्यास सुरुवात केली आहे. बॉलिवूड चित्रपटांमध्ये हे असले सीन दाखवून देशभरात अश्लीलता पसरवली जात असल्याचे म्हटले जात आहे.

पाहा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया :

‘त्या’ सीनबद्दल बोलताना राधिका म्हणते…

यावेळी राधिकाने ‘पार्च्ड’च्या न्यूड सीनबद्दल देखील सांगितले. ती म्हणते, ‘हा सीन करणे माझ्यासाठी सोपे नव्हते, कारण त्यावेळी मी स्वत:च्या ‘बॉडी इमेज’शी झगडत होते. म्हणून स्क्रीनवर पुन्हा न्यूड होणे जरा भीतीदायक होते. मात्र, आता मी अशी दृश्ये न घाबरता देऊ शकते. ‘ राधिका पुढे म्हणाली की, तिला आपल्या शरीराचा, आकाराचा आणि स्वतःचा अभिमान आहे. ती म्हणते की, हा चित्रपट बर्‍याच ठिकाणी नावाजला गेला, ज्यामुळे माझे कौतुक झाले व मला काम मिळाले. राधिका म्हणाली, ‘मला अशा भूमिकेची मला खूप गरज होती. कारण जेव्हा आपण बॉलिवूडमध्ये असतो, आपल्याला आपल्या शरीरात काय बदल करावे लागतील, हे सतत सांगितले जाते. मी नेहमीच मेंटेन असते, म्हणून मला माझ्या शरीरावर किंवा चेहऱ्यावर काहीही करण्याची गरज भासत नाही.’

हेही वाचा :

‘आगिनफुले’ची ‘ठिणगी ठिणगी’ झाली आणि गाण्याने रसिकांची मने जिंकली! वाचा ‘ऐरणीच्या देवा’ गाण्याचा किस्सा…

कधीकाळी गोविंदालाही अभिनयात द्यायचा तगडी टक्कर, आता काम हरीश कुमारला काम मिळणंही झालंय कठीण!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.