Brahmastra Trailer: थक्क करणारी दृश्यं, डोळे दिपवून टाकणारं VFX; रणबीर-आलियाच्या भव्यदिव्य ‘ब्रह्मास्त्र’चा ट्रेलर पाहिलात का?

यामध्ये अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) शिवा ही भूमिका साकारतोय. तर आलिया भट्ट इशाच्या भूमिकेत आहे. याशिवाय अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉय अशी स्टारकास्ट आहे.

Brahmastra Trailer: थक्क करणारी दृश्यं, डोळे दिपवून टाकणारं VFX; रणबीर-आलियाच्या भव्यदिव्य 'ब्रह्मास्त्र'चा ट्रेलर पाहिलात का?
brahmastraImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Jun 15, 2022 | 9:44 AM

अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 2014 मध्ये या चित्रपटाची घोषणा झाली. तेव्हापासूनच या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. एकूण तीन भागांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असून पहिल्या भागाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘ब्रह्मास्त्र: शिवा’ (Brahmastra part one shive) असं या पहिल्या भागाचं नाव आहे. यामध्ये अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) शिवा ही भूमिका साकारतोय. तर आलिया भट्ट इशाच्या भूमिकेत आहे. याशिवाय अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉय अशी स्टारकास्ट आहे. येत्या 9 सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. जवळपास तीन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये बऱ्याच गोष्टींविषयी उत्सुकता निर्माण केलेली आहे. पौराणिक कथा आणि त्याला आधुनिकतेची जोड देऊन एक वेगळ्याच आशयाचा हा चित्रपट अयान मुखर्जीने तयार केला आहे. हा चित्रपट तयार व्हायला बराच अवधी लागला. तो का लागला असेल, याची कल्पना हा ट्रेलर पाहून येते.

फँटसी, ॲडव्हेंचर, वाईटाविरोधातील चांगल्याचा लढा, प्रेम अशा सर्वच गोष्टी या ट्रेलरमध्ये पहायला मिळतात. ब्रह्मास्त्र आणि शिवाचं काही खास नातं असतं. इतरांसारखाच सर्वसामान्य वाटणाऱ्या शिवाकडे काही विशिष्ट ताकद असतात, ज्यामुळे तो आगीत कधीच जळू शकत नाही. त्याची इशा नावाच्या तरुणीशी भेट होते. या दोघांमधील प्रेम खुलत असतानाच दुसऱ्या विश्वात काही वेगळ्या घडामोडी घडत असतात. ब्रह्मास्त्र मिळवण्यासाठी शत्रूंची धडपड आणि त्या सर्वांमध्ये अडकलेला शिवा.. याची झलक ट्रेलरमध्ये दाखवण्यात आली आहे. यामध्ये मौनी रॉय ही नकारात्मक भूमिकेत असल्याचं दिसून येतंय.

पहा ट्रेलर-

हे सुद्धा वाचा

स्टार स्टुडिओज, धर्मा प्रॉडक्शन्स, प्राइम फोकस आणि स्टारलाइट पिक्चर्स निर्मित हा चित्रपट एकूण पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘बाहुबली’चे दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांनी दक्षिणेतल्या चार भाषांमध्ये या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. त्यामुळे रणबीर कपूर हा राजामौली यांच्यासोबतही चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसला होता.

Non Stop LIVE Update
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.