Bunty Aur Babli 2 Trailer : ‘बंटी’ आणि ‘बबली’चा डबल धमाका, राणी-सैफसह सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरी वाघ दिसणार मुख्य भूमिकेत!

अभिनेत्री राणी मुखर्जी आणि अभिनेता सैफ अली खान यांच्या ‘बंटी और बबली 2’ या चित्रपटाचे चाहते आतुरतेने वाट पाहत होते. आता ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आज (25 ऑक्टोबर) रिलीज करण्यात आला आहे. हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे.

Bunty Aur Babli 2 Trailer : ‘बंटी’ आणि ‘बबली’चा डबल धमाका, राणी-सैफसह सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरी वाघ दिसणार मुख्य भूमिकेत!
Bunty Aur Babli 2
Follow us
| Updated on: Oct 25, 2021 | 12:34 PM

मुंबई : अभिनेत्री राणी मुखर्जी आणि अभिनेता सैफ अली खान यांच्या ‘बंटी और बबली 2’ या चित्रपटाचे चाहते आतुरतेने वाट पाहत होते. आता ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आज (25 ऑक्टोबर) रिलीज करण्यात आला आहे. हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. या चित्रपटात राणी आणि सैफसोबतच सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरी हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

सिद्धांत चतुर्वेदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून ट्रेलर रिलीज झाल्याची माहिती दिली आहे. त्याने लिहिले की, ‘ट्रेलर आला आहे. मोठ्या पडद्यावर भेटूया…’

कसा आहे ट्रेलर?

यावेळी चाहत्यांना ‘बंटी और बबली 2’मध्ये दुहेरी धमाका पाहायला मिळणार आहे. एकीकडे जुने बंटी आणि बबली म्हणजेच राणी मुखर्जी आणि सैफ अली खान यांनी लोकांना लुटणे बंद करून सामान्य जीवन जगण्यास सुरुवात केली असताना, यावेळी नवीन बंटी आणि बबली अर्थात सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरी दाखल झाले आहेत. यावेळी पंकज त्रिपाठी पोलिसांच्या भूमिकेत दिसणार आहे.

पाहा ट्रेलर :

ट्रेलरची सुरुवात विम्मी देवीचे पती राकेश त्रिवेदी आणि त्यांच्या मुलासह एका साध्या कुटुंबापासून होते. जो गेल्या 15 वर्षांपासून रेल्वेमध्ये कार्यरत आहे. अनेकांची फसवणूक करणारे हे साधे जोडपे पूर्वी बंटी और बबली या नावाने ओळखले जात होते. पुन्हा एकदा बंटी आणि बबली परतले आहेत, ज्यामुळे पोलिसांनी दोघांनाही पकडले. कारण बंटी आणि बबली पुन्हा सक्रिय झाल्याचे बोलले जात आहे. यानंतर नवीन बंटी आणि बबलीची एंट्री होते. जे त्यांचे स्वरूप बदलून लोकांना फसवतात.

नवीन बंटी आणि बबली सर्वत्र आहेत. त्यानंतर, राणी आणि सैफ पुन्हा एकदा बंटी आणि बबली बनले आणि या नवीन बंटी आणि बबलीला पकडण्यासाठी हे दोघे निघाले आहेत. हे चौघे मिळून आता काय धमाल करणार आहेत, यासाठी चित्रपटाची वाट पाहावी लागणार आहे.

‘बंटी और बबली 2’चे दिग्दर्शन वरुण व्ही शर्मा यांनी केले आहे आणि आदित्य चोप्रा निर्मित आहे. हा चित्रपट 19 नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

सैफ-राणीची सुपरहिट जोडी

अभिनेत सैफ अली खान आणि अभिनेत्री राणी मुखर्जी यांना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी चाहते देखील उत्साहित आहेत. यापूर्वी या दोघांनी ‘हम तुम’, ‘तारा रम पम’, ‘थोडा प्यार थोडा प्यार थोडा जादू’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. 2005 साली आलेला ‘बंटी और बबली’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. यामध्ये अभिषेक बच्चनने राणी मुखर्जीसोबत काम केले होते. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. चित्रपटातील ऐश्वर्या राय बच्चनचे आयटम साँग ‘कजरारे’ सुपर डुपर हिट ठरले होते. या चित्रपटात राणी आणि अभिषेक धूर्त चोर झाले होते आणि अमिताभ बच्चन पोलिस झाले होते. चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन शानदार होते.

हेही वाचा :

कपिल शर्माने पत्नी गिन्नीसोबत खास पद्धतीने साजरा केला ‘करवा चौथ’, शेअर केले रोमँटिक फोटो!

67th National Film Awards : ‘थलायवा’ रजनीकांत यांचा ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’ने सन्मान होणार, दिल्लीत पार पडणार पुरस्कार सोहळा!

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.