Video: मुलाखतीदरम्यान चिन्मयने केलं असं काही… जे ऐकून तुमचाही ऊर अभिमानाने भरून येईल!

पावनखिंडमध्ये 'छत्रपती शिवाजी महाराज' (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि 'द काश्मीर फाईल्स'मध्ये (The Kashmir Files) बिट्टा या दोन्ही टोकाच्या भूमिका अभिनेता चिन्मय मांडलेकरने (Chinmay Mandlekar) अगदी सहज वाटाव्या अशा साकारल्या आहेत. या दोन्ही चित्रपटांमधील त्याच्या दमदार अभिनयकौशल्याचं सध्या सर्वत्र कौतुक आहे.

Video: मुलाखतीदरम्यान चिन्मयने केलं असं काही... जे ऐकून तुमचाही ऊर अभिमानाने भरून येईल!
अभिनेता चिन्मय मांडलेकरImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 19, 2022 | 11:52 AM

पावनखिंडमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज’ (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि ‘द काश्मीर फाईल्स’मध्ये (The Kashmir Files) बिट्टा या दोन्ही टोकाच्या भूमिका अभिनेता चिन्मय मांडलेकरने (Chinmay Mandlekar) अगदी सहज वाटाव्या अशा साकारल्या आहेत. या दोन्ही चित्रपटांमधील त्याच्या दमदार अभिनयकौशल्याचं सध्या सर्वत्र कौतुक आहे. ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाने आठ दिवसांत बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. याच चित्रपटानिमित्त चिन्मयने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान त्याने असं काही केलं, जे पाहून, ऐकून तुम्हालाही एक कलाकार म्हणून त्याचा अभिमान वाटेल. ‘पावनखिंड’ या चित्रपटाचा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरने सोशल मीडियावर या मुलाखतीचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत त्याने चिन्मयचं कौतुक केलं आहे. चिन्मयच्या या कृतीचं नेटकऱ्यांकडूनही कौतुक होत आहे.

चिन्मयने नेमकं काय केलं?

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान चिन्मयला त्याच्या ‘पावनखिंड’ या चित्रपटातील भूमिकेबद्दल प्रश्न विचारला जातो. यावेळी अँकरच्या तोंडून शिवाजी असं ऐकल्यानंतर चिन्मय त्याला मधेच थांबवतो आणि छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणतो. अँकरलाही त्याची चूक लक्षात आल्यानंतर तो सावरण्याचा प्रयत्न करतो. हाच व्हिडीओ चिन्मयनेही त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. ‘कारण काही गोष्टी ‘Optional’ नसतात. कधीच. छत्रपती शिवाजी महाराज की जय,’ असं त्याने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय.

दिग्पाल लांजेकरची पोस्ट-

‘निव्वळ अभिमान… निव्वळ अभिमान.. मित्रा चिन्मय, माझ्या माहितीतला सर्वोत्कृष्ट अभिनेता, माझा जवळचा मित्र, माझा भाऊ म्हणून तुझा अभिमान होताच. परंतु, आजच्या या कृतीने यशाच्या वेगळ्या शिखरावर असताना सुद्धा तू आपल्या दैवताला विसरला नाहीयेस हे पाहून अभिमानाने ऊर भरून आला. छत्रपती शिवाजी महाराज तुझ्या पदरात अशाच प्रकारच्या यशाच्या ओंजळीचा कृपाप्रसाद घालत राहोत ही त्यांच्या चरणी प्रार्थना. जय शिवराय. हर हर महादेव,’ अशा शब्दांत दिग्पालने भावना व्यक्त केल्या.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया-

चिन्मयची ही कृती पाहून नेटकऱ्यांनीही या व्हिडीओवर प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. ‘यामुळेच तुमचा अभिमान आहे’, असं एकाने लिहिलं. तर ‘निव्वळ अभिमान’ असं दुसऱ्याने म्हटलंय.

हेही वाचा:

जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज The Kashmir Filesच्या मदतीला धावून येतात..

पावनखिंडसाठी कौतुक तर द काश्मीर फाईल्ससाठी शिव्या; लोकांच्या प्रतिक्रियांबद्दल चिन्मय मांडलेकरला काय वाटतंय?

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.