करण जोहरचं प्रकरण, फडणवीस का काँग्रेस नेत्याच्या निशाण्यावर?

एनसीबीने बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चित्रपट निर्माता-दिग्दर्शक करण जोहरला समन्स पाठवलं आहे. यानंतर आता काँग्रेसने थेट माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

करण जोहरचं प्रकरण, फडणवीस का काँग्रेस नेत्याच्या निशाण्यावर?
Follow us
| Updated on: Dec 18, 2020 | 9:59 PM

मुंबई : एनसीबीने बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चित्रपट निर्माता-दिग्दर्शक करण जोहरला समन्स पाठवलं आहे. यानंतर आता काँग्रेसने थेट माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. करण जोहरच्या घरच्या पार्टीचा व्हिडीओ 2019 मध्ये व्हायरल झाला होता. त्यावेळी फडणवीस सरकार होते, मग त्यावेळीच या पार्टीची चौकशी करावी असे फडणवीस सरकारला किंवा एनसीबीला का वाटले नाही? असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी विचारला आहे. पार्टीच्या व्हिडिओवरून करणला चौकशीस बोलणारी एनसीबी कंगणा राणावतला चौकशीसाठी बोलवण्यास का घाबरते? ड्रग संदर्भात तिचाही एक व्हिडिओ वायरल झालेला आहे. तिच्याबदद्ल एनसीबीला एवढी आपुलकी का आणि कशासाठी? असेही प्रश्न सचिन सावंत यांनी विचारले आहेत (Congress leader Sachin Sawant criticize Devendra Fadnavis on Karan Johar NCB Summons).

यासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले, “राष्ट्रीय तपास यंत्रणा या भारतीय जनता पार्टी सरकारच्या हातच्या बाहुल्या झाल्या आहेत. त्यांच्या इशाऱ्यावर त्या नाचत आहेत हे वारंवार स्पष्ट होत आहे. एनसीबी, ईडी, सीबीआय, आयकर विभाग या राष्ट्रीय तपास यंत्रणा सिलेक्टिव्ह चौकशी करताना दिसत आहेत. एका पार्टीच्या व्हिडीओवरून करण जोहरची चौकशी होऊ शकते, तर मग कंगणाच्या चौकशीची हिम्मत एनसीबी का दाखवत नाही. त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात एनसीबीचा काय स्वार्थ असावा. करण जोहरच्या पार्टीचा व्हिडीओ 2019 चा आहे. त्यावेळी गृहमंत्री फडणवीस होते. त्यांनी यावर खुलासा करावा.”

“एनसीबीची अवस्था ‘जाना था जापान पहुंच गये चीन’”

“एनसीबीला इडीतर्फे सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील ड्रग अँगल शोधण्यासाठी बोलवण्यात आले होते. ‌अभिनेता सुशांतसिंह प्रकरणातील ड्रग अँगलची चौकशी करण्यात एनसीबी सपशेल फेल गेली आहे. आता ‘जाना था जापान पहुंच गये चीन’ अशी एनसीबीची अवस्था आहे. सीबीआयसुद्धा सुशांतसिंह प्रकरणात काहीच निष्पन्न करु शकली नाही. आज सीबीआय चिडीचूप बसली आहे. सुशांतसिंहच्या आत्महत्येचा वापर भाजपाने आपल्या गलिच्छ राजकीय स्वार्थासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन घेतला. आजही तेच होत आहे,” असा आरोप सचिन सावंत यांनी केला.

“बॉलिवूडला, महाराष्ट्राला, मुंबई पोलीसांना बदनाम करण्याची पद्धतशीर मोहिम”

सचिन सावंत यांनी यामागे मोठं षडयंत्र असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, “ड्रगच्या चौकशीच्या नावाखाली बॉलिवूडला, महाराष्ट्राला, मुंबई पोलिसांना बदनाम करण्याची पद्धतशीर मोहिम राबविली जात आहे. उत्तर प्रदेशमध्ये बॉलिवूड घेऊन जाण्याच्या मोहिमेचा हा एक भाग आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी फिल्मसीटी उभी करण्याची घोषणा केली. त्यानंतर अशा कारवाया करुन बॉलिवूडवर दबाव टाकण्याचे प्रकार होत आहेत.”

“एके ठिकाणी मुंबई पोलिसांच्या नार्कोटीक्स गुन्हे शाखेतर्फे किलो किलोने ड्रग्सचे साठे पकडले जात आहेत. असं असताना एनसीबीच्या हाती ग्रॅमभर ड्रगही लागत नाही, हे वास्तव आहे,” असंही सावंत म्हणाले.

हेही वाचा :

Drugs Case | करण जोहरच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता, 2019 मधील ‘त्या’ व्हिडिओवर उत्तर द्यावे लागणार!

Bollywood Drugs Case | ड्रग्स प्रकरणात निर्माता करण जोहरला एनसीबीकडून समन्स

व्हिडीओ पाहा :

Congress leader Sachin Sawant criticize Devendra Fadnavis on Karan Johar NCB Summons

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.