Shocking | राम गोपाल वर्माचं वादग्रस्त वक्तव्य, दाऊद इब्राहीमचे मानले आभार!

निर्माते आणि दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) आणि वाद हे समिकरण नवं नाही ते नेहमीच वादात अडकलेले असतात.

Shocking | राम गोपाल वर्माचं वादग्रस्त वक्तव्य, दाऊद इब्राहीमचे मानले आभार!
Follow us
| Updated on: Jan 25, 2021 | 2:08 PM

मुंबई : निर्माते आणि दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) आणि वाद हे समिकरण नवं नाही ते नेहमीच वादात अडकलेले असतात. नुकताच त्यांनी स्पॉटबॉयला एक मुलाखत दिली आहे त्या मुलाखतीमधील त्यांच्या एका वक्तव्यामुळे राम गोपाल वर्मा हे मोठ्या वादात अडकण्याची शक्यता आहे. मोस्ट वॉटेंड आतंकवादी दाऊद इब्राहिमचे आभार राम गोपाल वर्मा यांनी मानले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, गैंगस्टर सारख्या चित्रपटांसाठी मी दाऊद इब्राहिमचा आभारी आहे. (Controversial statement of Ram Gopal Varma)

आता राम गोपाल वर्मा यांच्यावर सर्वच स्तरातून टिका होऊ लागली आहे. राम गोपाल वर्मा यांनी ही मुलाखत आगामी ‘डी कंपनी’ या चित्रपटासाठी दिली आहे. ते सध्या याच चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉयज (एफडब्लूआइसीई) ने एका बैठकीत निर्णय घेतला होता की, फेडरेशनच्या 32 संघटनांपैकी कोणतीही संघटना निर्माते आणि दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्याशी कुठल्याही प्रकारचे संबंध ठेवणार नाहीत.

या संघटनेचे सदस्य देशामध्ये कुठल्याही भागात राम गोपाल वर्मा यांच्यासोबत काम करणार नाहीत. राम गोपाल वर्मा यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी चित्रपटाशी संबंधित कलाकार, टेक्नीशियन आणि कामगारांची सुमारे 1.25 कोटी रुपयांची थकबाकी दिली नाही.महासंघाचे अध्यक्ष बीएन तिवारी, सरचिटणीस अशोक दुबे आणि कोषाध्यक्ष गंगेश्वरलाल श्रीवास्तव यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी राम गोपाल वर्मा यांना या संदर्भात कायदेशीर नोटीस पाठविली आहे. परंतु राम गोपाल वर्मा यांनी नोटीसीला कोणतेही उत्तर दिले नाही.

17 सप्टेंबर 2020 रोजी राम गोपाल वर्मा यांना एफडब्लूआइसीई एक पत्र लिहिले होते. ज्यात कुठल्या कामगाराचे किता पैसे या संदर्भात संपूर्ण माहिती देण्यात आली होती. राम गोपाल वर्मा यांनी सत्या, रंगीला, राम गोपाल वर्मा की आग, कंपनी, सरकार, निःशब्द,भूत, दौड़ या सारखे हिट चित्रपट तयार केले आहेत.

संबंधित बातम्या : 

कंगनाचा पुन्हा स्वराशी पंगा, प्रत्युत्तराने फॅन्सचा सोशल मीडियावर दंगा…!

वरुण-नताशा विवाहबंधनात, ‘जियो जी भर के’, बॉलिवूडमधून शुभेच्छांचा वर्षाव!

(Controversial statement of Ram Gopal Varma)

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.