AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amitabh Bachchan: ‘टॉयलेट स्वच्छ करण्यापासून सगळी कामं स्वत:च करतोय’; बिग बींनी सांगितला क्वारंटाईनमधला अनुभव

अमिताभ बच्चन यांनी मंगळवारी ट्विट करत त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं सांगितलं. त्याचसोबत त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घेण्याचं आवाहनसुद्धा त्यांनी केलं.

Amitabh Bachchan: 'टॉयलेट स्वच्छ करण्यापासून सगळी कामं स्वत:च करतोय';  बिग बींनी सांगितला क्वारंटाईनमधला अनुभव
Amitabh BachchanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 28, 2022 | 9:49 AM

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना कोरोनाची (Covid 19) लागण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते घरीच क्वारंटाईनमध्ये आहेत. मात्र सोशल मीडियावर ते सक्रिय असून चाहत्यांच्या संपर्कात आहेत. बिग बींनी नुकताच एक ब्लॉग (Blog) लिहून त्यात त्यांच्या तब्येतीविषयीची माहिती दिली. आपली सर्व कामं आपण स्वत: करत आहोत, असंही त्यांनी त्यामध्ये लिहिलंय. कोरोनाशी ते कसा सामना करत आहेत आणि क्वारंटाईनमधला वेळ कसा घालवत आहेत, याविषयी त्यांनी या नव्या ब्लॉगमध्ये सविस्तर लिहिलंय. आधी प्रत्येक गोष्टीसाठी आपल्या स्टाफवर अवलंबून असलेले बिग बी आता स्वत: सगळी कामं करत आहेत. विशेष म्हणजे या अनुभवाचा आनंद घेत असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

‘कोरोनाची लागण झाल्यापासून मी माझी सर्व कामं स्वत:च करत आहे. स्वत:च माझं अंथरुण घालतोय, कपडे धुतोय, फरशी आणि टॉयलेटसुद्धा साफ करतोय. या सर्व कामांसोबतच मी स्वत:ची चहा-कॉफीदेखील बनवून घेतोय. एखादा स्विच ऑन किंवा ऑफ करायचा असेल तर तेसुद्धा मीच करत आहे. सगळे फोन कॉल्स मी स्वत: उचलतोय आणि पत्रसुद्धा स्वत: लिहितोय. कोणत्याही नर्सिंग स्टाफशिवाय मी माझी औषधं वेळेवर घेतोय. सध्या मी माझा दिवस असाच व्यतित करतोय’, असं त्यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिलंय.

हे सुद्धा वाचा

सगळी कामं स्वत:च करण्याचा एक वेगळाच आनंद बिग बी सध्या अनुभवत आहेत. याविषयी त्यांनी पुढे लिहिलं, ‘हा खूपच मजेशीर आणि स्वत:ला आनंदी ठेवण्याचा अनुभव आहे. अशाने मी माझ्या स्टाफवर फारसा अवलंबून राहत नाही आणि त्यांना माझी किती कामं करावी लागतात हे मला कळतंय. त्यामुळे त्यांच्याप्रती असलेला आदर माझ्या मनात आणखीनच वाढला आहे.’

अमिताभ बच्चन यांनी मंगळवारी ट्विट करत त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं सांगितलं. त्याचसोबत त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घेण्याचं आवाहनसुद्धा त्यांनी केलं. कोरोनामुळे क्वारंटाईनमध्ये राहत असलेल्या बिग बींना त्यांच्या कामाची खूप आठवण येतेय. सध्या ते ‘कौन बनेगा करोडपती’ या शोच्या 14 व्या सिझनचं सूत्रसंचालन करत आहेत. त्यांना कोरोनाची लागण झाल्याने या शोची शूटिंग सध्या थांबवण्यात आली आहे.

532 भारतीय नागरिक मायदेशी परतले
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले.
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू.
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर...
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर....
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर.
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?.
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं.
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी.
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी.
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते....
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते.....