क्रुझ पार्टी, ड्रग्ज, अटक आणि पुन्हा ‘मन्नत’ वापसी, आर्यन खानचे ‘ते’ 28 दिवस! वाचा काय काय घडलं…
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान 28 दिवसांनंतर त्याच्या घरी मन्नतला पोहोचला आहे. 2 ऑक्टोबर 2021 रोजी एनसीबीने आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात पकडले होते. तुरुंगातून सुटल्यानंतर चाहत्यांनी मन्नतच्या बाहेर ढोल वाजवून, फटाके लावून आर्यनचे स्वागत केले.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान 28 दिवसांनंतर त्याच्या घरी मन्नतला पोहोचला आहे. 2 ऑक्टोबर 2021 रोजी एनसीबीने आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात पकडले होते. तुरुंगातून सुटल्यानंतर चाहत्यांनी मन्नतच्या बाहेर ढोल वाजवून, फटाके लावून आर्यनचे स्वागत केले. 2 ऑक्टोबर (आर्यनची अटक) ते 30 ऑक्टोबर (आर्यनची तुरुंगातून सुटका) या प्रकरणात काय वळण आले ते जाणून घेऊया…
2 ऑक्टोबर : मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रूझ जहाजावर एनसीबीचा छापा. जहाजावर रेव्ह पार्टी होणार असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. पार्टी सुरू होण्यापूर्वीच आर्यन खान, अरबाज मर्चंटसह 8 जणांना एनसीबीने अटक केली होती. आर्यन खानसह सर्व आरोपींना 2 ऑक्टोबरची संपूर्ण रात्र कोठडीत ठेवण्यात आले होते.
3 ऑक्टोबर : आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल, एनसीबीने तिघांनाही अटक करून दंडाधिकारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिघांना 1 दिवसाची एनसीबी कोठडी दिली आहे.
4 ऑक्टोबर : आर्यन आणि उर्वरित आरोपींना पुन्हा दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. एनसीबीने आर्यनच्या फोनवरून आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करी, ड्रग्ज चॅटचे पुरावे सापडल्याचा दावा केला आहे. न्यायालयाने सर्वांना 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबीच्या कोठडीत पाठवले.
7 ऑक्टोबर : आर्यन आणि इतरांची पुढील कोठडी एनसीबीला देण्यास न्यायालयाने नकार दिला. सर्वांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा निर्णय देण्यात आला. आर्यन खानची त्याच दिवशी आर्थर रोड तुरुंगात रवानगी करण्यात आली. दुसरीकडे आर्यन खानचे वकील सतीश मानशिंदे यांनी त्याच्या जामिनासाठी अर्ज केला.
8 ऑक्टोबर : आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांचा जामीन अर्ज मॅजिस्ट्रेट कोर्टाने फेटाळला. त्याच्या वकिलांनी सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला.
9 ऑक्टोबर : आर्यन खानच्या जामिनावर न्यायालयात सुनावणी झाली. एनसीबीने आर्यनकडून कोणतीही ड्रग्ज जप्त केलेली नाही, असा युक्तिवाद आर्यनच्या वकिलाने केला. जो एनसीबीनेही मान्य केला आहे.
11 ऑक्टोबर : आर्यन खानच्या वकिलाने जामीन अर्जावर लवकर सुनावणीची मागणी केली. न्यायालयाने एनसीबीला 13 ऑक्टोबरला उत्तर दाखल करण्यास सांगितले.
13 ऑक्टोबर : मुंबई सत्र न्यायालयात आर्यन खानच्या जामीन अर्जावर 14 ऑक्टोबरपर्यंत स्थगिती.
14 ऑक्टोबर : मुंबई सत्र न्यायालयाने आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धमेटा यांच्या जामिनावर 20 ऑक्टोबरपर्यंत निर्णय राखून ठेवला आहे.
20 ऑक्टोबर : मुंबईतील विशेष एनडीपीएस न्यायालयाने आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांचा जामीन अर्ज फेटाळला. तीन आरोपींच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला.
21 ऑक्टोबर : शाहरुख खान पहिल्यांदाच तुरुंगात मुलगा आर्यन खानला भेटण्यासाठी आर्थर रोड जेलमध्ये पोहोचला. दोघांमध्ये 18 मिनिटे चर्चा झाली, ही भेट अतिशय भावूक झाली. दोघे इंटरकॉमवर बोलत होते. दोघांमध्ये काचेची भिंत आणि ग्रील होती.
25 ऑक्टोबर : शाहरुख खाननंतर त्याची पत्नी गौरी खान आर्थर रोड जेलमध्ये मुलाला भेटायला गेली.
26-28 ऑक्टोबर : आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांच्या जामिनावर मुंबई उच्च न्यायालयात सलग तीन दिवस सुनावणी झाली. मुकुल रोहतगी यांनी आर्यन खानची केस लढवली.
28 ऑक्टोबर : आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंटला जामीन मंजूर. मात्र न्यायालयाच्या आदेशाची प्रत मिळालेली नाही, त्यामुळे कारागृहातून बाहेर त्याला दोन दिवस लागू शकतात.