Ranbir-Alia Wedding: लग्नाच्या चर्चांवर अखेर आलियाकडून शिक्कामोर्तब? पहा VIDEO

कलाविश्वात सध्या एकाच गोष्टीची जोरदार चर्चा आहे.. ते म्हणजे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचं लग्न (Ranbir-Alia Wedding). या दोघांनी अद्याप याविषयीची काहीच माहिती दिली नसली तरी कपूर आणि भट्ट कुटुंबीयांकडून लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे.

Ranbir-Alia Wedding: लग्नाच्या चर्चांवर अखेर आलियाकडून शिक्कामोर्तब? पहा VIDEO
Alia BhattImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 11, 2022 | 9:28 AM

कलाविश्वात सध्या एकाच गोष्टीची जोरदार चर्चा आहे.. ते म्हणजे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचं लग्न (Ranbir-Alia Wedding). या दोघांनी अद्याप याविषयीची काहीच माहिती दिली नसली तरी कपूर आणि भट्ट कुटुंबीयांकडून लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. आता खुद्द आलियानेही या चर्चांवर अप्रत्यक्षपणे शिक्कामोर्तब केला आहे. एका चाहत्याच्या व्हिडीओवरील तिच्या कमेंटने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. डिजिटल कंटेट क्रिएटर निक लोटिया (Nick Lotia) याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंग’ (Kabir Singh) या चित्रपटातील एक दृश्य त्याने मजेशीररित्या रिक्रिएट केलं आहे. यामध्ये तो रणबीर-आलियाच्या लग्नानंतर त्यांच्या कारमागे धावताना दिसत आहे. याच व्हिडीओवर आलियाने कमेंट केली आहे.

सोशल मीडियावर ‘बी युनिक’ (Beyounick) या अकाऊंटचा मोठा चाहतावर्ग आहे. निकचं हे अकाऊंट असून त्यावर तो विविध प्रकारचे व्हिडीओ पोस्ट करत असतो. रणबीर-आलियाच्या लग्नाच्या चर्चांवर एका चाहत्याची काय प्रतिक्रिया असेल, यावरून त्याने नुकताच हा व्हिडीओ शूट केला. ‘आलिया वेड्स रणबीर’ असं लिहिलेल्या कारच्या मागे तो अनवाणी धावताना या व्हिडीओत दिसतोय. यावेळी त्याने पांढरा कुर्ता-पायजमा असा ‘कबीर सिंग’चा लूक केला आहे. ‘तू मेरी है मेरी ही रहेगी’ हे गाणं या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडमध्ये ऐकायला मिळतंय. ’17 एप्रिल रोजी माझी अशीच अवस्था असेल’, असं कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिलं आहे.

पहा व्हिडीओ-

View this post on Instagram

A post shared by Nick (@beyounick)

आलियाची कमेंट-

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आलियालाही हसू अनावर झालं. ‘डेड’ (Ded) अशी कमेंट लिहिती तिने हसण्याचा इमोजी पोस्ट केला आहे. दुसरीकडे रणबीर कपूरची चाहती असलेली अभिनेत्री आशा नेगी हिनेसुद्धा या व्हिडीओवर कमेंट करत लिहिलं, ‘यासाठी आपण दोघं मिळून धावूया’. ‘कबीर सिंग’मधल्या त्या दृश्याचाच संदर्भ देत एका नेटकऱ्याने निकला म्हटलं, ‘अरे भावा, तुला बाईकवर घेऊन जाण्यासाठी कोणीच आलं नाही’.

गेल्या काही महिन्यांपासून रणबीर-आलियाच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. आलियाचे काका रॉबिन भट्ट यांनी नुकतीच लग्नाविषयीची माहिती दिली. ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की 14 एप्रिल रोजी रणबीरच्या वांद्रे इथल्या ‘वास्तू’ या घरात लग्न पार पडेल. तर 13 एप्रिल रोजी मेहंदीचा कार्यक्रम असेल.

हेही वाचा:

Video : संजय राऊतांचा फोटो समोर येताच किरीट सोमय्या म्हणाले “मी साफसफाईला सुरूवात करतो”, पाहा व्हीडिओ…

Ranbir Kapoor-Alia Bhatt Wedding : आलिया भटचा जन्म मुंबईचा, पण नागरिकत्व भारताचं नव्हे तर ‘या’ देशाचं

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.