आठवणीही नकोत; समंथाने नागा चैतन्यला परत केली लग्नातली साडी?

अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) आणि नागा चैतन्य (Naga Chaitanya) ही टॉलिवूडमधील सर्वांत लोकप्रिय जोडी आहे. या दोघांचं लग्न जितकं चर्चेत होतं, त्याहून अधिक त्यांच्या घटस्फोटाची चर्चा झाली.

आठवणीही नकोत; समंथाने नागा चैतन्यला परत केली लग्नातली साडी?
समंथा-नागा चैतन्यच्या लग्नातील फोटोImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 12, 2022 | 11:41 AM

अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) आणि नागा चैतन्य (Naga Chaitanya) ही टॉलिवूडमधील सर्वांत लोकप्रिय जोडी आहे. या दोघांचं लग्न जितकं चर्चेत होतं, त्याहून अधिक त्यांच्या घटस्फोटाची चर्चा झाली. लग्नाच्या अवघ्या चार वर्षांतच ही जोडी विभक्त झाली. या दोघांच्या घटस्फोटाच्या वृत्ताने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. घटस्फोटानंतर समंथा अनेकदा सोशल मीडियावर व्यक्त झाली. यावेळी तिने ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड उत्तर दिलं. आता समंथाने तिची लग्नातली साडी (Wedding Saree) नागा चैतन्यला परत केल्याचं समजतंय. समंथाने लग्नात नागा चैतन्यची आजी डी. राजेश्वरी यांची साडी परिधान केली होती. हीच साडी तिने आता नागा चैतन्यला परत केल्याचं कळतंय. 2 ऑक्टोबर 2021 रोजी समंथा आणि नागा चैतन्यने सोशल मीडियावर पोस्ट लिहित घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर समंथाने तिच्या सोशल मीडियावर अकाऊंटवरून अक्किनेनी हे आडनावसुद्धा काढून टाकलं.

समंथाची साडी ही डग्गुबती कुटुंबीयांकडून असल्याने तिने ती परत करण्याचा निर्णय घेतला. नागा चैतन्यची आजी आणि निर्माते डी. रामनायडू यांची पत्नी डी राजेश्वरी यांनी ती साडी परिधान केली होती. तीच साडी समंथाने तिच्या लग्नात परिधान केली होती. त्या साडीबद्दल समंथाने सोशल मीडियावर पोस्टसुद्धा लिहिली होती. नागा चैतन्य किंवा त्याच्या कुटुंबीयांच्या कोणत्याही आठवणी नकोत, म्हणून समंथाने साडी परत करण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय.

6 ऑक्टोबर 2017 रोजी समंथा आणि नागा चैतन्यने लग्नगाठ बांधली. या दोघांची लव्हस्टोरी एखाद्या चित्रपटाच्या कथेला शोभावी अशीच आहे. दोघं जेव्हा पहिल्यांदा एकमेकांना भेटले, तेव्हा दोघंही दुसऱ्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये होते. 2009 मध्ये ‘ये माया चेसावे’ या तेलुगू चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान समंथा-नागा चैतन्यची पहिल्यांदा भेट झाली होती. त्यावेळी समंथा ही अभिनेता सिद्धार्थला तर नागा चैतन्य हा श्रुती हासनला डेट करत होता. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान समंथा-नागा चैतन्यमध्ये चांगली मैत्री झाली. 2015 मध्ये जेव्हा दुसऱ्या चित्रपटानिमित्त दोघं पुन्हा भेटले, तेव्हा दोघांचाही ब्रेकअप झाला होता. दोन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2017 मध्ये गोव्यात दोघांनी लग्नगाठ बांधली.

हेही वाचा: 

“गरज पडली तर मी पुन्हा शेंगदाणे विकेन”, अपघातानंतर शहाणपण, कच्चा बदाम स्टार भुबन बड्याकारचा माफीनामा

‘मला म्हणतात, तू तिसऱ्यांदा लग्न करू नको, हे ठरवणारे तुम्ही कोण?’, श्वेता तिवारी भडकली

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.